
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी शहरातील धनश्री सहकारी पतसंस्थेची २४ वी.वार्षिक
सर्वसाधारण सभा दि.८ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे.या सभेस सभासदांनी मोठ्या
संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन रंगनाथ धोंडे यांनी केले आहे. धनश्री
बिगरशेती नागरी सहकारी पतसंस्था मर्या.आष्टी या संस्थेच्या सभासदांची २४ वी.वार्षिक
सर्वसाधारण सभा रविवार दि.८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता जोगेश्वरी मंगल
कार्यालय,खडकत रोड, आष्टी येथे संस्थेचे चेअरमन रंगनाथ गोपीनाथ धोंडे यांचे
अध्यक्षतेखाली घेण्यात होणार आहे.सर्व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन
धोंडे यांनी केले आहे.सभेपुढील विषय मागील दि.२३ सप्टेंबर २०२३ च्या वार्षीक
सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे,सन २०२३ - २०२४ या अर्थिक वर्षांचा
अहवाल,ताळेबंद नफा तोटापत्रक वाचणे व त्यास मंजुरी देणे व दि.३१ मार्च २०२४ अखेर
झालेल्या नफा वाटणीस मंजुरी देणे, सन २०२३- २०२४ चा लेखा परीक्षण व दोष दुरूस्ती
अहवाल वाचन करणे व दोष दुरूस्ती करणे बाबत,नवीन व रद्द सभासदांना मान्यता देणे व
सभेला न येणाऱ्या सभासदांची रजा क्षमापीत करणे, सन २०२४- २०२५ या वर्षाच्या उत्पन्न
खर्चाच्या अंदाज पत्रकास मान्यता देणे बाबत,निधीचे व्यवस्थापन करुन निधी
गुंतवणुकीविषयी चर्चा करणे व धर्मदाय निधीतून केलेल्या खर्चास मान्यता देणे
बाबत,संस्थेच्या कार्यालयासाठी खरेदी केलेल्या जागेस व त्यासाठी लागलेल्या निधीस
मान्यता देणे बाबत,निंबधकांनी जाहीर केलेल्या नामतालीकेतील पात्र वैधानिक लेखा
परीक्षकाची सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्यासाठी लेखापरीक्षकाची
नियुक्ती करणे बाबत आणि ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे हे चेअरमन यांच्या
परवानगीने असे सभेत कामकाज होणार आहे.
0 टिप्पण्या