Ticker

6/recent/ticker-posts

आनंदवाडी - सराटेवडगांव येथे माजी आ.भीमराव धोंडे यांची अभुतपुर्व मिरवणुक व जेसीबीतुन फुलांची उधळण .......................... ई-पिक पाहणीची अट रद्द करावी यासाठी आपण जिल्हाधिका-यांना भेटणार .............. माजी आ.भीमराव धोंडे

आष्टी (प्रतिनिधी) शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध पिकांचे अनुदान मिळण्यासाठी ई के.वाय.सी. (ई - पीक पाहणी ) ही अट रद्द करुन सरसकट अनुदान द्यावे या मागणीसाठी आपण लवकरच बीडचे जिल्हाधिकारी यांना भेटणार आहोत असे लोकनेते माजी आ.भीमराव धोंडे यांनी सांगितले. लोकनेते माजी आ.भीमराव धोंडे यांनी एक महिन्यापासून आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघात संवाद दौरा सुरू केला आहे.धोंडे हे गाव,वाड्या, वस्त्यांना भेटी देऊन सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत. प्रत्येक गावांमध्ये शेतकरी फक्त पिक विमा आणि अनुदान मिळाले नाही अशा तक्रारी करीत आहेत.पिंपळगाव दाणी, मेहकरी,आनंदवाडी,सराटेवडगांव, टाकळी,पिंपरी घुमरी येतिवथील शेतकऱ्यांनी पिक विमा अनुदान यावर अडचणी कथन केल्या.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळाशी सामना करावा लागतो त्यामुळे अनुदान व पिक विमा मिळणे हे गरजेचे आहे.ज्या शेतकऱ्यांनी पिक नुकसानीच्या तक्रारी केल्या फक्त त्यांनाच पिक विमा मिळाला आहे.पिक विमा देखील पुर्वीप्रमाणे सरसकट मिळावा. वेगवेगळे अनुदान मिळण्यासाठी कृषी विभागाने ई - पिक पाहणी ही अनिवार्य केल्याने मतदार संघातील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसतात त्यामुळे ते ई - पीक पाहणी करू शकत नाहीत. खेड्यापाड्यात मोबाईलला रेंज नसते तसेच सर्वर डाऊनचा प्रश्न अनेक ठिकाणी निर्माण झाल्याने शेतकरी ई पिक पाहणी करू शकले नाहीत. सरकारी अनुदान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी कृषी विभागाने ई पीक पाहणी ही अट रद्द करावी अशी मागणी झाली. आष्टी विधानसभा मतदार संघातील सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी आ.भीमराव धोंडे यांनी शनिवारी संवाद दौरा अंतर्गत आष्टी तालुक्यातील खुंटेफळ, सोलापुरवाडी,खरडगव्हाण, ठोंबळसांगवी,हातोळण,बोरोडी, पारोडी,निमगाव बोडखा,घोंगडेवाडी, पुंडी,पिंपळगाव दाणी,मेहेकरी, आनंदवाडी,पिंपरी घुमरी,सराटेवडगाव , टाकळी अमिया या गावाचा दौरा केला. आनंदवाडी येथे बोलताना माजी आ. भीमराव धोंडे म्हणाले की,या गावाचे निजाम पटेल,सर्जेराव बोडखे,मारूती बोडखे पाटील हे माझ्या काॕलेज जीवनातीला मित्र होते.त्यांनी व परिसरातील जनतेने मला राजकारणात खुप प्रेम दिलेले आहे. हे गाव माझ्या रुईनालकोल प्रमाणेच वाटते.या गावात लक्ष्मण तरटे असो अथवा निजाम पटेल असो यांच्या घरी दोन दोन दिवस मी राहिलेलो आहे.मला यापुर्वी जशी राजकारणात मदत केली त्याप्रमाणे उद्याच्या विधानसभा निवडणुकीत मदत करावी असे आवाहन केले.यावेळी युवानेते अजयदादा धोंडे यांनी बोलताना सांगितले की,भीमराव धोंडेसाहेब हे कधीच जातपात करत नाहीत.त्यांनी सर्व समाजातील गोरगरीब माणसांना केंद्र बिंदु मानून राजकारण व समाजकरण करतात व करीत राहणार आहेत.अपण युवाकांनी व प्रोढ माणसांनी त्यांना भविष्यातील निवडणुकीत खंबीर साथ द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी आ.भीमराव धोंडे विरोधकांवर बोलताना म्हणाले की, अलिकडच्या काळात प्रत्येक कामात १० टक्के कमिशन घेतले जाते.त्यामुळे चांगल्या दर्जाची कामे होत नाहीत. शेतकरी शिक्षण संस्थेचे माध्यमातून हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या शाळेत शिकत आहेत.शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी नौकरी करीत आहेत तर शैक्षणिक संस्थामुळे गावागावात मुलींच्या शिक्षणाची सोय झाली आहे. लवकरच आष्टी येथे इंजिनीअरिंग कॉलेज सुरू करण्यात येणार आहे.मतदार संघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत.आपण कधीच गुत्तेदारी केली नाही. निमगाव बोडखा येथे ॲड.हनुमंत थोरवे म्हणाले की,सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारे नेतृत्व म्हणजे भीमराव धोंडे होय. विधानसभा सदस्य असताना त्यांनी मतदार संघात अविस्मरणीय अशी अनेक विकासकामे केली आहेत.दौऱ्याच्या निमित्ताने भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे,ॲड. भाऊसाहेब सायंबर,रंगनाथ बोडखे, हरिभाऊ जंजिरे,चंद्रशेखर साके,पांडुरंग गावडे समवेत होते. आनंदवाडी येथे आल्यावर भीमराव धोंडे यांच्यावर जेसिबीमधुन फुलांचा वर्षाव केला.संबुळं ढोल ताशा वाद्य सह भव्य मिरवणूक झाली.यावेळी भीमराव धोंडे यांनी सरपंच भीमराव बोडखे यांच्याकडे चहापान घेतला.जेष्ठ नागरिक पंढरीनाथ बोडखे (वय ९७) यांच्या घरी जाऊन प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली.सेवा सह.संस्थेचे व्हाईस चेअरमन कोंडीभाऊ झांबरे यांच्याकडे सभेनंतर स्नेहभोजन केले.यावेळी पांडुरंग गावडे, भाऊसाहेब सायंबर हे उपस्थित होते.यावेळी सरपंच भीमराव बोडखे,पत्रकार उत्तम बोडखे,प्रा.डाॕ. जी.पी.बोडखे यांची भाषणे झाली. यावेळी आनंदवाडी येथील हनुमान मंदिरासमोर ४० बाय ८० फुटाचा पत्र्याचे शेड सभामंडप बांधुन द्यावा अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात आली.सुत्रसंचलन प्रा.डाॕ.जी.पी.बोडखे तर उपस्थितांचे आभार सरपंच भीमराव बोडखे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या