Ticker

6/recent/ticker-posts

मातकुळीचा आकाश डोंगरे यशस्वी ग्राफिक्स डिझाईनर

आईने बनवले,बाबांनी घडवले, आईने शब्दांची ओळख करून दिली, बाबांनी शब्दांचा अर्थ समजावला, आईने विचार दिले, बाबांनी स्वातंत्र्य दिले, आईने भक्ती शिकवली, बाबानी वृत्ती शिकवली, आईने लढण्यासाठी शक्ती दिली, बाबांनी जिंकण्यासाठी नीती दिली" वरील काव्य पंक्ती आकाश डोंगरे यांंच्याबाबत ख-या ठरतात.सातत्य,प्रचंड कष्ट,जिद्द,चिकाटी व सचोटीच्या जोरावर डिझाईनर झाला आहे. आष्टी तालुक्यात ग्राफिक्स क्षेत्रामध्ये आपले नाव अधोरेखित केले आहे.स्वतःच्या कुटुंबासह मातकुळी गावाचा नावलौकिक वाढविला.कलेच्या माध्यमातून नवा अध्याय रचणारा कलावंत आकाशचा नामोल्लेख करण्यासारखा आहे. नशिब हे लिफ्टसारखं असतं तर कष्ट म्हणजे जिना आहे. लिफ्ट कधीही बंद पडू शकते पण जिना (कष्ट) मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो... या काव्यपंक्तीप्रमाणे आष्टी तालुक्यातील मातकुळीसारख्या छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या तरुण कलावंत डिझाईनर आकाश डोंगरे याने आपल्या कलेच्या व कष्टाच्या जोरावर यशाचा जिना सर केला आहे. अगदी लहानपणापासूनच संघर्षाची बीजे नसानसात पेरलेल्या आणि त्याच्यात नाविन्य न राहता तो एक जीवनाचा भाग बनून सदैव त्याची सवय लागते तरीही अत्यंत परिश्रमपुर्वक कार्य करत प्रतिकूल परिस्थितीतून चिखलाच्या दलदलीतून सुंदर कमलपुष्प निर्माण करण्याची किमया मातकुळीतील डोंगरे कुंटुंबातील जिगरबाज कलाकर व्यक्तिमत्व डिझाईनर आकाश लक्ष्मण डोंगरे यांनी यशस्वी करून दाखवली आहे.आकाशचा जन्म दि.२२ आॕगस्ट १९९७ मध्ये गरीब शेतकरी कुटुंबात झाला.कोणताही कलाकार हा स्वछंदी आणि मुक्त स्वभावाचाच असतो.डिझाईनर आकाश डोंगरे हाही त्यातीलच एक... बोडखे प्रेसमध्ये हा फक्त डिझाईनरच नाही तर दत्ताभाऊ बोडखे यांचा विश्वासु साथीदार आहे. अत्यंत वेगवान बोटांची हालचाल.त्यातुनच उत्कृष्ट डिझाईनची निर्मिती करणारा हा स्वछंदी कलावंत.... नाविन्यता ही डिझाईनर आकाश डोंगरे यांची संकल्पना आहे. काॕम्प्युटरचे कि -बोर्ड म्हणजे एखाद्या वैमानिकाच्या हातातील विमान होय.डोळे झाकुन कि-बोर्ड हाताळत असताना आकाशसमोर किंवा शेजारी बसलेल्या माणसाचे मन जिंकुन घेणारा आहे.कामात अत्यंत चपलखपणा. इग्रंजी भाषेवर प्रभुत्व असल्याने स्पेलींग मिस्टेक चुकूनही त्याच्याकडुन होत नाही हे विशेष...पदवीधर असलेल्या आकाशने आपले ग्राफिक्स हे आवडीचे क्षेत्र निवडले आहे.आष्टी शहरातील युवा उद्योजक दत्ताभाऊ बोडखे या मित्रासमवेत ग्राफिक्स डिजीटल प्रेस सुरु केली.दोघांमध्ये विचार विनिमय होऊन बोडखे फ्लेक्स ॲन्ड आॕफसेट प्रेस सुरु केली. आकाशने गेल्या 12 वर्षात ग्राफिक्स या कलेच्या, व्यवसायाच्या माध्यमातून नावलौकिक आणि आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे‌. अल्पावधीत आपल्या गुणवत्तेच्या बळावर आष्टी तालुक्यात वेगळे स्थान निर्माण केले.बोडखे प्रेस या संस्थेने यशस्वी पल्ला गाठला आहे.आकाश डोंगरे यांच्या बुद्धीकौशल्य आणि परिश्रमातून रंगीबेरंगी दुनियेत प्रचार आणि प्रसार माध्यमांमध्ये गुणवत्तेचा वेगळा ठसा निर्माण केला आहे. त्याबद्दल अनेकांनी कौतुक केले.बोडखे प्रेसच्या माध्यमातून डिजिटल बोर्ड आणि छपाईच्या रंगीबेरंगी दुनियेत आपले वेगळे कौशल्य वापरून सण, समारंभ,उत्सव,विवाह, कार्यक्रम यामध्ये चैतन्य निर्माण करण्यात आपला वाटा उचलला आहे. त्यामुळेच अनेकांनी आकाशच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. 'कला हेच जीवन आहे!' कलेला ह्रदयस्थानी ठेवून त्यात जीव ओतून काम केल्यास कलेतून जिवंतपणा येतो हे वास्तव आहे.हे वास्तव प्रत्यक्षात आणण्याचं कार्य आकाश डोंगरे नावाच्या युवकाने यशस्वीपणे पूर्ण केले आहे.आष्टी तालुक्यातील पत्रकारांना जाहिरातीचे डिझाईन अवघ्या काही मिनीटात तयार करुन देणारा आकाश.यामुळे तो सर्व पत्रकारांचा लाडका आहे. प्रामाणिकपणाच माणसाला उच्चपदापर्यत घेऊन जातो.या विचारावर आकाश डोंगरे चालत आहे.आकाशचे गतिमान,दर्जेदार आणि कौतुकास पात्र असेच काम करून भविष्य घडविणे हे त्याचे ब्रीद आहे.तळमळीनं काम करणारा डिझाईनर आकाश आहे. आष्टी तालुक्यातील मातकुळीच्या एका शेतकऱ्याचा मुलाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीरित्या पेलून कलेच्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. हाच कष्टाचा वारसा घेऊन निघालेल्या आकाशने आपले कला क्षेत्रात नाव कमविलेले आहे.ग्राफिक्स क्षेत्रातील उल्लेखनीय प्रगती झाली आहे.झगमगत्या आणि डिजिटल जगात उजळपणा हा आपल्या कामातुन दिसत असतो. आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातील परिपुर्ण ज्ञान संपादन करुन आपले वेगळेपण व आपला नावलौकिक वाढविला पाहिजे. आकाश डोंगरे हा एका खेड्यातील तरुण... आकाश हा कलावंत आहे.ग्राफिक्स जगात आपल्याला करिअर करायचे हे ध्येय मनाशी बाळगुन डिजाईन क्षेत्रात १२ वर्षापुर्वी पदार्पण केले आहे.आष्टीचे दत्ताभाऊ बोडखे यांच्याशी मैत्री करुन आष्टीत ग्राफिक्स क्षेत्रात मोठे नाव केले आहे. आकाशकडे कल्पकतेची एक दृष्टी आहे.मेहनत, जिध्द ,आत्मविश्वास यातुन आवडीच्या क्षेत्रात यश संपादन करता येते.हे आकाशने दाखवुन दिले आहे.कलाकार हा कधीच उपाशी राहु शकत नाही आणि कधीच अपयशी होत नाही.आकाश डोंगरे हा आज आष्टी शहरात एक नामवंत डिझाईनर म्हणुन चर्चेत आहे. प्रगतीसाठी व नावलौकिक मिळविण्यासाठी कष्ट करावे लागते.कलेचा गर्व न ठेवता सतत शिकत राहणारा माणुसच आणखी मोठा होत असतो.जो दुसऱ्यांना मान सन्मान देतो तोच मोठा माणुस होतो असा निसर्ग नियम आहे. आकाश लक्ष्मण डोंगरे या तरूणाने संत ज्ञानेश्वर माऊली प्रमाणे आपले वडीलबंधु नितीन डोंगरे यांनाच ग्राफिक्स क्षेत्रात गुरु मानलेले आहे. त्यांच्याकडुनच ही विद्या अवगत केली आहे. सोशल मिडीयाची डिजाईन,डीटीपी आदि संगणकाच्या माध्यमातुन एक उत्कृष्ट डिजाईनर म्हणुन नावलौकिक मिळविला आहे.१२ वर्षात आष्टी भागातील एक नामांकीत डिझाईनर बनला आहे.दत्ताभाऊ बोडखे यांच्या बोडखे प्रेसमध्ये आकाश डोंगरे हा तरुण उत्कृष्टपणे डिजाईनर म्हणुन कार्यरत आहे. आष्टी तालुक्यातील मातकुळी येथील शेतकरी कुटुंबात दि.२२ ऑगस्ट १९९७ मध्ये जन्मलेला आकाश डोंगरे.प्रतिकुल परिस्थितीतून शिक्षण घेवून ग्राफिक्स क्षेत्रात कार्यरत आहे.शालेय शिक्षण जि.प.प्रशाला मातकुळी व माध्यमिक शिक्षण श्रीकृष्ण विद्यालय मातकुळी येथे तर महाविद्यालयीन शिक्षण आष्टी शहरातील भगवान महाविद्यालयात झाले.त्यानंतर बहिस्त विद्यार्थीं राहुन पदवी घेतली.शिक्षण घेत असतानाच आकाशने जामखेड व अहमदनगर येथे आवडीचे क्षेत्र असलेल्या ग्राफीक्स या क्षेत्रात पदार्पण केले. प्रदीर्घ अनुभवाची शिदोरी सोबत घेवून आष्टी येथे आकाश डोंगरे हे ग्राफिक्स दुनियात प्रभावीपणे काम सुरु केलेले आहे.आकाश डोंगरे याने अंत्यत प्रतिकुल परिस्थितीमध्ये आपल्या कुंटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पेलुन कलेच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटविला. कलेचा प्रवास आकाशला नामांकीत कलावंत इथपर्यत घेऊन आला आहे. डिझाईनर आकाश डोंगरे यांना वाढदिवसाच्या दैनिक झुंजारनेता परिवाराच्यावतीने हार्दिक शुभेच्छा... .........--शुभम सरोदे.... (लेखक ) -------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या