
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी,पाटोदा, शिरूर मतदार संघांमध्ये अनेक दिवसापासून विजेचा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत होता शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडवणीस व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे नवीन सब स्टेशन व आष्टी येथे ५० केवीचे ट्रांसफार्मर साठी काही दिवसांपूर्वी मागणी केली होती त्या मागणीचा विचार करून आष्टी मतदार संघासाठी ऊर्जा विभागाकडून सुधारित वितरण क्षेत्र अंतर्गत (आर डी एस एस )मोठ्या प्रमाणात नवीन सब स्टेशन सह इतर मागण्या मंजूर केल्याबद्दल मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या वतीने महायुती सरकारचे आभार व्यक्त करतो आपण मागणी केलेल्या सर्व बाबींनामंजुरी दिल्यामुळे आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील विजेता प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचेही यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.
षषशाशाआ.बाळासाहेब आजबे यांच्या प्रयत्नातून आष्टी पाटोदा व शिरूर तालुक्यासाठी सुधारित वितरण क्षेत्र अंतर्गत (आर डी एस एस अंतर्गत ) 09 नवीन ३३/११ के.व्हि.चे सब स्टेशनला मंजुरी मिळाली आहे.त्याचबरोबर सात अतिरिक्त भार असलेल्या ठिकाणी ५ एम.व्हि.ए. ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले आहेत आष्टी येथे ५० के.व्हि. चे ट्रान्सफार्मर व मागणी केल्याप्रमाणे तिन्ही तालुक्यातील गावांमध्ये ६५२ डीपींना मंजुरी देण्यात आली आहे, नवीन ३३/११के.व्हि. सब स्टेशनला मंजुरी मिळालेले गावे पुढील प्रमाणे दादेगाव, पारोडी, धनगर जवळका, पारगाव घुमरा, शिरूर कासार, बीडसांगवी ,कोयाळ, आंभोरा, मातकुळी या ठिकाणी नवीन सबस्टेशन तर अतिरिक्त भार असलेले पोखरी धानोरा दौलावडगाव रोहतवाडी कोतन व कुसलंब या ठिकाणी ५ एमव्हिएचे नवीन ट्रान्सफॉर्मर ला मंजुरी देण्यात आली आहे तर शेतकऱ्यांसाठी आष्टी तालुक्यात २७१,पाटोदा तालुका १४४ व शिरूर तालुक्यासाठी २३७ आशा ६५२ नवीन विद्युत रोहित्र मंजुरी देण्यात आली आहे.पुढे बोलताना आ. बाळासाहेब आजबे म्हणाले की गेल्या दोन महिन्यापूर्वी आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडवणीस व कृषी मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे शेतकऱ्यांकडून आलेल्या मागणीनुसार व तालुक्यातील विजेचा तुटवडा लक्षात घेत वरील बाबींची मागणी केली होती त्या सर्व बाबीचा विचार करून महायुती सरकारने सर्व मागण्यांना मंजुरी दिल्यामुळे आष्टी तालुक्यातील विजेचा प्रश्न सुटणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात विज मिळण्यास मदत होणार आहे.
0 टिप्पण्या