( आष्टी(प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथील युवानेते किरण भगवान शिनगीरे यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांना ई-मेल च्या माध्यमातून पत्र पाठवून मुलींना उच्च शिक्षण मोफत या निर्णयाची अंमलबजावणी होण्याबाबतची मागणी केली होती.अखेर या मागणीला यश आले आहे.या निर्णयाचा अध्यादेश काढल्याबद्दल त्यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांचे आभारी व्यक्त केले.किरण शिनगीरे यांच्या मागणीमुळे त्यांचे विद्यार्थिनींसह, विविध स्तरातून कौतुक होत आहे.