आष्टी (प्रतिनिधी)
कृषि वनशेती ,श्वाश्वत विचार, कृषी पर्यावरण संरक्षणासोबत आर्थिक
समृद्धी हे ब्रीदवाक्य घेऊन मिटकाॕन कंपनी कृषी क्षेत्रात विविध उपक्रम, योजना
शेतीउपयुक्त मार्गदर्शन करीत आहे. आष्टी येथे दि.२९ आॕगस्ट ते दि.१ सप्टेंबर या चार
दिवाशीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात स्टाॕल नं.५ वर शेतकऱ्यांसिठी विविध योजनांचे
मार्गदर्शन करणार आहेत. महोगनी वृक्ष लागवडीबाबत आष्टीच्या कृषी प्रदर्शनात
शेतकऱ्यांना मिटकाॕन कंपनीतर्फे माहिती मिळणार आहे.याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे
आवाहन जिल्हा समन्वयक रावसाहेब आघाव यांनी केले आहे. आजच्या मुख्य समस्यांमध्ये
'वैश्विक तापमान वाढ (ग्लोबल वार्मिंग) आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत
सापडलेली भारतीय शेती या प्रमुख समस्यावर मात करण्यासाठी महोगनी वृक्ष लागवड वन
शेतीचा स्वीकार शेतकऱ्यांनी केला तर आम्ही मिटकॉन नेचर बेस्ड सोलुशन या कंपनीच्या
माध्यमातून लागवड ते विक्री असे संपूर्ण मार्गदर्शन शेतकऱ्यांना करून पर्यावरण
संरक्षणाबरोबरच शेतकऱ्यांची आर्थिक समृद्ध होईल. 'महोगनी वृक्ष लागवड वनशेती
मार्गदर्शन' आष्टी येथील राज्यस्तरीय डाॕ,स्वामीनाथन कृषी प्रदर्शनात होणारा
आहे.शेतकऱ्यांनी या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.वनशेती कृषी
वानिकी,कार्बन क्रेडिट आणि संपूर्ण उपक्रमाची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना
प्रदर्शनात मिळणार आहे.कृषि-वानिकीकडे कार्बन क्रेडिट मिळवून देणारे आर्थिक
उत्पन्नाचे साधन म्हणून पाहिले जाते.कार्बन क्रेडिट प्रणालीची संकल्पना अधिकृतपणे
क्योटो प्रोटोकॉल (१९९७) मध्ये औपचारिकपणे मांडण्यात आली, ज्यामध्ये उत्सर्जन कमी
करण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन दिले जाते.शेती व्यवसायातील हंगामी पिके,फळबाग व
वृक्ष लागवड यात महोगनी,आंबा, सागवान,पेरू,फणस इत्यादींना कार्बन क्रेडिटच्या
उत्पादनामुळे ऊर्जितावस्था मिळते.वनस्पती वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून
त्याचे रूपांतर कर्बरूपी घन पदार्थात करून तो खोड,फांद्या,मातीमध्ये वृक्ष,साठवतात.
कृषि-वानिकीचे योग्य व्यवस्थापन केल्यास प्रति एकरी प्रतिवर्षी १०-२० टन चौथ्या
वर्षापासून कार्बनचे स्थिरीकरण होत असल्याचे अभ्यासावरून लक्षात येते.बिया:
बियांमधील औषधी गुणधर्मामुळे त्यांचा औषध निर्मितीसाठी वापर केला जातो.
उदा.डायबिटीज,संधिवात, संधिरोग,अतिसार,ताप,मलेरिया, कॅन्सर,अॕनिमिया,खोकला आणि उच्च
रक्तदाबसाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो.बियांच्या या औषधी गुणधर्मामुळे त्यांना
बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे.लाकूड: महोगनी लाकडामध्ये लालसर रंग,उच्च
मितीय स्थिरता आणि टिकाऊपणा हे गुण असतात.बांधकाम,प्लायवूड, फर्निचर आणि कॅबिनेट
बनवण्यासाठी तसेच पॅनेलिंग, फ्रेमिंग,फ्लोअरिंग, ऑटोमोबाईल बॉडी,बोटींचे इंटीरियर
ट्रिम,संगीत वाद्य मॉडेलिंगसाठी महोगनी लाकड उपयुक्त आहे.आपला भारत देश कृषीप्रधान
देश आहे.भारत देशामध्ये लाकूड हे खाद्यतेलानंतर दुसऱ्या क्रमांकावर आयात केले
जाणारी वस्तू आहे.भारतातील लाकूड-आधारित उद्योग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेत
महत्त्वपूर्ण योगदान देणारा आहे आणि शहरी लोकसंख्येला कायमस्वरूपी आणि हंगामी
दोन्ही प्रकारे रोजगार प्रदान करतो.बांधकाम,कागद,प्लायवूड, फर्निचर,शेतीची अवजारे,
हस्तकला आणि खेळणी यांचा समावेश असलेल्या विविध प्रकारच्या अंतिम वापरांची पूर्तता
केल्यामुळे भारतातील लाकडाची बाजारपेठ लक्षणीय आहे.
0 टिप्पण्या