Ticker

6/recent/ticker-posts

चिखलीचे बबनदादा शिंदे यांनी माळरानावर फुलवली ड्रॕगन फ्रुट बाग

विशेष लेख ------------ उत्तम बोडखे --++---------- शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग केले तर यशस्वी शेती करता येते.हे आष्टी तालुक्यातील चिखलीचे बबनदादा शिंदे यांनी दाखवून दिले आहे. शेतामध्ये जिद्द पणाला लावणारा शेतकरीसुद्धा असतो.आष्टी तालुक्यातील चिखली या ठिकाणी एक एकर शेतीमध्ये त्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे.२४ महिन्याच्या या फळबागेला आता फळे येण्यास सुरुवात झाली आहे. बबनदादा शिंदे यांचा हा अभिनव प्रकल्प यशस्वी ठरला आहे. एकदाच यामध्ये पैशाची गुंतवणूक करून कमी खर्चामध्ये व कमी पाण्याच्या प्रमाणात या ड्रॅगन फ्रुटची लागवड त्यांनी यशस्वी करून दाखवली आहे.आष्टी तालुक्यातील माजी आ.भीमराव धोंडे , दत्तात्रय घुले (केळसांगवी),विश्वनाथ शेकडे (म्हसोबाचीवाडी) यांच्यानंतर ड्रॅगन शेती करण्यासाठी बबनदादा शिंदे यांचाच नंबर लागतो.सध्या या ड्रॅगन शेतीला कुठेही बाजारात इतर फळासारखी स्पर्धा नसून आयुर्वेदासाठी उपयुक्त असलेल्या व भरघोस उत्पादन देणारी ही शेती चार पैसे शेतकऱ्यांना नक्कीच कमवून देईल असे बबनदादा शिंदे यांनी सांगितले. माळरानावरील खडकाळ एक एकर जमिनीत त्यांनी ड्रॅगन फ्रुटची बाग फुलवली आहे.आष्टी तालुक्याला पाणी टंचाईचे संकट तसे नवीन नाही.कधी पाण्याचा सुकाळ तर कधी दुष्काळ.त्यामुळे शेतीत नेहमीच परवडेल अशी स्थिती नसते त्यामुळे शेतीत वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग केले तरच शेती उत्पादन भरवशाचे ठरते आष्टी तालुक्यातील चिखली येथे बबनदादा शिंदे यांची वडलोपार्जीत २० एकर शेती आहे. यातील काही जमीन चांगली तर काही हलकी अशा स्वरूपाची.या हलक्या माळरानावरील खडकाळ जमिनीत कोणते पीक घ्यावे ? हा त्यांना प्रश्न पडायचा.शिंदे हे एकेकाळी ठेकेदारीचे काम करीत असत, तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत संस्थेत शिक्षक आहेत. ड्रॅगन फ्रुट बदल माहिती समजली.त्याविषयी अधिक माहिती घेत त्यांनी विविध ठिकाणच्या ड्रॅगन फ्रुट बागांना भेटी दिल्या.ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांनी त्यांच्या एक एकर शेतात ड्रॅगन फ्रुट फळबागेची लागवड केली आष्टी तालुक्यातील चिखली येथील प्रगतशील शेतकरी बबनदादा शिंदे यांनी सोलापूरमध्ये पहिल्यांदा ड्रॅगन फ्रूटविषयी ऐकलं होतं. त्यानंतर गावी परतल्यावर सांगोला येथुन घेतली ड्रॅगन फ्रूटची रोपे त्यांनी खरेदी केली.दोन वर्षात आधुनिक शेतीचा प्रयोग यशस्वी करून माळरानावर एक एकर ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीतून ते लाखो रुपये कमावतात.आष्टी तालुका दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी शेती करणं म्हणजे जुगाराच ठरतं. निसर्गाने दिली साथ तर पीकपाणी चांगलं झालं आणि उत्पन्न चांगल झालं तर ठीक नाहीतर अवकाळी,अतिवृष्टी किंवा कोरडा दुष्काळ पाचवीला पुजलेला असतो.बरं पीकपाणी चांगलं आलंच तर बाजारात भाव कमी जास्तच्या फे-यात अडकून शेतकरी हैराण झाला आहे मात्र असं असतानाही काळया आईशी इमान राखत काही शेतकरी नवनवीन प्रयोग करतात. पारंपारिक पिकांसोबतच आधुनिक शेती करण्याचे धाडस करून यशस्वी होत आहेत.त्यांच्या प्रयोगातून प्रेरणा घेत आधुनिक शेतीकडे शेतकरी वळू लागले आहेत.असाच एक धाडसी प्रयोग आष्टी तालुक्यातील कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी बबनदादा शिंदे यांनी केला आणि चांगल्या उत्पन्नाचा मार्ग मिळवला आहे.माळरानावर एक एकरच्या ड्रॅगन फ्रूट लागवडीतून या शेतकऱ्याने या हंगामात एक लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.तर मित्रमंडळी यांना तब्बल एक ते दिड क्विंटल मोफत ड्रॅगन फ्रूट वाटप केले आहे. बबनदादा शिंदे सोलापूर जिल्ह्यात काही कामानिमित्त गेले असता त्यांनी माळरानावर लावली ड्रॅगन फ्रूटची बाग पाहिली.कमी पाण्यात आणि माळरानावरसुध्दा येणाऱ्या या फळविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले काय असतं ड्रॅगन फ्रूट,त्याचे गुणधर्म काय? आपल्याकडील भागात हे खरचं खातात का? त्याची चव खरच चांगली आहे का ? या सगळ्या शंकांचे समाधान करण्यासाठी त्यांनी २०० रुपये किलोच्या भावाने ड्रॅगन फ्रूट विकत घेतले.सांगोला येथून रोपांची खरेदी वाढला.चिखाली गावी आल्यानंतर त्यांनी या ड्रॅगन फ्रूट फळविषयी माहिती घेण्यास सुरुवात केली.या फळांचे औषधी गुणधर्म पाहून त्यांचा आत्मविश्वास आपल्या भागात कोण याची शेती करतं याची माहिती घेत असता आपल्या गावाजवळच एका शेतकऱ्याने याची यशस्वी लागवड केल्याचे त्यांना कळले.त्यांनी शेजारच्या शेतीला भेट दिली. त्यांच्याकडून पण ड्रॅगन फ्रूट विकत घेऊन खाऊन पाहिले तेंव्हा कुठे शिंदे यांचं समाधान झालं.ड्रॅगन फ्रूट लागवडीचे योग्य मार्गदर्शन घेतले आणि बबनदादा शिंदे आधुनिक शेतीकडे वळले ते वर्ष २०२२ होतं.ऑगस्ट २०२२ मध्ये सांगोला येथून ड्रॅगन फ्रूटची रोपे घेतली आणि आपल्या एक एकर क्षेत्रात १२ बाय ७ च्या अंतराने लागवड केली. लागवडीसाठी आवश्यक पोल तार आणि पाण्याच्या व्यवस्थेसाठी ठिबक सिंचन करण्यासाठी अडीच लाख रुपये तर रोपे खरेदी साठी ५० हजार असा एकूण तीन लाख रुपयांचा त्यांना खर्च आला.ड्रॅगन फ्रूट विक्रीतून लाखांची कमाई लागवड केल्यानंतर या रोपांना फारशी कीटकनाशके फवारावी लागली नाही.खतांचा देखील मोठा खर्च करावा लागला नाही.केवळ शेणखत आणि एक दोन वेळा एकोणीस एकोणीस आणि गोमूत्र याची फवारणी त्यांनी केली. केलेल्या या प्रयोगाला १८ महिन्यांनी लाल चुटुक, गोड ड्रॅगन फ्रूट लगडली. पहिल्या बहरातच त्यांना ३ ते ४ क्विंटल उत्पादन मिळाले.त्यांनी १०० ते १५० रुपये भावाने विकून मोकळे झाले.या विक्रीतून बबनदादा शिंदे यांना आतापर्यंत एक लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. -------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या