

उत्तम बोडखे ,आष्टी.
----------------------------
कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन शिकायला मिळते.विचाराची देवाण घेवाण होते.आजचा ग्राहक हा चोखंदळ आहे.शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करून नंबर एकचा माल निर्माण करून मार्केटिंग करायला शिकल्यास निश्चित आर्थिक फायदा होईल.फळबागा, फुलांची शेती व इतर शेती उत्पादनासाठी केंद्र सरकार करोडो रुपये खर्च करते.शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास चांगले उत्पादन मिळुन चांगले भाव देखील चांगला मिळतो.शेती उत्पादन वाढीसाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी जमिनीची तपासणी करून घेणे गरजेचे आहे.शेतीसाठी गोमूत्र वापरल्यास उत्पादन वाढीसाठी फायदा होतो.पौष्टिक अन्न मिळते.माजी आ.भीमराव धोंडे व डॉ.अजयदादा धोंडे यांनी आष्टीसारख्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी चांगले कृषी प्रदर्शन भरवले त्याबद्दल आपण मनापासून कौतुक करत आहोत,अभिनंदन करतो असे सांगत आधुनिक पद्धतीने शेती करुन दर्जेदार शेतीमाल निर्माण करून मार्केटिंग करावी असे आवाहन उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी केले.
आष्टी, पाटोदा,शिरूर मतदार संघाचे माजी आ.भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून कृषी महाविद्यालयाच्यावतीने डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय दुसरे कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे.या प्रदर्शनास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,बीडचे पालकमंत्री तथा कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी भेट दिली.
यावेळी व्यासपीठावर आयोजक माजी आ.भीमराव धोंडे,आ. बाळासाहेब आजबे,जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत, जिल्हा परिषद सदस्य सतीशआबा शिंदे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब शिंदे, स्वागताध्यक्ष डॉ.अजयदादा धोंडे, अभयराजे धोंडे,लालाभाऊ कुमकर,रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे,सतीषमामा झगडे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, रघुनाथ शिंदे,बाबु कदम,सदा पाटील दिंडे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,पालकमंत्री धनंजय मुंडे व आ.बाळासाहेब आजबे यांचे माजी आ.भीमराव धोंडे व डाॕ.अजयदादा धोंडे यांनी स्वागत केले.
पुढे बोलताना ना.अजितदादा पवार म्हणाले की,अशा कृषी प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात चांगली भर पडते.नवनवीन माहिती मिळते.शेतकऱ्यांनी काळानुरूप बदलले पाहिजे.आपल्या मानसिकतेत बदल करावा लागेल तरच शेती उपयुक्त व फायदेशीर आहे. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन माहिती मिळते तसेच वेगवेगळे अवजारे,वस्तू, पदार्थ पाहायला मिळतात.डॉ. स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांसाठी भरीव असे कार्य केलेले आहे.ते एक दैवी शक्ती होते असे अजितदादा पवार म्हणाले.
यावेळी कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे म्हणाले की,परळीत गेल्या आठवड्यात कृषी प्रदर्शन झाले आहे.आष्टी येथे लगेच होत आहे. बीड जिल्ह्याच्या दृष्टीने एकाच महिन्यात दोन ठिकाणी प्रदर्शन होत आहे.ही चांगली बाब आहे. प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर देशमुख यांनी तर आभार माजी आ.भीमराव धोंडे यांनी मानले.यावेळी कार्यक्रमास शेतकरी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
--------
शेतकऱ्यांच्या कृषी ज्ञानात
भर घालणारे प्रदर्शन..
------------------------------------
आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाचे भाग्यविधाते माजी आ.भीमराव धोंडे यांनी आणि त्यांचे सुपुत्र डॉ.अजय धोंडे यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक राज्यस्तरीय दुसऱ्या कृषी प्रदर्शनाची तयारी केली.या कृषी प्रदर्शनाला जिल्हा आणि राज्यभरातून प्रचंड शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात शेतकऱ्यांच्या ज्ञान आणि हितासाठी अनेक महत्त्वाच्या बाबींना संधी असल्याने उपस्थित तमाम शेतकऱ्यांसाठी त्यांच्या ज्ञानसंवर्धन होण्यासाठी फार मोठा फायदा झाला अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
माजी आ.धोंडे हे लोकाभिमुख नेतृत्व असल्याचे सिद्ध!
----------------------------------------
माजी आ.भीमराव धोंडे हे गेल्या ४० वर्षाहून अधिक काळ राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शेतकरी सामान्य जनता युवक यांच्या शाश्वत विकासासाठी झटणारे नेतृत्व आहे.आष्टी ते दिल्ली पायी मोर्चा नेणारे ते एकमेव आमदार ठरलेले आहेत.आजच्या या राज्य प्रदर्शनासाठी उपमुख्यमंत्री,कृषीमंत्री तसेच लोकनेत्या आ.पंकजाताई मुंडे सारख्या दिगजांची उपस्थिती आणि शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता भीमराव धोंडे हे लोकाभिमुख नेतृत्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
-------------------------------------
0 टिप्पण्या