विशेष लेख
------------
प्रा.अनंत हंबर्डे ,आष्टी .
------------------
शेतक-यांचा ध्यास असलेले
शेतकरी व शेतकरी नेते भीमराव धोंडे " हंबर्डे, आष्टी




जिल्हा परिषदेच्या शाळेतून श्री.भीमराव धोंडे यांनी दहावीची परीक्षा दिली.त्या
शाळेला शिक्षक नव्हते.ते नीट शिकवीत नव्हते. ह्याचा अर्थ असा होता की,शाळेचे
सर्वच्या सर्व परीक्षेत हमखास नापास होणार;भीमराव धोंडे यांनी परीक्षा दिली अन्
परीक्षा विसरून गेले.त्यांना मॅट्रिकला नापास होण्यातच आनंद होता.परीक्षेचा निकालही
बघायचा नव्हता;सर्जेराव बोडखे यांनी त्यांचा निकाल बघितला.शाळेतून मॅट्रिकला सर्व
मुलापैकी एकटेच भीमराव धोंडे पास झालेले होते;भीमराव धोंडे पास झाले आहे हा निकाल
सांगायला बोडखे रूईला त्यांच्या गावी गेले.तेव्हा भीमराव धोंडे शेतात दारे धरीत
होते;पास झाल्याचा निकाल ऐकल्यावर भीमराव धोंडे यांची प्रतिक्रया काय होती ? ते सरळ
सरळ रडायला लागले.कारण त्यांना मॅट्रिकला नापास व्हायचे होते.नापास होवून चांगली
शेती करायची होती; पास झाल्यामुळे वडील आनंदराव उर्फ बाबाजी धोंडे आता त्यांना
शिकायला शहरात पाठवतील.मग शेतीशी असलेले सख्य दुरावेल म्हणून भीमराव धोंडे रडले
होते;शेतीला " आईचा " दर्जा देणारा हा शेतकऱ्याचा शेतकरी पुत्र.घरी मोठे एकत्र
कुटुंब, बैलबारदाना,गाया,म्हशी,संत सावतामाळी यांच्या अभंगाची अनुभूती
घेत,कांदा,मुळा,भाजी,ह्यातच विठ्ठल रूक्मिणी असतात; श्रमाची प्रतिष्ठा
जपलेला,श्रमामध्येच राम मानणारा भीमराव धोंडे यांचा पिंड वाढत होता.आता पास
झाल्यामुळे नगरला शिकायला जावे लागले.भीमराव धोंडे यांचे माध्यमिक शाळेतील शिक्षण
आष्टी हायस्कूल, कडा येथील अमोलक विद्यालय,चोभा निमगाव अशा ठिकाणी झाले;आष्टी
हायस्कूलला मी त्यांना शिक्षक होतो.मी त्यांना शिकविले असल्याची आठवण ते अधूनमधून
सांगतात.कड्याला शाळेतील एक शिक्षक त्यांना म्हणाला, 'तू धडधाकट आहेस,कशाला शिकतोस?
हमाली कर. चार पैसे मिळतील असे म्हणणाऱ्या शिक्षकाची त्यांनी ती शाळाच सोडून
दिली.भविष्यात त्या शिक्षकासारख्या हजार शिक्षकांचे ते मालकच झाले; नियती अशी
असते.असा त्या शिक्षकावर सूड घेतला.नगरला प्रचार्य श्री हरिभाऊ तोडमलाच्या न्यू
आर्टस,कॉमर्स कॉलेजमध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाले; वडिलासारखी
म्हणजे श्री.आनंदराव धोंडे यांच्यासारखी बलदंड शरिरयष्टी भीमराव धोंडे यांना
लाभलेली होती. मुळात भीमराव धोंडे कुशाग्र बुद्धी असलेले,एकपाठी विद्यार्थी होते;
वर्गात अन् महाविद्यालयामध्ये भीमराव धोंडे व सर्व
विद्यार्थी,प्राध्यापक,प्राचार्य, स्टाफमध्ये ओळखले जाऊ लागले; शेतीची आवड संपली
नव्हती.पण खेळाकडे मन रमले.कुस्ती,धावणे, कबड्डी ह्या खेळात त्यांनी महाविद्यालयाचे
नेतृत्व विद्यापीठात अन विद्यापीठाचे नेतृत्व देशपातळीवर केले; तसे पाहता भीमराव
धोंडे ज्या महाविद्यालयात शिकत होते, त्या महाविद्यालयात जवळपास शेतकऱ्यांचेच मुले
शिकत असायचे; ह्या कॉलेजचे प्राचार्य डॉ.श्री.हरिभाऊ तोडम यांच्याकडे मी काही दिवस
माझ्या प्रबंधाचे काम करीत होतो; माझा त्यांच्याशी चांगला परिचय होता; मी महिनाभरात
त्यांना भेटायला जायचो, तेव्हा प्राचार्य माझ्या प्रबंधाइतकेच ते भीमराव धोंडे
यांच्याबद्दल अत्यंत कौतुकाने बोलायचे;मला म्हणायचे तुझ्या " भीमाने "
विद्यापीठातून ही शिल्ड आणली.तो चषक आणला ; प्राचार्य गुण ग्राहक होते.कदरदान
होते.स्वतः कधी काळी कुस्ती खेळलेले होते.भीमराव धोंडे ह्या कॉलेजचे सर्वात प्रिय
राहिले हे सविस्तर लिहिण्याचे कारण, आधीच श्री धोंडेसाहेबांचे शती, माती हे
प्रितीचे विषय कॉलेज मधील स्टॉफ शेतकरी,शिकणारे शेतकरी, हे त्यांच्या विचाराला,
मनाला जणु कोंदणच लाभले; भीमराव धोंडे महाविद्यालयातील सर्वांच्या गळ्यातील ताईत
होते; इतकेच काय तर नगरमधील तालमीतील मल्ल ही त्यांचे मित्र झाले; शिकत असताना
त्यांची माझी एकदा दिल्ली दरवाज्याजवळ भेट झाली.त्यांच्या हातात वह्या पुस्तके
होते.मला त्यांनी चहाचा आग्रह केला. हॉटेलमध्ये मला म्हणाले, 'मला आष्टीच्या
विधानसभेच्या निवडणूकीला उभे रहायचे आहे, मी हे त्यांचे विचार ऐकूण गडबडलो.त्यांना
म्हणालो,तुझा हात दाखव बरं; तू उभा राहून काय काम करणार आहेस? त्यांचे उत्तर
होते,शेतक-यांसाठी काम करणार आहे शेती, शेतकरी हा विषय त्यांच्या डोक्यातील पक्का
विषय आहे; त्यांनी कॉलेजमध्ये शेतकरी मित्र मंडळ स्थापन केले.ह्या मंडळात आष्टी
तालुक्यातील नगरला शिकणाऱ्या मुलांचा अंतर्भाव होता; ह्या मंडळातील मुलांना एका
ट्रकमध्ये बसवून गावी हुरडा खाण्यासाठी, यात्रेसाठी भीमराव धोंडे घेवून येवू लागले.
नगरमध्ये सतत मित्रांच्या घोळका भीमराव धोंडे यांच्याभोवती राहू लागला. अॕड.शहाजी
गव्हाणे सांगतात,न्यू आर्टस काॕलेजमधील प्राध्यापक म्हणत होते,'भीमा चितळे रोडवरून
चालला तर जणू कोंबडा चालतो असा डुलत चालतो. त्याच्याभोवती दहा बारा मुले सततच
राहतात.विधानसभेची १९८० सालची निवडणूक जिंकली ती शेतकरी 'संघटने' च्या नावावर
लढविलेली होती;मावळे होते ते सर्वच्या सर्व शेतक-यांची पोरे होती; दूध संस्था काढली
ती ही शेतकरी दूध संस्था; शिक्षणाचे आज मतदार संघात जाळे विणलेले आहे.ह्या संस्थेचे
नाव ही 'शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ ' असे आहे.संस्थेला त्यांचे स्वतःचे नाव देता
आले नसते काय? पण शेतकरी' ह्या शब्दाशी थांबे खेळ धोंडेसाहेबांचा त्यांचे "शेती वेड
" किंवा छंद मला जवळून माहीत आहे.मला शेतीचा छंद होता.पण मी १५ एकर जमीन
मालक.कोणत्याही क्षेत्रात भीमराव धोंडे यांना नंबर दोन असणे मान्य नसते. त्यांना जे
करायचे असते ते भव्यदिव्य अन कुणाहीपेक्षा अचाट,अन अफाट करायचे असते; शेतीसंबंधी
त्यांचे ज्ञान ही अफाट आहे.वाचन अफाट आहे.त्यांने इस्त्राईलची शेती बघितलेली आहे;
वेगवेगळ्या प्रगत शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देण्याचा त्यांचा एक उपक्रम असतो.मला
एकदा म्हणाले,प्रत्येकाने आपापल्या घरापुढे नारळाचे झाड लावले तर काय होईल?
डोईठाणहून येत होतो,तेव्हा म्हणाले (बावी किंवा किन्हीच्या कुठे तरी) इथे शेवग्याची
सात एकर शेती केली आहे.आपण बघू.मी म्हणालो नंतर बघू.एकदा त्यांना आवळ्याची शेती
करायची होती.मला म्हणाले,आवळ्याच्या पावडरचा कारखाना काढता येईल.आता लिंबाची शेती
केली आहे; चोभा निमगाव अन नांदा इथे मला शेती दाखवायला नेले होते.मी म्हणालो सगळे
चांगले आहे.अन बांधावर बसलो.त्यांच्या शेतकरी शिक्षण संस्थेत जवळपास शेतकऱ्यांचीच
मुले शिकतात. योजना राबविणे,बक्षिसे जाहीर करणे हे असे शेती आणि शेतकऱ्यां संबंधीचे
वेड त्यांना स्वस्थ बसू देत नाही.कुकडीने पाणी आष्टीच्या शेतीला मिळायला पाहिजे
म्हणून एप्रिल महिन्यात आष्टीहून मुंबईला ३६० कि.मी.पायी मोर्चा मंत्रालयावर
नेला.लोकनेते गोपीनाथराव उपमुख्यमंत्री होते. मोर्चाला सामोरे आले.त्यांनी आष्टी
तालुक्याला अर्धा टी.एम.सी.पाणी देण्याचा करार केला;शेतीला मातीला पाणी त्यासाठी
पायी मोर्चा चालतांना पायाला फोड आले. फोड फुटले.भीमराव धोंडे हे चालतच
राहिले.अर्धा आष्टी तालुका सैनिकी करणासाठी ताब्यात घेण्याची प्रक्रियाजवळ जवळ
पूर्ण होत आली होती.आष्टी तालुक्यातील सुमारे १०० गावांची शेती,शेतकरी विस्थापित
होणार होते.आष्टी ते दिल्ली असा १६०० कि.मि.चा पायी मोर्चा संसदेवर भीमराव धोंडे
यांनी नेला.आष्टी तालुक्यातील निम्मी शेती,शेतकरी त्यामुळे वाचले.गेल्यावर्षी
त्यांचे शेतीप्रदर्शन भरविण्याच्या आधी मला सारखे सारखे,डाॕ.स्वामिनाथन बद्दल बोलत
राहिले.त्यांना स्वामिनाथनचे पूर्ण नाव 'मान कबू सांबशिव स्वामिनाथन' हे माहित
होते.ते म्हणाले त्यांच्या संशोधनामुळे त्यांच्या कार्यामुळेच भारत देशात
अन्नधान्याची क्रांती झाली; नाही तर ७२ सालापुर्वी लोक अन्नान करीत होते.त्यांना
भारत सरकारने 'भारतरत्न' दिले पाहिजे; मला त्यांची स्वामिनाथन बद्दलची आंतरिक तळमळ
कळत होती; त्यांनी त्यांच्या कृषी प्रदर्शनाला डाॕ.स्वामिनाथन ह्यांचेच नाव
दिले,महिना भरातच जणु त्यांची भावना श्री नरेंद्र मोदीजी पंतप्रधानाला उमगली
असावी.डाॕ.स्वामिनाथन ह्यांना 'भारतरत्न' प्रदान करण्यात आले; भीमराव धोंडे
कार्यक्रमात फेटा बांधतात तो निव्वळ शेतकऱ्यांच्या सारखाच बांधतात; नखरेल फेटा तर
पंचेचाळीस वर्षाच्या राजकीय पदाच्या सवयीने नक्की बांधता आलाच असता; त्यांच्या
वडिलाने बांधला तसा,म.फुले यांनी बांधला तसा; शेतकरी बांधतात तसाच फेटा भीमराव
धोंडे नावाचे शेतकरी' बांधाता.कारण त्यांची शेतीशी नाती मातीशी नाती आणि ह्या
सर्वाबरोबर प्रीती आहेच आहे.त्यांच्या कृषी प्रदर्शनाचे मनापासून अभिनंदन,मी एकदा
त्यांना म्हणालो होतो; 'आपली शेतकरी संघटना विसर्जित करू नका.आष्टी मतदार संघापुरती
आपली शेतकरी संघटना असावी,राजकीय पक्ष कोणतेही असतील नसतील.शेतकरी आष्टी 'मतदार संघ
संघटना' अशी असावी.भविष्यात अन् केव्हाही तिचा उपयोग होईल.भविष्यासाठी हा हुकमी
एक्का हाती असेल....
या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास माझ्या व दैनिक झुंजारनेता
परिवाराच्यावतीने हार्दिक शुभेच्छा ...
लेखक - प्रा.अनंत हंबर्डे (सर) (जेष्ठ
पत्रकार,आष्टी)
-----------------------------------------
0 टिप्पण्या