Ticker

6/recent/ticker-posts

कर्मवीरांचा ज्ञानदान आणि संस्काराचा वसा चालवणारे शिक्षण यात्री; लोकनेते भीमराव धोंडे.

अडाणी,अज्ञानी, गोरगरीब, सर्वसामान्य माणसांच्या जीवनात शिक्षणाच्या माध्यमातून क्रांती करण्याचे स्वप्न मनी बाळगून गेल्या चार दशकावून अधिक काळ सातत्याने प्रचंड कष्ट, मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर जनतेचे नेतृत्व करीत त्यांच्या मुलाबाळांना खऱ्या अर्थाने स्वावलंबी जीवनाचा मार्ग लावून शिक्षण संस्थेच्या रूपातून ज्ञान आणि संस्काराचे धडे देण्यासाठी अहो रात्र धडपडणारे शिक्षण महर्षी म्हणून आष्टी,पाटोदा, शिरूर विधान सभा मतदार संघाचे माजी आमदार लोकनेते भीमराव धोंडे यांच्या नावाचा एक वेगळा लोकप्रियतेचा ठसा बीड जिल्हाभर आहे. शिक्षण ही एक पवित्र संस्था आहे.तेथे माणसांची मने सुसंस्कृत होतात.उदात्त होतात.राष्ट्रीयता आणि मानवता निर्मितीचे ते ठिकाण आहे असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते.यासाठी सामान्य माणसाला शिक्षण सुलभ होईल अशी व्यवस्था झाली पाहिजे या गोष्टीवर स्वतःचा ठाम विश्वास ठेवून आष्टी,पाटोदा, शिरूर विधानसभा मतदार संघाचे लोकनेते माजी आ.भीमराव धोंडे यांनी प्रारंभीपासूनच भर दिला.महाराष्ट्रात ते असे काम जेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांनी केले तो त्यांचा आदर्श शिरसावंद्य मानून माजी आ.भीमराव धोंडे यांनी शिक्षण प्रसाराच्या कामात पुढाकार घेऊन गोरगरीब सर्वसामान्यांची मुले शिकली पाहिजेत.हा निश्चय मनी ठेवून अनेकांना शिक्षणातून स्वालंबनाचे नवे क्षितिज निर्माण केले. शिक्षणातून समतेचा वसा! ------------------------------ शिक्षणातून खालचा वर्ग वरच्या वर्गाच्या पातळीवर यावा अशी भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची तळमळ होती.शिक्षणातून त्यांना समता निर्माण करायची होती.शिक्षणातून समतेचा लढा गतिमान करण्याचे काम हे जसे कर्मवीरांनी अस्थेने केले.समतेच्या लढ्यासाठी भाऊरावांनी लोकशिक्षणाची लाट निर्माण केली. शिक्षणाची गंगा मागास असलेल्यांच्या भागात जाऊन पोहोचविली.तोच आदर्श अत्यंत प्रामाणिकपणे लोकनेते भीमराव धोंडे यांनी पाळला. माजी आ.धोंडेंमुळे आष्टी तालुक्याचा शैक्षणिक उद्धार! ------------------------------- आष्टी तालुक्यातील विविध गाववाड्यावर वस्तीवर प्राथमिक माध्यमिक,उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयांची स्थापना करून त्यांनी शिक्षण क्षेत्र गरिबांच्या घरी पोहोचविले! यातून अनेक जण डॉक्टर,इंजिनियर, वकील,शिक्षक,प्राध्यापक,प्राचार्य यासारख्या पदावर पोहोचून शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उद्धार केला.एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांची मुले सैन्य पोलीस आदी सह विविध संरक्षण क्षेत्रात धोंडेसाहेबांमुळे पोहोचली आहेत. कला,संस्कृती आणि व्यायाम शाळांची उभारणी ------------------------------ अनेक ठिकाणी व्यायाम शाळा भव्य क्रीडांगणे ही धोंडेसाहेबांच्या संस्थांची प्रमुख वैशिष्ट्य राहिलेले आहेत.भव्य दिव्य इमारत आणि तत्न शिक्षक प्राध्यापक वर्ग यामुळे गुणवत्तेचे सातत्याने त्यांच्या लवलेश सर्वांना दिसून आले आहेत. सांस्कृतिक क्षेत्रातील दैदीप्यमान असा इतिहास हा संस्थेस धोंडेसाहेबांच्या संस्थेने केलेला आहे.अनेक कलावंत या संस्थेतून निपजल्याची उदाहरणे आपल्या दृष्टीक्षेपात आहेत.अनेक मल्ल व्यायाम शाळेतून घडून मोठमोठ्या पदावर आणि स्पर्धेतून यशस्वी झाल्याचेही आपल्या समोर आहेत.बलदंड शरीराचे निरोगी तरुण त्यांच्या संस्थेतून पुढे आले आहेत.पैलवान तरुणांना मोठे स्थैर्य निर्माण व्हावे यासाठी आर्थिक मानसिक सामाजिक पाठिंबा दिला आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे अत्यंत जिवलग स्नेही! ------------------------------- लोकनेते गोपीनाथ मुंडेसाहेब यांच्याशी अत्यंत प्रामाणिकपणे निष्ठा ठेवून माजी आ.भीमराव धोंडे यांनी अखेरपर्यंत कार्य केले.दुर्दैवाने मुंडेसाहेबांच्या निधनानंतरही कसलाच स्वार्थ मनात न आणता धोंडेसाहेबांनी मुंडेसाहेबांच्या सुकन्या खा.डॉ. प्रीतमताई मुंडे आणि लोकनेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याशी अत्यंत प्रमाणिकपणे राहून त्यांचे आदेश पाळलेले आहेत. धैर्यवान,तेजस्वी नेतृत्व! ------------------------------ लोकनेते भीमराव धोंडेसाहेब यांच्यावर कितीही वादळं आली तरी मोठ्या धैर्याने त्याला तोंड दिले आहे म्हणूनच तर त्यांना एक तेजस्वी आणि पाणीदार नेतृत्व म्हटले जात आहे. आष्टी,पाटोदा आणि शिरूर विधानसभा मतदार संघातील गोरगरिबांच्या विकास कामांचा ध्यास त्यांनी घेतला आहे.आपल्या पदाचा,सत्तेचा उपयोग मतदार संघातील जनतेला झाला पाहिजे अशी भावना असलेले लोकनेते,शिक्षण महर्षी आहेत. निष्ठावंत,संयमी नेते म्हणून महाराष्ट्र प्रतिमा! ------------------------------ एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून धोंडेसाहेबांची प्रतिमा आजही महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. राजकारणाविषयी सद्यस्थितीत अत्यंत चिड निर्माण झालेल्या आवस्थेतसुद्धा एक शांत,संयमी, निष्ठावंत राजकारणी म्हणून माजी आमदार भीमराव धोंडे यांची प्रतिमा अत्यंत आदर्श आणि प्रेरणा घेण्यासारखी आजच्या युवकांसाठी आहे. विकासाचा ध्यास; पंकजाताई आणि प्रीतमताईंची सख्य ------------------------------- गेल्या ४० वर्षाहून अधिक काळ राजकारण करताना त्यांनी केवळ विकासाचा ध्यास घेतला.रस्ते पाणी वीज,कामगार शेतकरी आणि लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी परिश्रम घेतले.आष्टी ते दिल्ली असा ऐतिहासिक मोर्चा काढणारे व इतिहासात नोंद घेणारे ते नेते ठरले आहेत.एक आदर्श राजकारणी म्हणून ही धोंडे साहेबांकडे आशेने पाहिले जाते.तीन-चार वेळेस विधानसभेमध्ये प्रचंड मताने निवडून जाऊनसुद्धा केवळ विकास मनी धरला. कधीच स्वार्थ म्हणून मंत्रीपदाची अपेक्षा केली नाही, आणि तशी आग्रही मागणीही केली नाही.राजकारणी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे भीमराव धोंडे आहेत असे म्हटले तर ते अतिशयोक्ती होणार नाही.आष्टी, पाटोदा,शिरूरसारख्या विस्तीर्ण मतदार संघांमध्ये गावोगावी खेडं वाडी रस्त्यावर धोंडेसाहेबांचे नाव आदराने घेतले जाते ते यामुळेच! निस्वार्थपणे काम करताना सर्व जाती धर्मपंथांना घेऊन धोंडेसाहेब सातत्याने पुढे जात असतात त्यामुळेच सर्वसामान्य गोरगरीब कार्यकर्ता हा धोंडेसाहेबांचा आहे तरीसुद्धा त्यांच्याशी निष्ठेने एकरूप आहे. माजी आमदार भीमराव धोंडे यांचा वाढदिवस हा गोरगरिबांसाठी दिवाळी आहे त्यांना प्रदीर्घ आयुष्य लाभो,धोंडेसाहेब हे सर्व सामान्यांसाठी सावली आहेत! ही सावली अखंड राहो... दैनिक झुंजारनेता परिवाराच्यावतीने या लोकनेत्यास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ... ---- उत्तम बोडखे,(उपसंपादक) ------------------------------- ​भरत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या