Ticker

6/recent/ticker-posts

घुले पाटील शालेय युवा महोत्सवात कु.सिद्धी चाटे हीचा सत्कार संपन्न

आष्टी (प्रतिनिधी) लोकनेते स्व.मारोतराव घुले पाटील स्मृती आयोजित निबंध स्पर्धेत येथील रेसिडेन्सीअल हायस्कूलची विद्यार्थिनी कु.सिद्धी बिभिषण चाटे ही उत्कृष्ट निबंध लेखनाची मानकरी ठरल्याबद्दल तिचा घुले पाटील शालेय युवा महोत्सवात माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील, आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील, सभापती क्षितिजभैया घुले पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम प्रदान करून रविवारी येथे गौरव करण्यात आला.स्व. मारोतराव घुले पाटील स्मृती दिनाच्या निमित्ताने आयोजित निबंध स्पर्धेत इयत्ता नववी ते बारावी गटात शेवगाव येथील रेसिडेन्सीअल हायस्कूलची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी की.सिध्दी चाटे ही अव्वल‌ ठरली आहे.सिद्धी चाटे हिस मुख्याध्यापक गायकवाड, वर्गशिक्षक मिसाळ यांच्यासह गुरुजनांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल राष्ट्रपती पदक आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक संदीप पवार,आमदार संजयभाऊ दौंड,डॉ. नितीन चाटे,मुख्याध्यापक आबासाहेब गोपाळघरे, मुख्याध्यापक दिलीप कंठाळे,ॲड.गोविंदराव फड, नॉलेज प्लांटचे विठ्ठल जायभाये, गीतांजली जायभाये, पोलिस उपायुक्त लता फड, कृषी विस्तार अधिकारी शकुंतला आंधळे, सर्जेराव वारे, ग्रामसेवक सविता वारे, सहाय्यक नियोजन अधिकारी राधाकृष्ण ईघारे,पत्रकार
उत्तम बोडखे,तलाठी प्रवीण सानप, भाग्यश्री सातपुते,पो. कॉ. भाग्यश्री सानप, घुगे सर, विकास शिरसाठ,गीता नागरगोजे, कॅनॉल इन्स्पेक्टर राजेंद्र दराडे, संगीताताई दराडे, बाळासाहेब सानप, सौदागरराव चाटे, सविताताई सोनवणे, वैजनाथराव पाटील, प्रा.शितल सोनवणे, प्रा.लहु मुंडे, डॉ.संजय तांदळे, प्रा.सीमा घोलप, प्रणिता पवार, वैशालीताई जाधव, प्रा.स्वप्नाली सानप, आदी सह शिक्षण क्षेत्रातील समाजधुरिणांनी सिद्धी चाटे चे अभिनंदन केले आहे. चौकट -------- प्रगती आणि जरेवाडी मॉडेल स्कूलची माजी विद्यार्थिनी! .................................. कु. सिद्धी चाटे ही जरेवाडी मॉडेल स्कूल आणि बीड येथील प्रगती विद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. गायन क्षेत्रातही तीचे योगदान आहे. दरम्यान, या दोन्ही गुणवंत शाळेच्या शिक्षक वृंदांचे मोलाचे मार्गदर्शन या यशासाठी उपयुक्त ठरले असल्याची भावना यावेळी कु.सिध्दी हिने व्यक्त केली. राज्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याचा इतिहास!* --------------------------------------- २०२०-२०२१ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत कु. सिद्धी चाटे राज्यात प्रथम आली होती. त्यावेळी शिरूर येथे तिचा भव्य सन्मान करण्यात आला होता. सुंदर हस्ताक्षर आणि प्रतिभाशाली संकल्पना ही तिची जमेची बाजू आहे असे तिचे मार्गदर्शक अरुण घोळवे‌ यावेळी म्हणाले. ----------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या