आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथील बाबाजी प्रतिष्ठान गणेश मंडळांच्या गणरायाचे रविवारी
सायंकाळी वाजत गाजत विसर्जन करण्यात आले.रविवारी सकाळी श्री.गणरायाची आरती माजी आ.
भीमराव धोंडे यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी दादासाहेब जगताप व सौ.अर्चना जगताप
यांच्या हस्ते विधीवत पुजा करण्यात आली.याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अभयराजे
धोंडे,चेअरमन राजेंद्र धोंडे ,नगरसेवक आस्लम बेग, मधुकर जायभाये, अशोक गर्जे,
कॉन्ट्रॅक्टर भागवत गर्जे, बाबुराव कदम, उध्दव विधाते,सचिन सायकड,डॉ.डी.बी.राऊत,
प्रा.शिवदास विधाते, प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ,अभिलाष गाडेकर,नितीन निकाळजे,
ग्रामपंचायत सदस्य प्रविण धोंडे, आदेश निमोणकर उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या
युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी
सायंकाळी बाबाजी प्रतिष्ठान गणेश मंडळांच्या गणरायाचे हजारों गणेश भक्तांच्या
उपस्थितीत वाजत गाजत मिरवणूकीने जाऊन विसर्जन करण्यात आले.
0 टिप्पण्या