Ticker

6/recent/ticker-posts

माजी आ.भीमराव धोंडे यांच्या मागणीची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडून दखल ; ई-पीक पाहणीची अट रद्द

आष्टी (प्रतिनिधी) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कडून माजी आ.भीमराव धोंडे यांच्या मागणीची दखल घेत ई- पीक पाहणीची अट रद्द करण्यात आली आहे.भीमराव धोंडे यांच्या मागणीची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडून दखल घेत ; ई-पीक पाहणीची अट रद्द झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.शेतकऱ्यांना सरसकट अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कधी अतिवृष्टी तर दुष्काळी परिस्थितीमुळे आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघातील शेतकरी सतत आर्थिक संकटात सापडतो.यावर्षी देखील जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु अनुदान मिळण्यासाठी शासनाने ई पिक पाहणीची जाचक अट घातली होती. ई - पिक पाहणी सर्वच शेतकरी करु शकत नाहीत. सर्वच शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत. ग्रामीण भागात मोबाईल रेंजचा प्रश्न उद्भवतो,सर्व्हर डाऊनचाही प्रश्न निर्माण होतो त्यामुळे सर्व शेतकरी ई -पिक पाहणी करू शकत नाहीत. किमान ५० टक्के शेतकरी ई - पीक पाहणी करु शकले नाहीत त्यामुळे ते अनुदानापासून वंचित होते.माजी आ.भीमराव धोंडे यांनी सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी १० जुलै २०२४ पासून मतदार संघात जनसंपर्क अभियान सुरू केले. यामध्ये अनेक वाड्या वस्त्यां वरील शेतकऱ्यांनी ई - पिक पाहणीची जाचक अट रद्द करुन सरसकट अनुदान द्यावे अशी मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या मागणीची माजी आ.भीमराव धोंडे यांनी गांभीर्याने दखल घेत शासनाकडे मागणी केली होती.सर्व वर्तमानपत्रांतून बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. सोशल मीडियावरुन सर्वत्र व्हायरल झाल्या होत्या.माजी आ.भीमराव धोंडे यांनी ई -पीक पाहणीची अट रद्द करून सरसकट अनुदान द्यावे अशी मागणी केली होती.गेल्या आठ दिवसापासून ही मागणी सर्वत्र वर्तमानपत्रांमध्ये गाजत आहे. दोन दिवसांपूर्वी परळी येथे कृषी महोत्सवाच्या निमित्ताने केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,पालकमंत्री धनंजय मुंडे, लोकनेत्या आ.पंकजाताई मुंडे उपस्थित होत्या. यानिमित्ताने पालकमंत्री धनंजय मुंडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ई -पिक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा केली.त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना आता सरसकट अनुदान मिळणार आहे.सर्वप्रथम ही मागणी माजी आ.भीमराव धोंडे यांनीच लावून धरल्याने ती पूर्णत्वास गेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या