Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीच्या कृषी प्रदर्शनात दर तासाला लकी ड्रॉ,शेवटच्या दिवशी ड्रॉ मधून बंपर बक्षीस आणि महिलांसाठी " खेळ पैठणीचा " कार्यक्रम

आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील लाखों शेतकऱ्यांसाठी खास पर्वणी म्हणून माजी आ.भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून दि.२९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मराठवाड्यातील सर्वात मोठे आष्टीत डाॕ.स्वामीनाथन राज्यस्तरीय दुसरे कृषी प्रदर्शन येथे होणार आहे.चार दिवस चालणाऱ्या कृषी प्रदर्शनामध्ये आलेल्या शेतकऱ्यांच्या नावांमधून दर तासाला मोफत भव्य लकी ड्रॉ बक्षीस तर शेवटच्या दिवशी भाग्यवान शेतकरी जोडीसाठी लकी ड्रॉ मधून बंपर बक्षीस मिळणार असुन लाडक्या बहिणींसाठी उद्धव के.पी‌.प्रस्तूत महाराष्ट्रभर गाजत असलेला महिला भगिनींचा आवडता कार्यक्रम " खेळ पैठणीचा " शुक्रवार दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी होणार आहे. यासाठी प्रथम बक्षीस आहे ११ हजार १०१ रूपयांची मानाची पैठणी याशिवाय इतर भरपुर बक्षिसे जिंकण्याची व विविध खेळ खेळण्याची संधी आहे. आष्टी येथील श्री छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम आरसुळ, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आयोजित चार दिवसीय भव्यदिव्य अशा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे व लोकनेत्या आ.पंकजाताई मुंडे, आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. समारोप १ सप्टेंबर रोजी अ.भा. वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले आणि गहिनीनाथगडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज गहिनाथगडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.सांगली येथील व देशातील सर्वात उंच ४१ लाख रुपये किमंतीचा खिलार कोसा जातीचा सोन्या बैल प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.गतवर्षी १ लाख २५ हजार‌ शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाचा लाभ घेतला होता.कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने चार दिवस दररोज दुपारी १२ ते २ या वेळेत कृषी संबंधित तज्ञांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे. कृषी प्रदर्शनासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या नावांमधून दर तासाला लकी ड्रॉ काढण्यात येईल व लकी शेतकऱ्यांला शेती उपयोगी भेट वस्तू देण्यात येईल. शेवटच्या दिवशी बंपर लकी ड्रॉ काढुन विजेत्याला बक्षीस दिले जाईल. शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी रोज सायंकाळी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमा अंतर्गत पारंपारीक लोकगीते, लोककला, नाटक, शास्त्रीय संगीत,शेतकरी गीते, लोकनृत्य यांचे सादरीकरण करण्यात येतील.गतवर्षी एकुण १०० स्टाॅल होते यावर्षी १५० स्टाॅल राहतील. गेल्या प्रदर्शनात ७ ते ८ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती यावर्षी हा आकडा वाढणार आहे. हे प्रदर्शन मोफत आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन माजी आ. भीमराव धोंडे यांनी केले आहे. प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी माजी आ.भीमराव धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते अजयदादा धोंडे, अभयराजे धोंडे, कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक,विद्यार्थी, व्यवस्थापक बंडु पाचपुते, गणेश जठार आदि परिश्रम घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या