Ticker

6/recent/ticker-posts

गावातील मंदीरे उशीरा बांधा पण ज्ञानमंदिरांना सुविधा द्या! .................... ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर

आष्टी(प्रतिनिधी) 'आजचा युवक हा उद्याच्या बलशाली राष्ट्राचा महत्त्वाचा घटक आहे.किंबहुना सुसंस्कारित सशक्त ज्ञान संपन्न चारित्र्य आणि अध्यात्माचा ज्ञानी असलेला युवक ही देशाची शक्ती आहे.आणि म्हणून प्रत्येक गावागावात या युवकांच्या भविष्याचा विचार करून मंदिरे उशिरा बांधा परंतु ज्ञानमंदिरे चांगली उभारा असा अत्यंत संदेश महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोकप्रिय कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी दिला. 'भावेविना भक्ती बळेविना शक्ती बोलु नये हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा..' या अभंगावर कीर्तन सेवेतून निरूपण करताना ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर अनेक गोष्टीतून प्रकाश टाकत समाज पालक,विद्यार्थी,शासन प्रशासनाच्या भूमिकेवर भाष्य करत समाज व्यवस्थेतील अत्यंत केंद्रभूत मुद्द्यावर प्रकाश टाकला.या महत्त्वाच्या मुद्द्याला उपस्थित हजारो रसिक प्रेक्षक भाविक भक्तांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. आष्टी तालुक्यातील आनंदवाडी सराटेवडगाव येथे संत शिरोमणी सावतामाळी व संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तन सेवाप्रसंगी अत्यंत रसाळ आणि विनोदी वाणीतून त्यांनी कीर्तन सेवा सादर केली.प्रारंभी ग्रामस्थांच्यावतीने ह.भ.प.इंदुरीकर महाराजांचा सरपंच भीमराव बोडखे,अमोला सुंबरे राजेश झांबरे यांनी पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला. ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर पुढे म्हणाले की,,वयस्कर माणसं अनुभवी असतात. वृध्दाचा आदर ठेवा. गावात गावाला गावापण ठेवा. मायाला सोळा अपंत्य आहेत. मी,तु,माझं,तुझं,काम, क्रोध, लोभ,मद, मत्सर, अहंकार,आशा, ईच्छा, माया आदि अपंत्य आहेत.माया ही भजनाने मरते.ज्ञान वेद, योग,साधक,अनाथ,हरिपाठ हा ज्ञानेश्वर माऊलींंचा चौथा मुलगा आहे.हरिपाठ संप्रदायाचा आत्मा आहे असे सांगून हरिपाठाचे २७ अभंग हे शांतपणे म्हणावेत असा मौलिक संदेश त्यांनी उपस्थित भाविक भक्तांना दिला.दारु,जुगार आणि मोबाईलमधील गेमने तरुणांचे वाटोळे होत आहे. त्यामुळे माध्यमांचा वापर अत्यंत चांगल्या कामासाठी करा.अयोग्य कामासाठी युवा पिढी वेळ गमावत असल्याने प्रचंड नुकसान होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.यावेळी ह.भ.प.किरण महाराज शेटे,ह.भ.प.आप्पासाहेब सुंबरे,अनिल महाराज गरुड,अन्सारभाई शेख,माजी चेअरमन राजाराम नन्नवरे, चेअरमन बबन नन्नवरे, भानुदास बोडखे, प्रा.डाॕ. जी,पी,बोडखे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, माऊली बोडखे,इंजि.पी. बी.बोडखे,साईनाथ बोडखे,आदिनाथ बोडखे आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या