Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी

आष्टी(प्रतिनिधी) नाभिक समाजाचे आराध्य दैवत वारकरी संप्रदायातील संतसेना महाराज यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संत सेना महाराज यांची आष्टी शहरातील नाभिक समाजाने शुक्रवार दि.३० आॕगस्ट रोजी दुपारी १२.३० वा.संतसेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पांडुरंग दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शहराध्यक्ष प्रविण कदम यांच्यासह नाभिक समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्रविण कदम म्हणाले,नाभिक समाजाचे कायम सुख-दुख:ची जाण ठेऊन समाजाला झुकते माप देणारे माजी मंत्री सुरेश धस यांनी नाभिक समाजाच्या मंदिरासाठी ४० लाख रूपायांचा निधी दिला असून,पुढच्या वर्षी होणार ४० लाखाचे समाज मंदिर माजीमंत्री धस यांच्या माध्यमातून होणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या