Ticker

6/recent/ticker-posts

प्रयोगशील शेतकरी पठारे यांचा तैवान पेरू गुजरातच्या बाजारपेठेत .................. दोन एकरात १५ लाख रु.चे उत्पन्न

विशेष लेख ------------ उत्तम बोडखे ............. सहचारिणीची साथ; प्रेरणादायी प्रवास! ----------------------------- दादेगावचे शेतीनिष्ठ शेतकरी मुरलीधर पठारे यांनी दोन एकरात तैवान वाणचे पेरु बाग केली आहे. हा प्रयोग यशस्वी झाला आहे.दोन एकरात १५ लाख रु चे उत्पन्न झाल्याने या प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा दैनिक झुंजारनेता मांडत आहे.या शेतकऱ्याकडुन ईतरांनी प्रेरणा घ्यावी ... मुरलीधर पठारे यांच्या सहचारिणीची या फळबागेत प्रेरणादायी साथ आहे. पठारे यांची हिरवीगार फळशेती फुलली असून मोठ्या प्रमाणावर फळांचा सुगंध परिसराला आला आहे.अनेक शेतीप्रेमी या फळबागेच्या प्रयोगाला आवर्जून भेट देत पाहणी करीत आहेत.या अत्यंत घाम आणि कष्टाच्या कृषी क्षेत्रातील कार्याला त्यांच्या सहचारिणी यांचीही मोलाची साथ असल्याचे मुरलीधर पठारे सांगतात. गेल्या काही वर्षांपासून कृषी विभागातील कर्तव्यदक्ष आणि जिद्दी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी तालुक्यात शेतीत नवनवीन प्रयोग होत आहेत.केळसांगवी,म्हसोबाचीवाडी,चोभानिमगांव,कारखेल, रुईनालकोल, आनंदवाडी,सराटेवडगांव, नांदा, टाकळसिंग,वाळुंज,वटनवाडी आदि गावातील तरुण शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागा केल्या.बाजारपेठ शोधली व चांगले उत्पन्न घेतलेले आहे. तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगतात की,शेतकरी बांधवांनो पारंपारिक शेती करु नका.फळबाग, भाजीपाला शेतीकडे वळा.प्रत्येक घरात मुले शिकल्याने व नवीन शेतीविषयक तंत्रज्ञान अवगत झाल्याने शिक्षणाचा व ज्ञानाचा फायदा आधुनिक शेती करताना वापरत आहेत. तालुका कृषी विभागातील कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक,मंडळ अधिकारी यांचे शेतकर्‍यांना वेळोवेळो मार्गदर्शन होत आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रभावी गुंतवणुकीतून अधिक उत्पन्न मिळवण्यास मदत होत आहे. अनेक शेतकरी सध्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, वार्षिक लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. अनेक जण पारंपरिक पद्धतीने शेती न करता शेतीला आधुनिकतेची जोड देत आहेत. विशेष म्हणजे काही जण आपल्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीला रामराम करत,शेतीमध्ये आपले नशीब आजमावत आहे.ज्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा आणि शिक्षणाचा वापर शेतीमध्ये होऊन त्यांना अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.जिद्द व चिकाटीच्या जोरावर तैवान पेरूच्या माध्यमातून खर्च अडीच लाख झाला असला तरी उत्पन्न मात्र १५ लाखात घेत उत्तम शेती करणारे दादेगांव येथील शेतकरी मुरलीधर पठारे आहेत. आष्टी तालुक्यातील दादेगांव येथील मुरलीधर पठारे यानी कर्जत तालुक्यातील पाटेगांव येथील नातेवाईकांनी केलेली फळबाग शेती पाहिली आणि इथूनच त्यानी बागेची तयारी केली.तीन २०२१ साली पाटेगांव येथून १८५० तैवान पिंक जातीचे रोपे आणले आणि दोन एकरात १० बाय ५ अशा पध्दतीने लागवड करून ठिंबक सिंचनच्या माध्यमातून पाण्याची सोय केली.साधारण २२ महिन्यांपासून फळाला सुरुवात झाली.तीन वर्षांत रोपे,फवारणी, मजूरी,ठिंबक सिंचन असा २ लाख ५० हजार रूपये खर्च झाला.या बागेत मुरलीधर पठारे व त्याची पत्नी सौ.सुंनदा पठारे यांनी मेहनत करत आजपर्यंत १५ लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.आष्टी तालुक्यातील दादेगांवसारख्या ग्रामीण भागातील पेरू थेट गुजरातच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. तिथे मागणीही चांगली आहे.व्यापाऱ्यांकडून शेतातच खरेदी पुर्वी शेतकर्‍याने पिकवलेल्या फळबागा या तोडणी करत मुंबई,पुणे,नगर यासह अन्य ठिकाणच्या बाजारपेठेत स्वताः गाडी भाड्याने करून घेऊन जावे लागायचे.पण आता व्यापाऱ्यांकडून शेतकर्‍याच्या शेतात येऊन तोडणी करत गाडीत भरून खरेदी केली जात असल्याने शेतकर्‍याचा वाहतुकीचा खर्च वाचला आणि भावही चांगला मिळत आहे.या शे प्रयोगशील शेतक-यास झुंजार प ोवार्ता ह ापरिवाराच्यावतीने हार्दिक ........शुभेच्छा ......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या