Ticker

6/recent/ticker-posts

घरमालकाने परवाना असलेल्या रायफलीतुन हवेत गोळीबार केल्याने दरोडेखोर पसार ...................... आष्टी पोलीसांनी तिघांना केले अटक

आष्टी (प्रतिनिधी) पहाटेच्या दरम्यान दरोड्याच्या तयारीत आलेल्या सहा जणांनी घरचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत सोनेनाणे काढून द्या आरडाओरड करू नका अशी धमकी देत धिंगाना घातला होता.मारहाण करून सोनेनाणे चोरीला जाईल.या भितीपोटी घरमालकाने परवानाधारक रायफलमधून हवेत गोळीबार केला आणि दरोडेखोरांचा प्रयत्न अयशस्वी झाला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तीन आरोपीच्या मुसक्या आवळल्या तर तिघे पळुन जाण्यात यशस्वी झाले.याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शुक्रवारी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टी तालुक्यातील किन्ही व केरूळ परिसरात दरोड्याच्या घटना घडल्याने पोलिस ॲक्शन मोडवर आले होते तर काही गावातील नागरिकांनी एकत्र येऊन गस्त सुरू केली. पोलिसही डोळ्यात तेल घालून दरोडेखोरांच्या मागावर होते. शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान चोभानिमगांव येथील माजी जि.प. सदस्य सतीश झगडे याच्या घरी कोयता,लोंखडी गज,गलवर, करवत घेऊन दरोड्याचा प्रयत्न करत असताना त्यानी परवानाधारक रायफलमधून हवेत गोळीबार केल्याने अनर्थ टळला आणि दरोडेखोर मोटारसायकलवरून सुसाट निघाले असता.भवरवाडी रस्त्यावर गस्तीवरील ग्रामस्थांनी यांना थांबवून हटकले. एवढ्यात यातील तिघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले तर पोलिसांना ही घटना समजाताच कसलाही विलंब न करता घटनास्थळी जाऊन तिघांना ताब्यात घेतले व सतीश झगडे याच्या फिर्यादीवरून शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील रोहित शंकर मोरे,किरण गुलाब मोरे,अजय सुखदेव शिंदे,अक्षय पवार,विशाल बर्डे,गुलाब मोरे याच्यावर दरोड्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आष्टीचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे करीत आहेत. चौकट ----------------- बीड जि.प.चे माजी सदस्य सतीशमामा झगडे या घटनेबाबत म्हणाले की,रात्री एक वाजण्याच्या सुमारास एक स्कॉर्पिओ आणि दोन मोटारसायकल आमच्या गावात आल्या. त्यांनी सर्वप्रथम विजपुरवठा करणाऱ्या डीपीतून विद्युतपुरवठा खंडीत केला.चोरांनी गावातील काही घरांची रेकी केली. त्यामध्ये आमच्याही घराचा समावेश होता.ते आमच्या घराजवळ आले तेव्हा कुत्रे त्यांच्यावर भुंकु लागले. त्यावेळी गुलेरीतून कुत्र्यांवर दगडांचा मारा करण्यात आला.त्यावेळी सतीशमामा झगडे झोपेतून जागे झाले. गच्चीवर जावून त्यांनी बाहेर पाहिले तर सहा ते सात दरोडेखोर त्यांना दिसले तेव्हा त्यांनी स्वतःच्या रायफलमधून हवेत गोळीबार केला. त्यावेळी दरोडेखोरांनी बंगल्यावर दगडांचा अंधाधुंद मारा सुरू ठेवला.त्यावेळी सतीषमामा झगडे न घाबरता त्यांचा मुलगा व भाचा हे घराच्या कंपाऊंडमध्ये आले आणि त्यांनी चोरटयांच्या दिशेने एक गोळी झाडली.झगडे कुटुंबीय मागे हटण्यास तयार नसल्याचे पाहून अखेर दरोडेखोर घटनास्थळा वरून पसार झाले.या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीसही घटनास्थळावर तात्काळ पोहचले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या