आष्टी (प्रतिनिधी )
माजी मंत्री सुरेश धस यांचे पी.ए.म्हणून अनेक वर्षे काम
पाहिलेले आष्टी तालुक्यातील वाकी ग्रामपंचायतचे माजी सरपंच दिलीप ससाणे (वय ५०)
यांचे पहाटे दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यापाठीमागे पत्नी,मुले,असा परिवार
आहे.दिलीप ससाणे हे शांत,संयमी आणि मनमिळावु स्वभावाचे होते. गोरगरीब लोकांना मदत
करणारे व्यक्तीमत्व होते.दिलीप ससाणे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
अंत्यविधी मंगळवार दि.२४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा.वाकी येथील सीना नदीकाठावर
झाला.यावेळी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या