Ticker

6/recent/ticker-posts

संस्कारी जीवन जगा, संपत्तीपेक्षा संस्कार महत्वाचे ;मातापित्याची मान खाली जाणार नाही याची काळजी घ्या ----- ह.भ.प.चंद्रकांत महाराज खळेकर

आष्टी (प्रतिनिधी) सध्या महाराष्ट्रातील राजकारणाची स्थिती फार वाईट झालेली आहे.या वाईट परिस्थितीमध्ये सर्वसामान्य युवक व सर्वसामान्य लोक भरडले जात आहेत. नेतेमंडळी कधी कोणत्या पक्षात जाईल याचा भरवसा राहिलेला नाही. नेतेमंडळींना समाजाचं काहीही घेणं देणं राहिले नाही. आपापल्या सोयीनुसार ते एका रात्रीत पक्ष बदलत आहेत.त्यामुळे युवकांनी स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या नेत्याला साहेब म्हणण्यापेक्षा स्वतःच्या बापाला बाप म्हणायला शिका.युवकांनी नेत्यांच्या मागे पुढे फिरून बरबाद होण्यापेक्षा स्वतःच्या संसाराकडे व करिअरकडे लक्ष द्यावे.संस्कारी जीवन जगा, संपत्तीपेक्षा संस्कार महत्वाचे ;मातापित्याची मान खाली जाणार नाही याची काळजी घ्या असे प्रतिपादन ह.भ.प.चंद्रकांत महाराज खळेकर यांनी केले. आष्टी तालुक्यातील कडा येथे श्रावण मासानिमित्त महेश मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.पहिले पुष्प गुंफताना ह.भ.प.खळेकर महाराज बोलत होते. पुढे बोलताना खळेकर म्हणाले की, जन्मापासून मरेपर्यंत आनंदाने जगा. भगवंताची भक्ती केल्याने जीवनामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. आलेला प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. जीवन हे खूप अनमोल असून आलेला क्षण कोणीही वाया घालू नका. देवाला मानण्यापेक्षा देव कसा आहे तो जाणून घ्या. बाह्यरूपापेक्षा आंतररूप महत्त्वाचे असून वाणापेक्षा गुण पाहिजेत. हे त्यांनी अनेक उदाहरणासह भाविकांना पटवून दिले. आजकाल राजकारणात आला की युवक संपलाच म्हणून समजा हे पटवून सांगताना त्यांनी पक्षांतर कसे होते व किती गमतीशीर होते याचे अनेक उदाहरणे दिले. आता राजकारण निष्ठेचे राहिले नाही त्यामुळे लोकांचा विश्वासही उरला नाही.लाडकी बहीण योजनेवरही खळेकर यांनी टीका केली.जीवन जगत असताना अन्नदान, रक्तदान व मतदान हे अंतकरणातून करावे.तुम्हाला कोणत्या नेत्याचा प्रचार करण्यापेक्षा ज्ञानोबा, तुकाराम महाराजांचा प्रचार व प्रसार करा तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत काहीच कमी पडणार नाही.आजच्या तरुणांनी धर्मासाठी काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.हिंदू युवकांनी रामगिरी महाराजांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे रहावे असे आवाहन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या