आष्टी (प्रतिनिधी)
सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या आष्टी येथील धनश्री नागरी
सहकारी पतसंस्थेतर्फे आष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टा येथील जि.प.माध्यमिक शाळेस
५० हजार रु, मुख्यमंत्री सहाय्य निधी संकलन १५ हजार रु, आष्टी येथील सहाय्यक निबंधक
कार्यालयास ३५ हजार रु ,पुणे येथील राज्य सहकारी संघास १५ हजार रुपये अशी
पतसंस्थेने १ लाख १५ हजार रु आर्थिक मदत केली आहे अशी माहिती आष्टी येथील धनश्री
नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे यांनी दिले.
हरिनारायण आष्टा येथील कार्यक्रमास धनश्री पतसंस्थेचे सचिव जितेंद्र शिंदे,संचालक
स्वप्नील धोंडे उपस्थित होते. आष्टा शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय
पठाडे , उपाध्यक्ष साईनाथ गळगटे, सरपंच गणेश माळवे,गौतम बन्सी रोकडे, गणेश गळगटे,
मुख्याध्यापक जगताप मच्छिंद्रनाथ,रघुनाथ मुटकुळे,श्रीरंग खोकले , नामदेव
भिसे,सोमनाथ वाळके,बापू शिंदे,उमेश झांबरे,राजेंद्र भागवत, डॉ.अनिता चव्हाण,
द्रौपदी गवळी,सुषमा जाधव,मनिषा नाईकनवरे,तुषार पवार, दिगंबर आष्टेकर, लालासाहेब
बळे, सुभाष बांगर,मधूकर धूमाळ आदि उपस्थित होते. यावेळी पतसंस्थेचे सचिव जितेंद्र
शिंदे हे म्हणाले की, हरिनारायण आष्टा शाळेतील विद्यार्थी अतिशय गुणवंत आहेत.शाळेने
मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रमात शाळेला आष्टी तालुक्यात प्रथम क्रमांक
व बीड जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळालेला आहे स्वच्छता शिस्त अतिशय सुंदर
आहे.भविष्यात शाळेचा नावलौकिक वाढावा,विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी आम्ही
यात हातभार लावून मदत करत आहोत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश झांबरे यांनी तर
सूत्रसंचालन सोमनाथ वाळके यांनी केले तर आभार बापू शिंदे यांनी मानले.
0 टिप्पण्या