Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत ; त्यासाठी शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी -----माजी मंत्री सुरेश धस ------------------------------------- स्वामी विवेकानंद पतसंस्थेचेवतीने मयत सभासदांच्या वारसाला २५ लाख रु ची मदत हे कार्य कौतुकास्पदच... --- आ.बाळासाहेब आजबे ------------------------------------------ सुवर्ण महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

उत्तम .बोडखे आष्टी -------------------- (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील कडा येथील स्वामी विवेकानंद शिक्षकांंची सहकारी पतसंस्थेची सुवर्ण महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा आज होत आहे.या पतसंस्थेचा काटकसरीचा व्यवहार आहे.सभासदांच्या हिताचे विविध योजना व समाजोपयोगी उपक्रमही पतसंस्था राबविते.सुमारे पावणेदोन कोटी रुपये नफ्यात असलेली ही शिक्षकांची पतसंस्था आहे.एकुण ठेवी ४६ कोटी ७७ लाख असुन लवाकरच ९० कोटी ठेवी होवोत.अशा आमच्या शुभेच्छा आहेत परंतु वार्षिक सभेत शिक्षकांचे विविध प्रश्न अडी अडचणीवर चर्चा होते तशी शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा घडायला पाहिजे.कारण जि.प.च्या शाळा अडचणीत सापडु लागल्या आहेत. खेड्यापाड्यातुन स्कुल बसव्दारे शहरात मुले मुली जाऊ लागल्या आहेत.पालक आपले पाल्य इंग्रजी माध्यम असलेल्या शाळेत घालत आहेत.या समस्यावर एकच रामबाण उपाय आहे आणि तो म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे तरच पटसंख्या राहील अन्यथा जि.प.च्या शाळा बंद पडतील. जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत, त्यासाठी शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी असे प्रतिपादन माजी मंत्री सुरेश धस यांनी केले.तसेच आ.बाळासाहेब आजबे बोलताना म्हणाले की, स्वामी विवेकानंद पतसंस्था ही मयत सभासदांच्या वारसाला २५ लाख रु अर्थिक मदत देते हे कार्य कौतुकस्पद आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षक हा शैक्षणिक गुणवत्ता देणारा आदर्श नागरिक, आदर्श विद्यार्थी घडविणारा असावा असे आवाहन आ.बाळासाहेब आजबे यांनी केले. आष्टी तालुक्यातील कडा येथील स्वामी विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्थेची ५० वी.वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.२२ सप्टेंबर २०२४ रोजी खाकळवाडी येथील अंबिका लाॕन्स मंगल कार्यालयात झाली.यावेळी माजी मंत्री सुरेश धसा,आ.बाळासाहेब आजबे , माजी आ.साहेबराव दरेकर,समाजसेवक विजय गोल्हार, उध्दवबापु दरेकर, तहसीलदार वैशाली पाटील, सभापती बद्रीनाथ जगताप,परमेश्वरकाका शेळके, संदीप खकाळ,माजी सरपंच अनिलतात्या ढोबळे,गटशिक्षण अधिकारी सुधाकर यादव,दादासाहेब चितळे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण पोकळे, रघुनाथ कर्डीले,शरद तळेकर यांच्यासह प्रमुख मान्यवर,पदाधिकारी,पतसंस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव,संचालक, शिक्षक आदी उपस्थित होते. यावेळी प्रस्ताविक चेअरमन मारुती पठाडे यिंनी कराताना सांगीतले की, आपण ३१ मार्च २०२४ अखेरचे वार्षिक हिशोब पत्रक सादर केलेले आहे.या पतसंस्थेचे कार्यक्षेत्र हे जि.प.बीड अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आष्टी तालुका आहे.पतसंस्थेची सभासद संख्या एक हजार दोन ईतकी आहे.२६ कोटी १५ लाख ४५ हजार ०५९ भागभांडवल आहे,१८ कोटी ३ लाख ३६ हजार ५२५ शेअर्स आहे.८ कोटी १२ लाख ८ हजार ५३४ कायम ठेव आहे. २ कोटी ५२ लाख १९ हजार १९३ सभासद गंगाजळी आहे.४६ कोटी ७७ लाख ७० हजार ७४६ रु एकुण ठेवी आहेत.४२ कोटी ६८ लाख १६ हजार ३७८ मुदत ठेव आहे. ४ कोटी ९ लाख ५४ हजार ३६८ रु आवर्ती ठेव आहे.८३ कोटी ७७ लाख ३ हजार ४६७ रु सभासद एकुण कर्ज आहे.७९ कोटी ६० लाख ९३ हजार १९४ रु दिर्घ कर्ज आहे.२६ लाख ८९ हजार ४६४ रु तातडी कर्ज आहे.३ कोटी ४६ लाख ५९ हजार ७५९ रु मध्यम कर्ज आहे. ४२ लाख ६१ हजार ५० रु कर्मचारी कर्ज आहे.१ कोटी ८५ लाख ६२ हजार ६८८ रु पतसंस्थेला निव्वळ नफा आहे.१२ कोटी ८ लाख ४१ हजार ९३६ रु बँक गुंतवणुक आहे.८.५ टक्के सभासद कर्जावरील व्याजदर आहे.बँक कॅश क्रेडिट कर्जावरील व्याजदर ९ टक्के,कॅश क्रेडिट (एमजीबी बैंक) १५ कोटी रु आहे.याशिवाय सभासद कल्याण निधी उभारणीतून मयत सभासदांच्या वारसांस २५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते.सर्व सभासदांना मोबाईल अँप्लीकेशनची सुविधा उपलब्ध करुन दिली.एस.एम.एस. बँकींग केले आहे असे चेअरमन पठाडे यांनी यावेळी सांगीतले. यावेळी विशेष आदर्श शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक,पतसंस्थेने गौरवलेल्या उपक्रमशील शाळा, शिक्षण विस्तार अधिकारीपदी निवड,सेट नेट परिक्षा उतीर्ण,एम ए गोल्ह सेट मेडल,मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा विजेत्या शाळा,बीड जिल्हा स्काऊड गाइड आयुक्त निवड आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी मंत्री सुरेश धस,आ. बाळासाहेब आजबे, माजी आ.साहेबराव दरेकर,तहसिलदार वैशाली पाटील,माजी सरपंच अनिलतात्या ढोबळे ,उध्दवबापु दरेकर,गटशिक्षण अधिकारी सुधाकर यादव यांची भाषणे झाली.ही वार्षिक सभा दोन सत्रात झाली. सभेच्या प्रारंभी पतसंस्थेच्या मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.पतसंस्थेचे अध्यक्ष मारुती पठाडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करुन विषयपत्रिकेनुसार वेगवेगळे विषय मांडले. या सर्व विषयांना अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सभासदांनी मान्यता दिली. यावेळी चेअरमन मारुती पठाडे,व्हाईस चेअरमन अशोक लटपटे, मानद सचिव महेश कुमार शिंदे,संचालक सर्वश्री विठ्ठल शिंदे,हिरामण पोकळे,संजय काळे, स्वानंद थोरवे,चंद्रशेखर खाडे,प्रविण मेहेरकर, रत्नाकर चव्हाण, महेशकुमार शिंदे, आप्पासाहेब काळे, नितीन करडुळे, आदिनाथ गर्जे,पोपट बोराडे,गोरक्ष गोरे,श्रीमती मनिषा होळकर - उडाणे,श्रीमती शैला सातपुते- पोकळे,ज्योती देसाई ,वैजिनाथ रायते,सर्व सभासद,शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शिक्षक बाळासाहेब तळेकर,शिक्षक मधुकर गळगटे, शिक्षक विकास धस यांनी केले. चौकट --------- सभासद कल्याण निधी उभारणीतून मयत सभासदांच्या वारसांस २५ लाख रुपयांची आर्थिक मदत,सर्व सभासदांना मोबाईल अँप्लीकेशनची सुविधा, चेक लेस बँकिंग, तात्काळ व सुलभ कर्ज, एस.एम.एस.बँकींग,कर्जासाठीची मुद्रांक सुविधा, दुरदृष्टी पारदर्शकता, सी.बी.एस. सॉप्टवेअर प्रणाली,सभासदांना संस्थेकडे रक्कम भरणा करणेसाठी क्यु आर कोड सुविधा पतसंस्थेने संचालक व सभासद यांच्या सहकार्याने आपण दिली आहे. सभासदांची मागणी व संचालक मंडळाची अनुमती,पतसंस्थेचे आर्थिक हित या सर्व गोष्टींचा समन्वय साधून पतसंस्थेच्या कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ---- ----मारुती पठाडे (चेअरमन) ********************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या