उत्तम बोडखे,आष्टी.
-----------------


लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचंड लोकप्रियतेचा अनुभव बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि हिंदुस्थानवासीयांनी घेतलेला आहे. दुर्दैवाने त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कन्या माजी मंत्री आमदार पंकजाताई मुंडे यांनी तितकीच लोकप्रियता मिळवल्याचे सिद्ध झाले आहे. लोकसभेला पराभव झाल्यानंतर प्रचंड दुःखी आणि कष्ठी झालेल्या तब्बल चार तरुणांनी स्वतःचे जीवन संपवल्याची घटना ताजी आहे. आपल्या नेतृत्वाचे दुःख असह्य झाल्याने जीवन संपवल्याचे अत्यंत दुर्मिळ उदाहरण यानिमित्ताने देशवासीयांसमोर आले आहे. दरम्यान,आमदार पदावर तथा विधानपरिषद सदस्य म्हणून लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांची निवड झाल्यानंतर एका अत्यंत हातावर पोट घेऊन आणि रक्ताचे पाणी करणाऱ्या ऊसतोड मजुराने पंकजाताईसाहेब आमदार व्हाव्यात हा संकल्प केला होता...नव्हे नवसचा केला होता.हा नवस आज पुर्ण केला जात आहे.हा संकल्प
पूर्णत्वास गेल्याने पंकजाताईंच्या वजनाईतके पेढे वाटून आनंद साजरा करणारे भीमराव वनवे यांनी संत भगवानबाबांचे जन्मस्थळ पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट आज सोमवार दि. २९ जुलै रोजी पेढेतुला करून आपल्या आनंदाला मोकळी वाट करून दिली जाणार आहे.भीमराव बप्पाजी वनवे हे आष्टी तालुक्यातील वेताळवाडी- किन्ही या गावातील एक गरीब ऊसतोड कामगार आहेत.अनेक पिढ्यांपासून ते पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी ऊसतोडणीचे काम करून आपली उपजीविका अत्यंत प्रमाणिकपणे आणि स्वाभिमानाने जगतात.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यावरही त्यांनी तितकेच प्रेम केले. त्यांच्या मृत्यूनंतर ढसाढसा रडणारे भीमराव वनवे त्यातून बाहेर पडताना त्यांच्या दुःखाने व्यतीत झाले परंतु तब्बल १० वर्ष पदापासून दूर असलेल्या पंकजाताईंना पद मिळावे ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी संत भगवानबाबांच्या चरणी पंकजाताईना पद मिळण्याची मनातून इच्छा व्यक्त केली होती ती नुकतीच पूर्ण झाली.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची संघर्षकन्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना लोकसभेला थोडक्यात आलेले अपयश लोकांच्या जिव्हारी लागले होते.बऱ्याच मुंडे भक्तांनी यावेळी दोन तीन दिवस चूल पेटवली नाही.काहींना अश्रू अनावर झाले; तर काही मुंडेभक्तांनी आत्महत्या केल्याचे या राज्याने पाहिले.असे जनतेचे प्रेम फक्त लोकनेत्यांनाच मिळत असते हे मात्र या ठिकाणी सिध्द होताना दिसते.समाजकार्य करत असताना मुंडेसाहेबांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन पंकजाताईंनी मंत्री असताना केलेले सर्वसमावेशक कामे कोणीही विसरू शकत नाही.पंकजाताईंच्या काळातील काही योजना कायम स्मरणात राहतील. त्यातच पिकविम्याबाबत ताईंना कोणताही शेतकरी विसरू शकत नाही.त्यातच पंकजाताईंचा लोकसभेला झालेल्या पराभवानंतर ताईंचे पुनर्वसन व्हावे पंकजाताई सत्तेत याव्यात यासाठी बऱ्याच लोकांनी मनातील भावना व्यक्त केल्या होत्या.आष्टी तालुक्यातील वेताळवाडी-किन्ही गावचे सर्वसामान्य ऊसतोड मजूर भीमराव बप्पाजी वनवे यांनी पंकजाताईंचे पुनर्वसन झाल्यावर पंकजाताईंची पेढे तुला करणार असल्याचे ठरवले होते.आता पंकजाताईंची विधानपरिषदेवर आमदारपदी निवड झाल्याबद्दल आष्टी तालुक्यातील वेताळवाडी-किन्ही गावचे सर्वसामान्य कुटुंबातील ऊसतोड मजूर भीमराव बप्पाजी वनवे यांची इच्छा पुर्ण झाल्याने ठरवलेली पेढेतुला भगवान भक्तीगड सावरगाव येथे आज सोमवार दि.२९ जुलै रोजी होत आहे.
चौकट
-------------
किन्ही - वेताळवाडी येथील ऊस तोडणी कामगार भीमराव वनवे यांनी लोकसभा निवडणुक निकालात पंकजाताई यांचा अनपेक्षीत पराभव झाल्याचे समजताच अक्षराशःधायमोकलुन रडले.आपल्या लाडक्या पंकजाताईला कधी न्याय मिळेल ?त्या आमदार झाल्या की,मी त्यांची पेढेतुला करणार आहे अशा भावना समाजसेवक तथा पंकजाताईचे निकटवर्तीय असलेले विजय गोल्हार यांच्याजवळ व्यक्त केल्या.विजय गोल्हार यांनी वनवे यांना शब्द दिला होता की,आमदार पंकजाताई आपल्या भागात येताच तुमचा संकल्प (नवस) पुर्ण करुया... आणि आज हा संकल्प पुर्ण होत आहे.
-------------------------
चौकट
-------------
२९ जुलैला बाबांच्या
जन्मस्थळी पेढे वाटप!
---------------------
तमाम महाराष्ट्रवासियांचे श्रद्धास्थान संत भगवानबाबांचे जन्मस्थळ श्रीक्षेत्र सावरगाव घाट येथे सोमवारी भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन पंकजाताई मुंडे यांच्या वजनाईतके पेढे वाटून आनंद साजरा केला जाणार आहे.यानिमित्ताने मुंडे भक्तांना प्रचंड उत्सुकता लागली आहे.
----------------------
चार आत्महत्या; पंकजाताईंनी
वाढदिवस केला नाही!
--------------------
लोकसभेला पंकजाताई मुंडे यांचा निसटता पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील तब्बल चार तरुणांनी व्याकुळ होत स्वतःचे जीवन संपवले. ही घटना महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय इतिहासात अधोरेखित झाली. हे दुःख पंकजाताईंना प्रचंड वेदनादायी ठरल्याने त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला नाही.
-------------------------------
0 टिप्पण्या