
आष्टी (प्रतिनिधी )
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री यांच्या गतिमान नेतृत्वाखाली नवीन राजकीय भूमिका घेऊन, सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात बदल घडवून आणता येईल. सर्वांनी महायुतीचा घटकपक्ष म्हणून ना.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे.युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 'रयतेचं राज्य' या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी व शिव-फुले-शाहू-
आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा ना.अजितदादा पवारांनी पुढे नेण्याचा प्रयत्न करीत या भुमिकेशी सातत्य राखले आहे.आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या विचार व संस्कारांचा वारसा घेऊन आपण ना.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी कटीबध्द आहोत.यावर्षी दि. २२ ते २८ जुलै २०२४ या कालावधीत सर्वांनी आपल्या कणखर,गतिमान व प्रभावशील नेतृत्वाचा वाढदिवस "जनविश्वास सप्ताह" जोमाने व उत्साहाने साजरा करायचा आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दि. २२ ते २८ जुलै या कालावधीत जनविश्वास सप्ताह साजरा करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तथा बीड जि.प.चे माजी अध्यक्ष डाॕ.शिवाजी राऊत यांनी केले.
दि.२६ जुलै रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तालुका,जिल्हास्तरावर व गाव स्तरावर ना.अजितदादा पवार यांनी जो सर्वसामान्यांसाठी विकासाचा व सर्वसामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्याची जनजागृती करण्यासाठी मेळावे,सभा आयोजित करावेत.या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे मान्यवर नेते,पदाधिकारी,फ्रंटल व सेलचे प्रमुख व कार्यकर्ते यांना निमंत्रित करावे. कार्यक्रमामध्ये ना.अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात घोषीत केलेल्या महत्वकांक्षी आणि क्रांतिकारी योजनांचा प्रसार व प्रचार करून त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील यासाठी विशेष कार्यक्रम,मेळावे शिबिरे हाती घ्यावेत.त्यामध्ये महिलाशक्तीचा सन्मान - मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (दरमहा १५०० रुपये), मुलींना मोफत उच्चशिक्षण आईचे नाव बंधनकारक, बळीराजाला दिलासा,४४ लाख शेतकऱ्यांना मोफत वीज,कापूस सोयाबीन प्रतिहेक्टर ५ हजारांचे अनुदान,कांदा ३५० रु क्विंटल अनुदान,दूध ५ रुपये लिटर अनुदान,गृहिणींची कदर,दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर,२५ लाख लखपती दिदी करणार,दुर्बल घटकांचा आधार - संजय गांधी,श्रावणबाळ,निराधार,विधवा, दिव्यांग आणि वृद्धांना दरमहा १५०० अनुदान दिव्यांगांसाठी ३४,००० घरकुले,मौलाना आझाद महामंडळाला ५०० कोटींची हमी,५ लाखापर्यंत आरोग्य विमा सरंक्षण रक्कम,वारकरी सन्मान - वारीचा जागतिक वारसा युनेस्कोकडे नामांकन प्रस्ताव,
वारकरी संप्रदाय महामंडळ,दिंडींना प्रत्येकी २० हजार रुपये शिवसन्मान -किल्ले रायगडावर दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन उत्सव,१२ गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे प्रस्ताव,महिला विभागाकडून दि.१० ते २२ जुलै २०२४ या दरम्यान विविध विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.तेच कार्यक्रम पुढेही सुरु ठेवण्यास हरकत नाही,युवक विभागाने जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा कबड्डी स्पर्धा व कुस्ती राज्यस्तरीय इंडोर स्पर्धा, विद्यार्थी विभागाने ना.अजितदादा पवार यांच्या विकसनशील रोखठोक व गतिमान नेतृत्वाबद्दल वक्तृत्व स्पर्धा आयोजित करावेत,सामाजिक न्याय विभाग,अल्पसंख्यांक व ओ.बी.सी. विभागाने सामाजिक सलोखा साप्ताह व मेळावे घ्यावेत सर्व विभागांनी रक्तदान व आरोग्य शिबीर घेऊन जास्तीत जास्त रक्तदान करावे,पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घ्यावेत, जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या कार्यक्रमाची माहिती प्रिंट,इलेक्ट्रॉनिक मीडिया व सोशल मीडिया यांना द्यावी.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दि.२२ ते २८ जुलै या कालावधीत जनविश्वास सप्ताह साजरा करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तथा बीड जि.प.चे माजी अध्यक्ष डाॕ.शिवाजी राऊत यांनी केले.
0 टिप्पण्या