Ticker

6/recent/ticker-posts

क-हेवाडी येथील निस्वार्थ सामाजिक संस्थेतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामस्थांना रोपांचे वाटप

आष्टी (प्रतिनिधी) आपल्या सभोवतालचा निसर्ग, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि निसर्गाच्या संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय सण स्वातंत्र्यदिन,प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन,मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या दिवशी वृक्षारोपन केले जाते.पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवण्यात निसर्ग महत्वाची भूमिका बजावतो.सध्याच्या काळात पृथ्वीतलावरील भूमी, वायु,जल, आकाश,अग्नि हे महत्त्वाचे नैसर्गिक स्रोत टिकवण्यासाठी प्रदूषण,वृक्षतोड नियंत्रण आणून जलसंधारण,वृक्ष लागवड या गोष्टी करणे गरजेचे आहे तरच आपण नैसर्गिक आपत्तींपासून सुरक्षित राहू शकतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्या आसपासच्या निसर्गाचे संरक्षण करणे काळाची गरज बनली आहे. यासाठी आष्टी तालुक्यातील क-हेवाडी येथील निस्वार्थ सामाजिक संस्थेने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रामस्थांना १ हजार ५०० रोपांचे वाटप करुन वृक्षारोपण करण्यात आले. क-हेवाडी ग्रामपंचायतने महाराष्ट्र सरकारच्या माझी वसुंधरा ५.० या अभियानामध्ये सहभाग नोंदवला आहे. याअभियानाच्या दृष्टिकोनातूनही ते यापुढेही निसर्ग संवर्धन व सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करत आहेत.आष्टी तालुक्यातील क-हेवाडी येथील युवाकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या निस्वार्थी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जागतिक निसर्ग संवर्धनदिना निमित्त मानव आणि प्राणी जातीला निसर्गामुळेच अन्न,पाणी,हवा,निवारा आणि चांगले आरोग्य मिळते,इतकेच नाही तर निसर्गा मुळेच हवामान अनुकूल राहण्यास मदत होते.अशा परिस्थितीमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण आपल्या आसपासच्या निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी वृक्षतोड थांबवणे प्रदूषणावर आळा घालने व भूमीचे संरक्षण करणे,पाणी साठवण या महत्वाच्या गोष्टी करणे गरजेचे आहे.ऑक्सीजन हा किती महत्त्वाचा घटक आहे. हे आपण कोरोना काळात अनुभवलेच आहे आणि जर अशा घटकांचे संरक्षण करायचे असेल तर अशा गोष्टींची सामाजिक उपक्रमातून जनजागृती करणे गरजेचे आहे आणि ती याकार्यक्रमामार्फत करण्यात आली.यावेळी गावातील नागरिकांना बांबूचे रोपे, काटे सवान्या रोपे,पिंपळ, पारस रोपांचे वाटप करण्यात आले. गावातील शेतक-यांना शेवग्याच्या बिया मोफत वाटप करून त्याची लागवड कश्या पद्धतीने करावी याबद्दल मार्गदर्शन करून या रोपांची प्रत्यक्ष लागवड करण्यात आली. गावातील जि.प.प्रा.शाळा व हरिनारायण स्वामी विद्यालयाला विविध स्पर्धामध्ये सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी विजेत्यांना बक्षीस देण्यात आली.विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राची आवड निर्माण होण्यास मदत होते. चौकट ----------- क-हेवाडीतील या युवकांचे कार्य कौतुकास्पद;निस्वार्थ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गावचा होतोय कायापालट ----------------------
आष्टी तालुक्यातील क-हेवाडी येथील सुशिक्षित होतकरू आणि नोकरी,व्यावसायिक विविध क्षेत्रातील युवाकांनी एकत्र येऊन गावच्या विकासासाठी निस्वार्थ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एकत्र येऊन गावासाठी व समाजासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत.सामाजिक उपक्रम राबवत आहेत. या अगोदरही या संस्थेने १ हजार आंब्याची (केशर) रोपे वाटप केली होती. गरजूंना मदत करण्यात ही संस्था नेहमीच पुढे येते.आताही या संस्थेने व गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत मार्फत महाराष्ट्र सरकारच्या माझी वसुंधरा ५.० या अभियानामध्ये सहभाग नोंदवला आहे. या अभियानाच्या दृष्टिकोनातूनही ते यापुढे काम करणार आहेत. ------------------------ यावेळी क-हेवाडीतील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.अशीच गावकऱ्यांनी साथ दिली तर हे युवक पुढेही गावातील खूप काही प्रश्ना संदर्भात काम करतील.जसे की आरोग्य,शिक्षण,सांस्कृतिक,क्रीडा, नोकरी या क्षेत्रात गावातील युवापिढीने आपले नाव कमवावे आणि त्यासाठी त्यामध्ये येणारे अडथळे दूर करून एक चांगला मार्ग त्यांना मिळावा.यासाठी सतत काम करत राहू असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.खरंतर हे सगळे युवक आपापल्या क्षेत्रात काम करून चांगल्या प्रकारे कमवत आहेत.गावाचे सामाजिक बंधिलकीतुन उतराई होण्यासाठी हे सामाजिक काम करीत आहेत. लहाणपण गेलेल्या गावासाठी, समाजासाठी काहीतरी देणे लागतो हे लक्षात घेऊन हे युवक सतत पुढे येऊन काम करतात.त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे यावेळी दोन्हीही शाळेतील शिक्षक , गावक-यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या