Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीचे सुपुञ हृदयरोगतज्ञ डाॕ.संदीप गाडे बनलेत देवदुत

विशेष लेख.. ............. उत्तम बोडखे ------------ आष्टी तालुक्यातील साबलखेड येथे एका शिक्षक नेत्याच्या पोटी जन्मलेले डाॕ.संदीप गाडे हे अहमदनगर शहरातील एक नामांकीत डाॕक्टर आहेत.वैद्यकीय क्षेत्रात अहमदनगर शहरातील नोबेल हाॕस्पीटलमधुन दमदार सुरुवात केली.गावखेड्यात राहून काळ्या आईच्या सानिध्यात आयुष्याची मुळाक्षरं गिरवत असताना एखाद्या मध्यमवर्गीय शिक्षक कुटुंबातील मुलानं चक्क डॉक्टर व्हायचं स्वप्न उराशी बाळगणं तसं धाडसाचंच.वडील नवनाथ गाडे मुळातच हाडाचे शिक्षक.बीड जिल्हा परिषदेच्या शाळेत छोट्या-छोट्या मुलांवर संस्कार आणि सद्गुणांचं शिंपण त्यांनी आयुष्यभर केलं.काही संस्काराचे मोती डाॕ.संदीप यांच्या वाट्याला आले आणि त्यांच्या स्वप्नाला मिळालं नवं आकाश.सुरु केली एक धडपड स्वतःला ओळखण्याची आणि सिद्ध करून दाखविण्याची,प्राथमिक शिक्षणानंतर डाॕ.संदीपने पुण्याच्या बी.जे.मेडिकल महाविद्यालयातून एम.बी.बी.एस.ची पदवी संपादन केली.मुंबईच्या जी.एस.मेडिकल कालेज आणि के.ई.एम.हॉस्पिटलमधून त्यांनी एम.डी.ही पदवी मिळवली.देशातील नामांकित वैद्यकीय संस्थेतून डी.एम. कार्डिओलाँजी (हृदयरोग) ही पदवी मिळविण्याची जिद्द मनात ठेवुन ध्येयपुर्ती केली.प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासात झोकून दिलं आणि त्याचं फळ म्हणून संपूर्ण भारतातून डाॕ.संदीप प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.दिल्लीतील जी.बी.पंत हॉस्पिटलमधून डी.एम.कार्डिओलॉजी (हृदयरोग) ही उच्च पदवी मिळवून ते वेगवेगळ्या हृदय शस्त्रक्रियामध्ये निष्णात झाले.स्वप्नांचं आकाश आता कवेत होतं.गावखेड्यातील त्याच मातीचा गंध त्यांना खुणावत होता. तिथली नाती हृदयाला साद घालत होती.अखेर निर्णय घेतला.गांवी परतण्याचा.आपल्या माणसांसाठी, आपलं बनवुन राहण्यासाठी. डाॕ.संदीप गाडे यांनी अहमदनगर येथे २०१३ मध्ये एशियन नोबल हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवेला सुरुवात केली.या सात वर्षांच्या काळात अनेक नाती जोपासली गेली.नवे नवे अनुभव मिळाले.समाजाच्या हृदयात आनंदाचं आणि विश्वासाचं घर निर्माण करता आलं आणि याच भांडवलावर पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीने नव्याने निर्णय घेतला आहे " इंपल्स हॉस्पिटल " ची रुजुवात करण्याचा. दि.२ ऑगस्ट २०२० रोजी (चार वर्षापूर्वी) अत्याधुनिक, रुग्णसेवा " इंपल्स हॉस्पिटल " या माध्यमातुन सुरु केली आहे.तुमच्या हृदयाची काळजी घेणारं एक आनंदी हृदय इथे कायमच धडधडतं राहणार आहे.२२ बेडचा क्रिटिकल केअर घेणारा सुसज्ज अतिदक्षता विभाग,अँजिओग्राफी,अँजिओप्लास्टी करणारी सुसज्ज कॅथलेंब,रक्ताच्या विविध चाचण्या करणारी सुसज्ज अशी लॅब,२४ तास उपलब्ध असणारे मेडिकल स्टोअर्स,तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टर्स आणि नुसता कुशल नाही तर प्रत्येक रुग्णाची आत्मियतेने सेवा करणारा नर्सिंग स्टाफही इथे सेवेत कार्यरत आहे. नेत्रविकार (ऑप्थॉल्मोलॉजी) आणि मेंदूविकारांच्या (न्यूरोलॉजी) रुग्णांसाठी देखील अत्याधुनिक उपचार सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे.कोरोना संक्रमणाच्या या काळातही " इंपल्स हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा झालेला आहे. आष्टी तालुकावासीयांचा डाॕ.संदीप हा अलंकार ------------------------------- डॉ.संदीप गाडे आपल्या शाखेत निष्णात तज्ञ,आहेतच.पण त्याचबरोबर सुसंस्कार,सभ्यता, विनयशीलता,आत्मविश्वास अशा सद्गुणांची झालर त्यांनी त्यांच्या व्यवसायाला आणि ज्ञानाला लावलेली आहे.दुर्मिळातले दुर्मिळ गुण डॉ.संदीप गाडे जन्मतःच बरोबर घेवून आले आहेत.आष्टी तालुक्याच्या मातीचा गंध करून भाळी टिळा लावावा असे भाळ डॉ.संदीप गाडे यांचे आहे.मला आष्टी तालुक्याच्या सुपुत्राचा डॉ.संदीप गाडे याचा अभिमान व गर्व आहे.सर्व तालुक्याच्यावतीने ह्या भूमीने असे रत्न दिले म्हणून आष्टीच्या मातीला आणि डॉ.संदीप नवनाथ गाडे यांच्या मातापित्याला मी वंदन करतो, अहमदनगर जिल्ह्याला आष्टी लगतच आहे.आष्टीचा जिल्हा बीड आहे.हा कधीचा रझाकारी तालुका; सुधारणेच्या बाबतीत अत्यंत मागास तालुका. असे म्हणतात,महाराष्ट्रात मराठवाडा मागास,मराठवाड्यात बीड जिल्हा मागास,आणि बीड जिल्ह्यात आष्टी तालुका मागास.म्हणजे आष्टी तालुका मागासपणात सर्वप्रथम. स्वातंत्र्यानंतरच्या काळात मात्र ही कलंक रेष धुसर होत गेली.बुद्धी आणि वैचारिकतेचा दुष्काळ संपला,त्याचे प्रतीकच डॉ.संदीप गाडे आहेत. अहमदनगर जिल्हा आणि अहमदनगर शहराने सर्व दृष्टीने पुर्वापार प्रगती केलेली आहे; वैद्यकीय अहमदनगर शहराचा महाराष्ट्रात नावलौकिक आहे. डॉ.संदीप गाडे अहमदनगरकरांच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह (डिस्टिंगशन) उत्तीर्ण झाले आहेत. एक उत्तम डॉक्टर म्हणून अल्पावधीतच त्याअहमदनगर जिल्ह्यात लौकिक प्राप्त केला. इंपल्स हा स्वतःचाच सुसज्ज, सुविधायुक्त दवाखाना सुरू केला आहे.डाॕ.संदीप गाडे यांचे वडील,गाडे गुरूजी हे आमचे मेव्हुणे संपत धोंडे सर यांच्याकडुन नात्याने मेव्हुणे पण आमचे मित्राप्रमाणे नाते आहे.विक्रम पोकळे व मी त्यांच्या सर्व सुखदुःखात सहभागी होत असत.डॉ.संदीप गाडेसारखा मुलगा नवनाथ गाडे यांच्या पोटी जन्माला यावा ही या जन्माची आणि पुर्व जन्माची पुण्याई आहे.गाडेगुरुजी आणि त्यांचे कुंटुंबीयांच्या हातून ईश्वराला मान्य असलेले पूण्यकर्म घडत गेले म्हणून ईश्वराने तुम्हाला,तुमच्या कुळाला,वंशाला डाॕ.संदीपच्या रूपाने दीप दिला.चांगला पूत्र पोटी जन्मायला पूण्याई लागते.असे पूत्र दुर्मिळ असतात.लोक पैसा कमावू कितीही शकतात; मोठी शेतीवाडी,वाडे इमल्या,दारी हुजरे- ठेवू शकतात; त्यांची मुले मोठ्या पदव्या ही मिळवू शकतात; मोठे सनदी पदेही मिळवू शकतात; पण विनयशील,आपल्या क्षेत्रात निष्णात, सभ्य,निगर्वी,सर्वांचा विश्वास सहजच बसेल असा पूत्र हा मोल न करता येण्यासारखा हिराच असतो. नवनाथ गाडे गुरूजी हे या हिऱ्याचे कोंदण आहेत.नवनाथ गाडे यांनी अप्रत्यक्ष संस्कार केले. त्या संस्काराचे कोंदण झाले; ह्या कोंदणात डॉ.संदीप बसले. अन् ते एक सुशोभित,आकर्षक अलंकार झाले.असे पूत्र हे अक्षय बँक बॅलेन्स असते.तुमच्या बँकेतील बॅलेन्स तिथल्या कॅशियरला तुमच्या पुत्राच्या सद्गुणांमुळे मोजता येणार नाही.नुसते सोने असून उपयोग नसतो. नुसता सोनार असून उपयोग नसतो.चांगला दागिना तेव्हा घडविला जातो; जेव्हा सोने शंभर नंबरी असते आणि दागिना घडविणारा सोनार आपल्या परीने प्रयत्न करतो.सोन्याचा कस तेव्हाच लागतो,जेव्हा त्याला तापविलेच जाते. पुर्वीचा प्राथमिक शिक्षकांचा पगार शेकड्यात होता.अशा परिस्थितीत मुलांना वैद्यकीय शाखेचे खर्चिक शिक्षण देणे ही सर्कसीतील कसरत होती. नवनाथ गाडे गुरूजींनी मुलांना शिकविले ? का मुले शिकली ? डॉ.संदीप गाडे यांना यांच्या बद्धिचाच वशिला होता.त्यांना त्यांच्या बुद्धीवर अन् कर्तृत्वावर,त्यांच्या आत्मिक आवाजावर त्यांच्या विश्वास होता;त्यांनी बारावी परीक्षेत उत्तम गुण मिळविले.पण आता पुढे काय ? पुराच्या पाण्याची भीती त्यालाच असते,ज्याला पोहता येत नसते.ज्याचे मन भ्याड असते.त्याला परिस्थिती भीती दाखवित असते. डॉ.संदीप गाडे ह्यांना आकाश खुणावीत होते.आकाश म्हणत होते.घे,भरारी घे.तुझ्या पंखात बळ नियतीने दिलेले आहेच.परिस्थितीला शरण जातो, परिस्थिती पुढे वाकतो तो सामान्य असतो.जो परिस्थितीला वाकवितो, इतिहास त्याचाच होत असतो. विज्ञान शाखेतील अग्रक्रमाने उत्तीर्ण झालेल्याच विद्यार्थ्यांना बी. जे.वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे प्रवेश मिळत असतो.संदीप गाडे यांना या नामांकित महाविद्यालयात सहज प्रवेश मिळाला.मूळ असलेल्या हिऱ्याला इथे पैलू पाडण्यात आले.एम. बी.बी.एस ही वैद्यकीय क्षेत्रातील सन्माननीय पदवी बी.जे.मेडिकल कॉलेज पुणे येथून प्रावीण्यासह मिळविल्या नंतर त्यांना वाटले.माझे पोट बरेच रिकामे आहे.माझी भूक भगलेली नाही; त्यांना मुंबईच्या जी.एम. मेडिकल कॉलेजमध्ये आणि के.ई. एम.हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर पदवी साठी एम.डी.साठी गुणवत्तेनुरूप सहज प्रवेश मिळाला; ते एम.डी. झाले खरे.पण आणखी एक टप्पा ह्या क्षेत्रातील राहिला. त्याला डी.एम. असे नामाभिधान आहे. ह्यासाठी निवड भारतपातळीवरून (देशपातळीवरून) होत ह असते.त्यासाठी अभ्यास असतो, खडतर परीक्षा असते. निवडकामधून निवडक निवडायचे असतात. नवनाथ गाडे गुरूजींचा मुलगा ह्या परीक्षेत देशात पहिला आला.दिल्लीच्या गोविंद वल्लभपंत ह्या मोठ्या लौकिकाच्या हॉस्पिटल मधून त्यांनी डी.एम. कार्डिओलॉजीस्ट (हृदयरोग विशेषज्ञ ) ही हृदयासंबंधाची जगातील शेवटची पदवी संपादन केली. ह्या पदवीआधारे ते हा व्यवसाय कुठे करू शकले असते? अगदी प्रगत अमेरिकेतील, न्यूयॉर्क, वाशिंग्टन, युरोपातील लंडन,पॅरिस, बर्लिन,आशियात,टोक्यो,कोझी, हाँगकाँग, ऑस्ट्रेलियामध्ये पर्थ, मेलबर्न,आफ्रिकेत परदेशातील अशा कोणत्याही अती सुसज्ज शहरात किंवा भारताचा विचार केला तर दिल्ली,मुंबई इथे त्यांचा व्यवसाय सन्मानाने चालला असता.ज्याचे मातीशी नाती आहेत. त्याला हे माहीत असेल की मातीला एक मोहक गंध असतो; हरणांना हा गंध वेडा करत असतो.जेव्हा उन्हाने जमीन तापलेली असते, जमिनीने उन्हाचे चटके सहन केलेले असतात. तेव्हा पावसाच्या चार सरी आल्यातर मातीचा एक मस्त गंध आसमंतात दरवळत असतो. ह्या गंधाचे अत्तरही आहे. ह्याला मृदगंध असे म्हणतात. मोहक मोहमयी शहरांचा मोह सोडून डॉ.संदीप गाडे आपल्या मातीच्या मोहाने आष्टीच्याजवळच अहमदनगरला आकर्षित झाले. २०१३ साली त्यांनी नोबेल हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवाव्रत सुरू केले. ऑगस्ट २०२० मध्ये स्वतःचे इंपल्स नावाचे हॉस्पिटल अहमदनगर येथे सावेडीनाका,मनमाड रोड येथे सुरू केला आहे. हे अत्याधुनिक हॉस्पिटल आहे,इथे हृदयाच्या सर्व तक्रारीवर तर सर्व उपचार आहेतच.सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया इथे विश्वासपूर्वक होतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत तज्ञ डॉक्टरांचा संच आहे,अतिदक्षता विभाग आहे.कॅथलॅब आहे,रक्ताच्या सखोल सर्व प्रकारच्या चाचण्यांची लॅब आहे; हॉस्पिटलची २४ तास सेवा आहे; बेडस् आहेतच.अन् विनयशील नर्सिंग स्टाफ आहे; मेंदूत बिघाड असो नाहीतर हाडामध्ये, इथे मनुष्य दुरूस्तीचे गॅरेजच आहे;बिघडलेले मशिन शक्यतो दुरूस्तीची हमी इथे आहे;डॉ.संदीप गाडे यांच्या दीप इथे अव्याहत प्रकाशित राहणार आहे. त्यांच्या ज्ञानाचा दीप प्रकाश सर्वांची अंधाराची भीती दूर करीत आहे. डॉ.संदीप गाडे, आपल्या आडनावावरच्या शेवटच्या शब्दाचा मात्रा अलिकडच्या शब्दावर घेतला तर ? तुमचे नाव " गोड " असे असेल. तुमच्या यशाचे पवाडे तुमच्याच कर्तृत्वाचे चौघडे गातील ; यत्रतत्र असे व्यक्तिमत्व क्वचितच जन्माला येत असते. "हजारो साल नर्गिस अपने बेनुरीपर रोती है, “बडी मुश्किलसे होता है चमनमे दीदारवर पैदा " शुभास्ते, शुभपंथानां..... डाॕ.संदीप गाडे यांच्या "इंपल्स " च्या चतुर्थ वर्धापनदिनानिमित्त " झुंजार वार्ता " पोर्टल न्युज परिवाराच्यावतीने हार्दिक शुभेच्छा ..... ********************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या