
वाढदिवस विशेष लेख
----------------
उत्तम बोडखे, आष्टी.
संवेदनशीलता,माणुसकी, चांगुलपणा, ऐक्य, बंधुत्व सर्वधर्म समभाव आदीसह माणुसकीच्या
भावनेतून सदैव सगळ्यांशी सलोख्याने वागून माणुसकीचे विचार जतन करणारे आष्टी शहरातील
प्रसिद्ध डाॕक्टर विलासराव सोनवणे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने आज गुरुवारी
दिवसभर सामाजिक व लोकहिताचे उपक्रम राबविले जाणार आहेत.डाॕ. सोनवणे हे
वाढदिवसादिवशी बाहेरगावी असल्याने ते फक्त मोबाईलवरुन शुभेच्छा स्विकारणार
आहेत.विविध क्षेत्रातील मान्यवरांचे शुभेच्छा संदेश आणि अभिष्टचिंतन करतील मात्र
हार तुरे ते घेण्यास उपलब्ध नाहीत. डाॕक्टर असोशिएशनचे तालुकाध्यक्ष डाॕ.विलासराव
सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शनिवार २४ आॕगस्ट रोजी बेलगाव येथील रेणुकामाता
मंदिरातील परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम,त्याचप्रमाणे बेलगाव येथील जि.प.प्राथमिक
शाळा परिसार आणि बेलगांव वैकुंठभुमीत येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. बेलगाव
येथील जि.प.प्राथमिक शाळा आणि अंबिका विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य
वाटपाचा कार्यक्रम होणार आहे असे आष्टी नागरी पतसंस्थेचे प्रशासनाने सांगितले. आपली
पतसंस्था मोठी झाली पाहिजे.असा अट्टाहास,दुराग्रह डाॕ. सोनवणे यांनी कधी ठेवला
नाही.ही पतसंस्था,संस्थाचालकाच्या सदगुणाने नैसर्गिकरीत्या डॉक्टरसाहेबांनी वाढत
राहिली म्हणून आष्टी नागरी पतसंस्थेला बाळसे आले.सूज आली नाही.संस्थेने गरजुंना
नुसते कर्ज म्हणजे पैसे,म्हणजे अर्थसाह्य केलेले आहे असे नव्हे, पतसंस्थेने
कर्जाबरोबरच कर्ज घेणारांना आत्मियता दिली.आपुलकी दिली.ह्याचा परिणाम असा झाली की
संस्थेने वाटप केलेले कर्ज विनातक्रार जमा होत गेले. वसुलीचे अप्रिय
प्रसंग,अपवादात्मक राहिले. डाॕ.सोनवणे सार्वजनिक जीवनातील शुद्धतेचा आदर्शच
--------------------------------------- काटकसरीच्या व्यवहाराचा दीपस्तंभ माजी
आमदार ॲड.निवृत्तीराव उगले साहेबांचा होता,तोच कित्ता सोनवणे डॉक्टर साहेबांनी
संस्थेत गिरविलेला आहे.म्हणून संस्था दिवसेंदिवस नफ्यात आलेली आहे.ह्या घराण्याची
लोकनेते शरद पवार साहेबांवर मोठी निष्ठा आहे.इतकेच काय तर पवार घराण्यावरच म्हणजे
अजितदादा आणि खा.सुप्रियाताई सुळे ह्यांच्याबद्दल ही अपरंपार आदर आहे.या संस्थेचा
वृक्ष विस्तिर्ण होवो अशा सदिच्छा.... डाॕ.सोनवणे यांची ही पतसंस्था त्यांच्या
सोन्यासारख्या बावनकशी (सोन्यावाणी - सोनवणे) व्यवहारानेच उत्तरोत्तर नावालौकिकाला
पात्र होईल हा सार्थ विश्वास आहे. " विना सहकार नाही उद्धार " या पारंपारीक
ब्रिदवाक्या ऐवजी विना संस्कार नाही सहकार असे ब्रिदवाक्य धारण करून सहकार चळवळ
प्रमाणिकपणे राबविण्याचे काम आष्टी शहरातील प्रसिद्ध डॉ. विलासराव सोनवणे यांनी
केले आहे.दि.१६ डिसेंबर १९९२ साली डॉ.विलासराव सोनवणे यांनी आष्टी नागरी सहकारी
पतसंस्था सुरु केली.आपला वैद्यकिय व्यवसाय व्यवस्थितपणे सुरू असताना पंचक्रोशीतील
गोरगरीब लोकांचे आर्थिक प्रश्न पत नसल्याने होणारा त्रास,जो माणुस प्रामाणिक आहे
त्यांना आर्थिक हातभार कष्टकरी व ज्यांची समाजात पत नाही मात्र तो माणूस प्रामाणिक
आहे त्यांना आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी ही पतसंस्था सुरू
केली.पतसंस्थेचा प्रदिर्घ प्रवास झाला आहे.सर्वाप्रती समभाव,सामाजिक न्याय,शहराचा
विकास,राष्ट्रीय विचार सामाजिक बांधिलकी, पारदर्शक आर्थिक व्यवहार यासाठी झटणारे
व्यक्तीमत्व डॉ. विलासराव सोनवणे यांचे आहे. त्यांच्या रूपाने या पतसंस्थेला
नेतृत्व लाभलं हे या पतसंस्थेच भाग्य म्हणावे लागेल.एक मोठी दृष्टी आणि दिशा घेऊन
झपाटलेल्या वृत्तीनेच आष्टी नागरी पतसंस्था उभारणीत वाहून घेतलेलं दुरदर्शी नेतृत्व
आहे.एक शांत,मनमिळावू,भावना व व्यवहार यांचा योग्य मिलाप करणारे चेअरमन डॉ.
विलासराव सोनवणे यांच्या रूपाने या पतसंस्थेला लाभलेले आहेत म्हणून तर बँकाच्या आणि
मल्टीस्टेट पतसंस्थेच्या स्पर्धेत खंबीरपणे उभी राहिलेली आष्टीतील नागरी पतसंस्था
आहे. पुर्वीच्या छोट्याशा टुमदार आष्टीचे रूपांतर आज एका मोठ्या शहरात झालेले आहे.
ऐतिहासिक वारसा लाभलेले हे आष्टी शहर.या शहराने जणु कात टाकली आहे समाजातील दुःखी
माणसांचे जीवन सुखी करून सोडावे या व्यापक दृष्टिकोनातून आपल्या कर्मवीर भाऊराव
पाटलांसह अनेक विचारवंतांनी अहोरात्र कष्ट आरंभिले अशा थोरा मोठ्यांच्या विचारावर
चालण्याची आज अनेक समाज धुरिणांची प्रमाणिक धारणा आहे.किंबहुना अगदी त्याच वाटेवर
खारीचा वाटा उचलून आरोग्य व सहकार क्षेत्रात माणसांची न संपणारी पूजा आरंभण्याचे
महत्त्वपूर्ण कार्य अर्थात डाॕ.विलासराव सोनवणे यांनी गेल्या तीन दशकावून अधिक काळ
केले आहे. विवेकातील आनंद शोधण्याची त्यांची धडपड त्यांच्या कार्यातून पाहायला
मिळते.डाॕ.सोनवणे यांचे कार्य म्हणजे बहुजनांसाठी व त्यांच्या परिवर्तनासाठी केलेली
धडपड आहे. राष्ट्रीयीकृत बँकाचे भांडवलदार धार्जीणे पतधोरण आणि केवळ मोठ्या
उद्योगपतींना कर्ज देण्याचे धोरण यामुळे या बँकांकडे सर्वसामान्य ग्राहक फिरकत
नाहीत त्यामुळेच सामान्य माणसांना आणि छोट्याछोट्या उद्योगांना कर्ज पुरवठा
करण्याचे चेअरमन डाॕ.सोनवणे व पतसंस्थेचे धोरण आहे. या पतसंस्थेने अनेक युवकांना
कर्ज देवून रोजीरोटीची सोय केल्याने अनेक कुटुंब स्थिरस्थावर झाले आहेत.ग्रामीण
भागातील सावरकारी ही अत्यंत घातक असते.ही सावकारी मोडून काढण्यासाठी आणि
सर्वसामान्यांना या सावकारी जोखडातून मुक्ती देण्यासाठी सहकारी पतसंस्था द्वारा
तात्काळ कर्जपुरवठा करणे हा पर्याय उत्तम असल्याने या आष्टी नागरी पतसंस्थेने
सर्वसामान्य उद्योजकांना चांगला दिलासा दिलेला आहे. आष्टी तालुक्यातील अनेक
पतसंस्था आहेत.आष्टी तालुक्याच्या आणि आष्टी शहराच्या विकासामध्ये आष्टी नागरी
पतसंस्थेचे मोठे योगदान आहे.डॉ. विलासराव भीमराव सोनवणे यांनी वैद्यकीय व्यवसाय
ज्या सेवाभावी वृत्तीने व निष्काम कर्मसेवेने जपला त्याच पद्धतीने त्यांनी ही
पतसंस्था अत्यंत उच्चतम आदर्श मूल्यांवर आधारीत चालवली आहे. या पतसंस्थेमध्ये अनेक
ठेवीदार मोठ्या विश्वासाने ठेवी ठेवत गरजु असल्यानं त्यातून सर्व सामान्य
ग्राहकांना कर्जवाटप देखील अत्यंत व्यवस्थित वाटप होत आहे.या पतसंस्थेचे कर्जवाटप
आणि कर्जवसुली यांचे उत्तम व्यवस्थापन केल्यामुळे या पतसंस्थेचे भवितव्य निश्चितपणे
उज्वल आहे.या पतसंस्थेचे चेअरमन डॉ. विलासराव सोनवणे हे उच्चशिक्षित असून त्यांचे
संचालक मंडळातील सहकारी देखील आपआपल्या क्षेत्रात ठसा उमटवलेले आहेत.या संचालक
मंडळाने सुरूवातीपासूनच काटकसरीचे धोरण अवलंबले आहे.दूरदृष्टिकोन, पारदर्शक
कारभार,तत्पर निर्णय क्षमता आणि सतत जनतेशी सुसंवाद ठेवत सामजिक कार्यात सहभागी
होवून सामजिक बांधिलकी जपलेली असल्याने आष्टी नागरी पतसंस्थेविषयी सर्वसामान्यांना
आपुलकीची भावना आहे.हजारो ठेवीदार आणि नागरीक या पतसंस्थेशी जोडलेले आहेत.
कोट्यावधी रूपयांच्या ठेवी या पतसंस्थेमध्ये आहेत. सर्वसामान्य जनतेचा विश्वास
संपादन केलेला असल्यानेच ही पतसंस्था आदर्श पध्दतीने सुरु आहे.सहकार हा एक मंत्र व
संस्कार असून या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकत्यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे असा
संदेश सहकार भारतीचे प्रणेते स्व.लक्ष्मणराव इनामदार यांनी दिलेला आहे.त्यानुसार
आष्टी नागरी सहकारी पतसंस्थेचा कारभार सुरू असल्याने निश्चितपणे या संस्थेला
भवितव्य आहे.भविष्यामध्ये या संस्थेची आणखी भरभराट होवून याची व्याप्ती वाढणार
आहे.आष्टी तालुक्यातील ग्रामीण जीवनाचे अर्थकारण हा महत्वाचा घटक समोर ठेवून आष्टी
नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रामीण जीवनात परिवर्तन घडवून येणार आहेत हे
नक्की.डाॕ.सोनवणेसाहेब हे कार्यतत्पर ,कुशल प्रशासक आणि कर्तव्यदक्ष चेअरमन
असल्याने ही पतसंस्था आता बँक बनली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
डाॕ.विलासराव सोनवणे यांना वाढदिवसाच्या दैनिक झुंजारनेता परिवाराच्यावतीने हार्दिक
शुभेच्छा ....
-
------------------------------------------
0 टिप्पण्या