

आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुका फोटोग्राफर असोसिएशनची नुकतीच बैठक संपन्न झाली.या
बैठकीत आधुनिक फोटोग्राफी, विविध विषयांवर साधक बाधक चर्चा झाल्यानंतर फोटोग्राफर
संघटनेची कार्यकारिणी देखील याच बैठकीत जाहीर करण्यात आली यामध्ये आष्टी
तालुक्यातील प्रसिद्ध फोटोग्राफर सचिन रानडे यांची संघटनेच्या अध्यक्षपदी तर शिवाजी
पोकळे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली रामकृष्ण औटे हे सचिव अशपाक बेग कोषाध्यक्ष
व स्वप्निल धस खजिनदार म्हणून त्यांची निवड करण्यात आली. आष्टी तालुका फोटोग्राफर
असोसिएशनची नुकतीच बैठक संपन्न झाली यामध्ये आधुनिक काळातील फोटोग्राफी वाढती
महागाई तसेच फोटोग्राफर बांधवांच्या असणाऱ्या समस्या आणि त्यावर उपाययोजना
राबविण्यासंबंधी विविध चर्चासत्र या बैठकीमध्ये संपन्न झाले. गेल्या अनेक
वर्षापासून विस्कळीत झालेली फोटोग्राफर्स असोसिएशनची कार्यकारणीची घडी पुन्हा एकदा
बसवण्याचे काम या निमित्ताने या बैठकीत पार पडले. यावेळी सर्वानुमते खालील
कार्यकारणी जाहीर करण्यात आली.आष्टी तालुका फोटोग्राफर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी
सचिन रानडे उपाध्यक्षपदी शिवा पोकळे सचिव म्हणून रामकृष्ण औटे कोषाध्यक्ष म्हणून
अशपाक बेग खजिनदार म्हणून स्वप्निल धस यांची निवड करण्यात आली.त्यांच्या या
निवडीबद्दल सर्वांनी अभिनंदन केले.
0 टिप्पण्या