
आष्टी ( प्रतिनिधी )
वंचित व गरजवंत यांच्यासाठी धावून जाणे हा ज्यांचा पिंडच
राहिला आहे असे सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासू व्यक्तिमत्व ॲड.प्रदीप चव्हाण यांनी
आष्टी, शिरूर ,पाटोदा विधानसभा मतदार संघातून शरदचंद्र पवार गटातून उमेदवारीसाठी
प्रबळ दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रदीप चव्हाण यांनी संघर्षयोद्धा मनोज
जरांगे पाटील यांचीही नुकतीच भेट घेतली आहे.विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यापासून
इच्छुक उमेदवार मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. आष्टी,शिरूर,पाटोदा मतदार संघातही
अनेक अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. जो तो आपापल्या सोयीच्या पक्षाकडून
उमेदवारी मिळण्यासाठी चाचपणी करत आहे.शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी
अनेकजण इच्छुक आहेत परंतु इच्छुकांच्या या भाऊगर्दीत ॲड.प्रदीप चव्हाण यांचीच
दावेदारी प्रबळ समजली जात आहे कारण राजकारणात येऊन स्वतःचे प्रस्थ वाढवणारे अनेक
असतात परंतु राजकारण हे लोककल्याणाचे प्रभावी माध्यम आहे याचे भान असणारे
व्यक्तिमत्व फारच दुर्मिळ झाले आहे.ॲड.प्रदीप चव्हाण हे असेच एक दुर्मिळ व फक्त
लोकहिताला प्राधान्य देणारे व्यक्तिमत्व आहे. प्रदीप चव्हाण यांनी शरद पवार गटाकडून
उमेदवारीसाठी दावा केला आहे त्यांची एकूण पार्श्वभूमी बघता त्यांनाच उमेदवारी
मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर गरजवंत मराठ्यांसाठी लढणारे
संगर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचीही ॲड.प्रदीप चव्हाण यांनी नुकतीच भेट घेतली
आहे. जरांगे पाटील व प्रदीप चव्हाण यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते.
पक्षाकडून ॲड.प्रदीप चव्हाण यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत
निश्चित असतानाच प्रदीप चव्हाण यांचा अभ्यास शेतक-र्यांच्या प्रश्नावरील अभ्यास,
वकीली व्यवसाय असल्याने कायदेशीर ज्ञान,आंबेडकरी विचारांचा प्रभाव असल्याने सर्व
जाती आणि धर्मांना सोबत घेऊन चालण्याची तळमळ,जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची
हातोटी,समाजाबद्दल असलेली त्यांची तळमळ पाहता त्यांच्या दावेदारीने मतदारांमध्येही
उत्साहाचे वातावरण पसरले आहे. प्रस्थापितांच्या राजकारणाला झुगारून आष्टी मतदार
संघाला खऱ्या अर्थाने विकासाकडे घेऊन जाणारा मोहरा ॲड. प्रदीप चव्हाण यांच्या
रूपाने मिळत असल्याची लोकभावना मतदार संघात दिसत आहे.ॲड. प्रदीप चव्हाण हे अनेक
वर्षापासून सामाजिक व राजकिय क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यामुळे त्यांना मतदारांची
साथ व प्रतिसाद मिळत आहे.
0 टिप्पण्या