Ticker

6/recent/ticker-posts

वसई येथील वर्तक महाविद्यालयाचे उपप्राचार्यपदी वाहि-याचे सुपुत्र प्रा.पोपट पगारे यांची निवड

आष्टी (प्रतिनिधी) वसई येथील वर्तक महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य प्राध्यापक संघटनेचे ( MFUCTO ) सहसेक्रेटरी, महाविद्यालयाचे परीक्षा विभाग प्रमुख आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी प्रमुख प्रा. पोपट माधव पगारे यांची वर्तक महाविद्यालयाचे उपप्राचार्यपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे.प्रा.पोपट पगारे यांचे प्राथमिक शिक्षण आष्टी तालुक्यातील वाहिरा या त्यांच्या मूळगावी झाले तर माध्यमिक शिक्षण खुंटेफळ येथील लोकमान्य विद्यालयात येथे झाले.पदवी श्रीगोंदा येथील जिवाजीराव महाविद्यालयात तर एम.एस्सी. प्राणिशास्त्र अहमदनगर येथील न्यू आर्टस् महाविद्यालयात झाले आहे. वाहिरा गावातील अत्यंत गरीब कुटुंबातील हे सर्व भावंडे फारच हलाखीच्या परिस्थतीतून शिकले.आईने सर्वांना शिकवले,पगारे सर यांच्या मातोश्री समाबाई या एक आदर्श माता म्हणून पंचक्रोशीत सुपरिचित आहेत.मोठे बंधू मोहन मुंबईच्या पंचतारांकित ओबेरॉय हॉटेल येथे चांगल्या पदावर होते.दुसरे बंधू सुभाष हे भारतीय आयुर्विमा महामंडळात डिव्हीसीनल मॅनेजर तर तिसरे बंधू सदाशिव हे अहमदनगर येथे हायस्कूलमध्ये शिक्षक होते.शैक्षणिक वारसा असलेले हे पगारे कुंटुब आहे. नवनियुक्त उपप्राचार्य पोपट पगारे यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या