

आष्टी (प्रतिनिधी)
कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन शिकायला
मिळते. विचाराची देवाण घेवाण होते.आजचा ग्राहक हा चोखंदळ आहे.शेतकऱ्यांनी आधुनिक
पद्धतीने शेती करून नंबर एकचा माल निर्माण करून मार्केटिंग करायला शिकल्यास निश्चित
आर्थिक फायदा होईल. फळबागा,फुलांची शेती व इतर शेती उत्पादनासाठी केंद्र सरकार
करोडो रुपये खर्च करते.शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास चांगले उत्पादन
मिळुन चांगले भाव देखील चांगला मिळतो.शेती उत्पादन वाढीसाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी
जमिनीची तपासणी करून घेणे गरजेचे आहे.शेतीसाठी गोमूत्र वापरल्यास उत्पादन वाढीसाठी
फायदा होतो. पौष्टिक अन्न मिळते.माजी आ. भीमराव धोंडे व डॉ.अजय धोंडे यांनी
आष्टीसारख्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी चांगले कृषी प्रदर्शन भरवले त्याबद्दल
आपण मनापासून कौतुक करत आहोत,अभिनंदन करतो असे सांगत आधुनिक पद्धतीने शेती करुन
दर्जेदार शेतीमाल निर्माण करून मार्केटिंग करावी असे आवाहन उपमुख्यमंत्री ना.अजित
पवार यांनी केले. आष्टी, पाटोदा, शिरूर मतदार संघाचे माजी आ.भीमराव धोंडे यांच्या
संकल्पनेतून कृषी महाविद्यालयाच्यावतीने डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय दुसरे कृषी
प्रदर्शन भरवण्यात आले आहे.या प्रदर्शनास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, बीडचे
पालकमंत्री तथा कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी भेट दिली. यावेळी व्यासपीठावर
आयोजक माजी आ.भीमराव धोंडे,आ.बाळासाहेब आजबे,जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉ.शिवाजी
राऊत, जिल्हा परिषद सदस्य सतीशआबा शिंदे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब
शिंदे, स्वागताध्यक्ष डॉ.अजयदादा धोंडे, अभयराजे धोंडे, लालाभाऊ कुमकर, रिपाइंचे
तालुकाध्यक्ष अशोक साळवे, सतीषमामा झगडे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, रघुनाथ
शिंदे,बाबु कदम, सदा पाटील दिंडे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री
अजितदादा पवार,पालकमंत्री धनंजय मुंडे व आ. बाळासाहेब आजबे यांचे माजी आ. भीमराव
धोंडे व अजयदादा धोंडे यांनी स्वागत केले. पुढे बोलताना ना.अजितदादा पवार म्हणाले
की,अशा कृषी प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात चांगली भर पडते.नवनवीन माहिती
मिळते. शेतकऱ्यांनी काळानुरूप बदलले पाहिजे.आपल्या मानसिकतेत बदल करावा लागेल तरच
शेती उपयुक्त व फायदेशीर आहे.कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन माहिती मिळते
तसेच वेगवेगळे अवजारे,वस्तू, पदार्थ पाहायला मिळतात.डॉ.स्वामीनाथन यांनी
शेतकऱ्यांसाठी भरीव असे कार्य केलेले आहे.ते एक दैवी शक्ती होते असे अजितदादा पवार
म्हणाले. यावेळी कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे म्हणाले की,परळीत गेल्या आठवड्यात कृषी
प्रदर्शन झाले आहे.आष्टी येथे लगेच होत आहे.बीड जिल्ह्याच्या दृष्टीने एकाच
महिन्यात दोन ठिकाणी प्रदर्शन होत आहे.ही चांगली बाब आहे. प्रदर्शनामुळे
शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर देशमुख
यांनी तर आभार माजी आ.भीमराव धोंडे यांनी मानले.यावेळी कार्यक्रमास शेतकरी
परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या