Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी शहरातील युवकांचे आशास्थान आणि प्रिंटींग क्षेत्रातील ब्रॅण्ड ठरलेले - दत्ताभाऊ बोडखे

आष्टी शहरातील दत्ताभाऊ उत्तमराव बोडखे यांनी गेल्या काही वर्षांमध्ये समता परिषदेच्या माध्यमातून केलेल्या कार्यातून युवकांमध्ये चैतन्य निर्माण केले आहे. आष्टी तालुक्यातील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांसाठी आणि त्यांच्या समकालीन युवा पिढीसाठी अशास्थान ठरत आहेत. त्यांनी सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेत असताना व्यवसायातून चार पैसे मिळवावेत साठी अविरत मेहनत घेत " बोडखे प्रिंटिंग प्रेस " या व्यवसायामार्फत प्रिंटिंग क्षेत्रामध्ये ब्रँड अशी प्रतिमा निर्माण करण्यात त्यांनी यश मिळवले आहे अशा या उत्साही सतत कार्यरत आणि समाजासाठी सतत उभा असलेला दत्ताभाऊ बोडखे यांचा आज जन्मदिन आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये म.फुले,शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात समता,बंधुत्व आणि ऐक्याच्या जोरावर आणि शिक्षणाच्या माध्यमातून फुले दांपत्यानी स्त्री पुरुष समानतेचा दिव्य संदेश दिला. त्यांच्या विचार कार्याचा आदर्श समोर ठेवून समता सैनिकांच्या माध्यमातून तेजस्वी विचारधारा निर्माण करण्यात ज्यांची महत्त्वाची भूमिका आहे असे युवा उद्योजक तथा युवा नेतृत्व म्हणजेच दत्ताभाऊ बोडखे! शांत,संयमी मन,व्यासंगी, अभ्यासू आणि सर्वांना सोबत घेऊन विचारधारा पुढे नेण्यासाठी तितक्याच दमदारपणे पाऊल टाकणारं एक युवकांच्या गराड्यातील लोकप्रिय नाव.. म्हणजे दत्ताभाऊ.. महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जडणघडणीतील..अग्रणी असलेले.. महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ आणि बीड जिल्ह्यामध्ये सुभाष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली समता सैनिकांची तालुकाभर संघटन करून उत्तम कौशल्य दाखवणाऱ्या दत्ताभाऊ बोडखे यांची सर्वच पक्ष आणि संघटनांमध्ये लोकप्रियता आहे.मानवी समाजाला योग्य दिशा देणाऱ्या संत सज्जन आणि महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, आधी कार्यक्रम आयोजन करण्यामध्ये दत्ताभाऊ बोडखे याचा सदैव पुढाकार राहिलेला आहे. जाती धर्म पंथ यांना समतेच्या ऐक्यात गुंफून मानवी जीवन आनंदी करण्यामध्ये दत्ताभाऊंची सतत धडपड असते.युवकांनी विशेषत: शिकले पाहिजे,उद्योग व्यवसायामध्ये स्वतः पुढाकार घेऊन रमले पाहिजे.ही त्यांची धारणा आहे.आणि म्हणूनच त्यांनी बोडखे प्रेसच्या माध्यमातून आधी केले नंतर सांगितले या युक्तीनुसार प्रेरणास्थान निर्माण केले आहे. सहा वर्षापुर्वी आष्टी शहरात बोडखे प्रेसची सुरुवात केली.... शिक्षण महर्षी शेतकरी नेते माजी आ.भीमराव धोंडे विद्यमान विधानसभा सदस्य आ. बाळासाहेब आजबे माजी राज्यमंत्री सुरेश धस माजी आ. साहेबराव दरेकर नाना यांंच्या प्रमुख उपस्थितीत बोडखे प्रेस सुरु झाली आणि अल्पावधीतच या प्रेसने नावलौकिक मिळविला आहे. गुणवत्ता,व्हरायटी,दर्जा, योग्यभाव,तत्परसेवा आदीसह ग्राहकांच्या सेवेत आधुनिक स्वरूपात सहज उपलब्ध असलेले छपाई प्रिटींगसह,शालेय आणि महाविद्यालयीन छपाई,बँका, पतसंस्था आणि निवडणुकीचे पोस्टर्स,स्टिकर्स आदी विविध क्षेत्रांसाठी निर्माण झाले आहे. बीड-अहमदनगरसह विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी जाण्याच्या संदर्भामध्ये सातत्याने व्यवसायिकांना वेळ,खर्च लागत असे ही उणीव सातत्याने लक्षात घेऊन दत्ताभाऊ बोडखे यांनी पाच वर्षापूर्वी आष्टी शहरांमध्ये आधुनिक सेवा उपलब्ध करून दिली आहे.विविध प्रकारच्या छपाई प्रिटींगसह शालेय आणि महाविद्यालयीन स्टेशनरी छपाई विविध प्रकारच्या राष्ट्रीय आणि खाजगी बँका तसेच पतसंस्थांसाठी स्टेशनरी प्रिटिंग उपलब्ध झाली आहे.विविध प्रकारच्या निवडणुकांचे पोस्टर्स,पोम्प्लेट, स्टिकर्स त्याचबरोबर आधुनिक फ्लेक्स प्रिंटिंग यामध्ये बॅनर आणि बोर्ड यांचा समावेश आहे.आष्टी शहर आणि तालुक्यातील अनेक हॉस्पिटल्सच्या फाइल्स,रिपोर्ट्स आणि लॅब रिपोर्ट,स्टेशनरी प्लॅस्टिक प्रिंटिंग यामध्ये बोडखे पॕटर्न अल्पावधीत धबधबा निर्माण करू शकला आहे.सामाजिक बांधिलकीचा अंतर्भाव असलेल्या बोडखे प्रिंटिंगमध्ये अखंड हरिनाम सप्ताह,पोम्प्लेट,पोस्टर छपाई त्याचबरोबर भेट वस्तू आणि फोटो फ्रेम, आधुनिक प्रकारच्या प्रिंटिंगसह डिजिटल ऑफसेटला ग्राहकांची मोठी पसंती आहे.उद्योग क्षेत्रामध्ये पदार्पण केलेल्या बोडखे पॅटर्नमुळे सर्वसामान्य ग्राहक आदीसह शेतकरी आणि लघु,कुटिर उद्योगांच्या मालकांना या प्रेसमुळे वेळ,पैसा आदीसह शारीरिक कष्ट वाचू शकले आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघातील चार टर्म आमदार राहिलेले शिक्षण महर्षी शेतकरी नेते भीमरावजी धोंडे यांचे जावई आणि बीड जिल्ह्यातील नामवंत पत्रकार उत्तम बोडखे यांचे ते चिरंजीव असले तरी त्यांनी कधीही याचा बडे जाव न मिरवता ते सतत जमिनीवर असतात.. अत्यंत मितभाषी मोजके बोलणारे आणि सतत कार्यप्रवण राहणे हा त्यांचा स्थायीभाव आहे आहेत.आई बबीता आदर्श शिक्षिका, तसेच मोठा भाऊ राकेश अध्यापन क्षेत्रामध्ये आणि भगिनी शिवानी एमबीबीएस डॉक्टर असल्याने कौटुंबिक वातावरण उच्चशिक्षित झाल्यामुळे त्यांच्या विचाराची जडणघडण ही तितकीच दर्जेदार आहे.युवकांचे संघटन करून योग्य दिशेने समाजाला नेण्यासाठी प्रयत्नात असलेल्या समता सैनिकांचे मार्गदर्शक अर्थातच युवा उद्योजक दत्ताभाऊ बोडखे यांना दैनिक झुंजारनेतास परिवाराच्यावतीने शुभेच्छा...तसेच आष्टी तालुक्यातील सर्व पत्रकारांकडून शुभेच्छा... --- प्रफुल्ल सहस्रबुध्दे (आष्टी)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या