

आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी शहरात आ.बाळासाहेब आजबे मित्र मंडळ व शिवशंभो गणेश
मंडळाच्यावतीने सातव्या दिवशी भव्य पारंपारिक पद्धतीने श्री विसर्जन मिरवणूक संपन्न
झाली .या मिरवणुकीमध्ये कर्नाटक येथील चेंडे ढोल व नृत्य पथकाने लक्ष्यवेधी
प्रात्यक्षिके करुन आष्टीकरांची मने जिंकले.आष्टी येथे आ. बाळासाहेब आजबे मित्र
मंडळाच्यावतीने शिवशंभो गणेश मंडळाची स्थापना करण्यात येते. या गणेश मंडळाची
विसर्जन मिरवणूक सातव्या दिवशी आ.बाळासाहेब आजबे यांच्या उपस्थितीमध्ये हजारो गणेश
भक्तांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी पारंपारिक पद्धतीने गणेश
विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती.यामध्ये हलगी पथक अहमदनगर येथील १०० मुले
-मुलींचे ढोल पथक व खास आकर्षण म्हणून कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध चेंडे ढोल व
नृत्य पथक आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी चेंडे पथकाने आष्टी शहरांमध्ये ढोल
पथकाच्या वाद्यावर नृत्य करत आष्टीकरांची मने जिंकली,आ. बाळासाहेब आजबे यांच्या
हस्ते श्री गणेशाच्या मूर्तीची अद्यावत पूजा करून आरती करण्यात आली.सायंकाळी ५
वाजता मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.यावेळी आष्टी शहरातील किनारा चौक येथे
वेगवेगळ्या पद्धतीच्या आकर्षक रांगोळी काढण्यात आल्या होत्या.या रांगोळीने
उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले या मिरवणुकीसाठी आष्टी तालुक्यातून हजारोंच्या
संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.
0 टिप्पण्या