Ticker

6/recent/ticker-posts

अन्न व पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ यांच्यावर बाॕम्बे हाॕस्पीटलमध्ये उपचार सुरु








 मुंबई (प्रतिनिधी)

 राज्याचे अन्न व नागरी
पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची अचानक प्रकृती खराब झाल्याने त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.एका विशेष विमानाने त्यांना पुण्याहून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांचे दौरे सुरु आहेत.अजित पवार यांची जनसन्मान यात्राही राज्यभरात सुरू आहे. या दौऱ्यात झालेल्या
धावपळीमुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.ना.छगन भुजबळ पुण्यात असताना त्यांची अचानक प्रकृती बिघडली. यावेळी पुण्याहून विशेष
विमानाची सोय करत त्यांना थेट बॉम्बे
हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या