बीड जि.प.चे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी आपल्या पदाचा
गैरवापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक नियमित करून जिल्हा परिषद बीड अंतर्गत
भ्रष्टाचार केलेला असल्याची तक्रारीची वरिष्ठानी दखल न घेतल्याने या प्रकरणी
संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्याने बीड जिल्हापरिषदेत खळबळ उडाली असून
सोळंके यांना पाठीशी घालणाऱ्यांना सुद्धा आता परिणामा ला सामोरे जावे लागणार आहे
बीड जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराची चौकशीकरण्यात यावी अशी लेखी तक्रार ग्रामविकास
विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे सुद्धा केली आहे. वासुदेव सोळंके अतिरिक्त मुख्य
कार्यकारी अधिकारी यांच्याबाबत त्यांच्या कार्यकाळात समाज कल्याण विभाग अंतर्गत
दलितवस्ती सुधार योजनेमध्ये सन २०२२- २०२३ या वर्षात प्रशासकीय मान्यते संदर्भात
अनेक तक्रारी जिल्हा परिषदेस प्राप्त झालेल्या होत्या.त्याचप्रमाणे या
तक्रारींच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे जनहित याचिका
दाखल झालेली होती.याबाबत माननीय उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेऊन या याचिकांमध्ये
प्रशासनाला आदेश दिलेले होते. त्यामुळे माननीय न्यायालयापुढे प्रशासनाची प्रतिमा
मलिन झालेली होती.त्याचप्रमाणे आपल्या दि.६ फेब्रुवारी २०२३ च्या पत्राअन्वये
अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांना विद्यार्थ्यांकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम व
शैक्षणिक सहलीसाठी नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले होते.या कार्यक्रमांतर्गत
नोडल अधिकारी म्हणून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्यांची गुणानुक्रमे निवड
करून,पात्र विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी याकरिता इस्रो
किंवा इतर देशातील वैज्ञानिक स्थळांना भेटी देऊन खगोलशास्त्रा विषयी
विद्यार्थ्यांना माहिती व्हावी याकरिता नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली
होती.तथापि या शैक्षणिक सहलींमध्ये स्वतः सहभाग घ्यावा असे कोणतेही निर्देश नमूद
पत्राअन्वये दिलेले नव्हते परंतु श्री वासुदेव सोळंके यांनी नासा या आंतरराष्ट्रीय
खगोल संस्थेमध्ये विद्यार्थ्यांची सहल आयोजित केली व याकरिता कोणत्याही शासन
निर्णयात अग्रीम देण्याची तरतूद नसताना अग्रीम स्वरूपात ५२ लक्ष ५० हजार इतकी रक्कम
अग्रीम म्हणून वितरित करण्याकरिता तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चुकीचे
मार्गदर्शन करून ही रक्कम वितरित केली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांशी कुठलाही संबंध
नसताना काळजीवाहक म्हणून स्वतः या सहपरिवार शासकीय खर्चामधून सहलीमध्ये सहभागी झाले
होते.सोळंकी यांनी स्वतः भ्रष्टाचार केला आहे. ते या प्रकरणासाठी जबाबदार आहेत
त्यामुळे या प्रकरणाची आपल्या स्तरावरून चौकशी करावी.या आर्थिक व प्रशासकीय
अनियमितते संदर्भात सोळंके अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांची विभागीय चौकशी
सुरू करण्यात आलेली आहे परंतु या चौकशी संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली
नाही यावरून आपण या भ्रष्टाचारी लोकसेवकास पाठीशी घालण्याचे काम करत आहात ही बाब
सिद्ध होते.याबाबींचा विचारकरिता सोळंके यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून विभागीय
चौकशीची कारवाई आपल्या स्तरावरून करण्यात यावी अशी मागणी बळीराम सोमीनाथ लांडगे
यांनी केली आहे. या प्रकरणी याचिका क्रमांक २३००७/२०२४ ने संभाजी नगर येथील
खंडपीठात या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे
0 टिप्पण्या