
आष्टी(प्रतिनिधी)
आष्टी,पाटोदा,शिरूर विधान सभा मतदार संघ हा विधानसभा निवडणुकीत भा.रा.काँग्रेससाठी सोडवावा.विधान सभेची उमेदवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसलाच द्यावी अशी मागणी काँग्रेसनेत्या माजी खासदार रजनीताई पाटील यांच्याकडे आष्टीचे भा.रा. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रविंद्र ढोबळे यांनी केली आहे.
१५ वर्षापासून आष्टी, पाटोदा, शिरूर मतदार संघात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला जागा सोडलेली नाही. हे निवेदन देताना
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा मिनाक्षीताई पांडुळे, आष्टी तालुकाध्यक्ष रविंद्र ढोबळे ,पाटोदा तालुकाध्यक्ष राहुल जाधव,शिरूर तालुकाध्यक्ष रमेश सानप उपस्थित होते. आष्टी ,पाटोदा, शिरूर या मतदार संघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मानणारे मतदार आहेत. या पक्षाच्या चिन्हांचा मतदारांना विसर पडत चालला आहे.राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांना प्रत्येक पंचवार्षिक ला आष्टी, पाटोदा, शिरूर या मतदार संघात उमेदवारी देण्यात आली होती परंतु राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला २० वर्षात एकही जागा मिळाली नाही. आता ही पंचवार्षिक विधानसभेला काँग्रेसची जागा सोडविण्यात यावी अशी मागणी भा.रा.काँग्रेसचे आष्टी ,पाटोदा, शिरूर मतदार संघातील तालुकाध्यक्षांनी केली आहे.
0 टिप्पण्या