Ticker

6/recent/ticker-posts

नव वधूवरांची माऊलींच्या पायी दिंडी सोहळ्यातील सुखद वाटचाल....................... आदित्य ताठे आणि सौ.सुवर्णा ताठे यांच्या नवजीवनाचा प्रवास पंढरीच्या वारीतून !*

आष्टी (प्रतिनिधी) '..लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी आतुरलेल्या मनातून भक्ती,भाव, श्रद्धा,निष्ठा आणि अतिव ओढ असलेल्या हृदयाच्या प्रेम भावनेतून माऊलींच्या पायी दिंडी सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत एका वधूवर दांपत्याने वारीतून आपल्या जीवनाचा श्री गणेशा केला आहे! अहमदनगर शहरातील गाडळकर मळ्यातील संत शिरोमणी सावतामाळी मंदिर देवस्थानची आषाढीनिमित्त पायी दिंडी सोहळा दिंडी संस्थापक ह.भ.प. रामदास गाडळकर महाराज असुन संत श्रीपादबाबा चव्हाण (घोटी) यांच्या कृपाशीर्वादाने ह.भ.प. अरुण महाराज धाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि.७ जुलै रोजी दिंडीचे प्रस्थान झाले.दि. १६ जुलै रोजी पंढरीत दिंडी पोहचणार आहे. अहमदनगर (अहिल्यानगर) शहरातील प्रसिध्द कांदा व्यापारी राजेंद्रशेठ ताठे यांचे चिरंजीव आदित्य ताठे आणि सौ.सुवर्णा आदित्य ताठे हे उच्च शिक्षीत नव वधूवर माऊलींच्या पायी पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. त्यांंच्यासमवेत सुवर्णाची नणंद कु.साक्षी राजेंद्रशेठ ताठे,सौ.पुनम ताठे,सौ. स्मिता पडोळे पायी दिंडीत आहेत.विशेष म्हणजे आदित्य व सुवर्णाचे चार महिन्यापूर्वी लग्न झाले आहे. घरची परिस्थिती अत्यंत चांगली असून उच्च शिक्षीत असुनही कुटुंबामध्ये भक्ती,आध्यात्मिक वातावरण तसेच विठ्ठल नामस्मरणाच्या पवित्र वातावरणाची परंपरा आहे आणि म्हणूनच आदित्य यांचा विवाह नुकताच झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या सौभाग्यवतीसह लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारीमधून जीवानाचा प्रवास सुरू केला.हा केवळ वारीतला प्रवास नव्हे तर त्यांच्या जीवनाचा प्रवास आहे.हा अत्यंत पवित्र सुखद असा प्रवास ठरतो आहे. पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे.महाराष्ट्रासह देशभरातील भाविक भक्तांना लागले आहे. यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त द-याखोऱ्यातुन, डोंगरातून मिळेल त्या मार्गाने आणि ऊन वारा पाऊसात पंढरीकडे प्रवास करीत आहेत. देवयानी आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा १७ जुलै अर्थात बुधवारी आहे. त्या अनुषंगाने ही भावीक मंडळी अत्यंत पवित्र मनाने विठुरायाच्या जयघोषात पंढरीकडे पायी प्रस्थान करीत आहे.याच वारीमध्ये माऊलींच्या पायी दिंडी सोहळ्यात विठुरायाच्या नाम घोषात पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करत डोक्यावर पांढरीशुभ्र टोपी गळ्यात पवित्र तुळशीची माळ आणि हातात टाळ घेऊन हे नवदांपत्य पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी दिंडी सोहळ्यात मार्गस्थ झाले आहेत.सौ. सुवर्णा ही सुप्रसिद्ध अभियंता पी.बी.बोडखे यांची कन्या आहे तर ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांची पुतणी आहे. एकंदरीत,या नव वधू वर उच्च शिक्षीत जोडीच्या उत्स्फूर्त वारीतील सहभागाची चर्चा मात्र वारीतील भाविक भक्तांमध्ये होत असून सहकारी भाविकांना यातून प्रेरणा आणि तरुणाईचा सहभाग यामुळे वेगळेपण वाटत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या