Ticker

6/recent/ticker-posts

लिंबोडी येथे आज विष्णू महाराज यांचे कीर्तन; शनिवारी महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे वेदांताचार्य वै.संत नारायण महाराज तारकेश्वरगडकर यांच्या कृपेने मठाधिपती आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वरगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि,१० ते दि.१७ आॕगस्ट या कालावधीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भावार्थ रामायण कथा हरिनाम सप्ताह होत आहे. या सप्ताहात काकडा भजन,विष्णु सहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण,तुकाराम गाथा भजन, भावार्थ रामायण कथा, हरिपाठ, हरिकीर्तन व हरिजागर आदि धार्मिक कार्यक्रम होत आहेत.सप्ताहात ह.भ.प. देविदास महाराज खिळदकर,ह.भ.प.सुरेश महाराज बडे (मुंबई ),ह.भ.प.राम महाराज शास्त्री (आळंदी),ह.भ.प. रोहिदास महाराजा शास्त्री (हातोला),येडेश्वरी संस्थानचे ह.भ.प.आदिनाथ महाराज यांचे हरिकीर्तन झाले.आज १५ आॕगस्ट रोजी रात्री ह.भ.प.रामगड संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.विष्णु महाराज लिंबोडीकर यांचे हरिकीर्तन होणार आहे.शुक्रवार दि.१६ आॕगस्ट रोजी रात्री नागतळा येथील ल
ा गणेशगडाचे महंत ह.भ.प. काशीनाथ महाराज यांचे हरिकीर्तन होणार आहे.शनिवार दि.१७ आॕगस्ट रोजी सकाळी १० ते १२ यावेळात तारकेश्वरगडाचे महंत ह.भ.प.आदिनाथ महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. यावेळी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, लोकनेत्या आ.पंकजाताई मुंडे, समाजसेवक विजय गोल्हार, माजी मंत्री सुरेश धस,आ.बाळासाहेब आजबे,माजी आ.भीमराव धोंडे,बीड जि.प.च्या अध्यक्षा सौ.सविताताई गोल्हार, सतिषआबा शिंदे ,चेअरमन आदिनाथ सानप ,पत्रकार आदि सामाजिक ,राजकीय ,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या