
आष्टी (प्रतिनिधि)
संत शिरोमणी सावता महाराज यांचे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण याठिकाणी भक्तनिवास वास्तूशिल्प भूमिपूजन सोहळा व भक्त मेळावा रविवार दि.४ ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री ना. अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.या सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी संत सावता महाराज यांचे वंशज ह.भ.प. सावता महाराज वसेकर यांनी आष्टी तालुक्यातील अनेक गावांमध्ये जाऊन भेटी देऊन भाविक भक्तांना निमंत्रण दिले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी भाविक ग्रामस्थांनी प्रचंड प्रतिसाद देतमहाराजांच्या स्वागतासाठी मोठ्या भाविक संख्येने उपस्थित होते.संत शिरोमणी सावता महाराज यांचे १७ वे.वंशज ह.भ.प.सावता महाराज वसेकर यांचा दि.२८ जुलै रोजी आष्टी तालुका समाज बांधव निमंत्रण दौरा आयोजित केला होता.यामध्ये सोलेवाडी, क-हेवडगांव,आष्टी,केरूळ, कडा, डोंगरगण,दादेगांव, टाकळी अमिया, सराटेवडगांव, आनंदवाडी, रूईनालकोल आदी गावांना भेटी देऊन श्री क्षेत्र अरण येथे होत असलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.समाज बांधवांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन सावता महाराज वसेकर यांनी केले. ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात ह.भ.प. सावता महाराज वसेकर यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी समवेत युवा व्याख्याते अमर हजारे, समता परिषद तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ बोडखे,गणेशशेठ धोंडे, सुरज शिंदे,बाळासाहेब भोपळे आदींनी उपस्थित ग्रामस्थ भाविकांना मार्गदर्शन करुन कार्यक्रमास आष्टी तालुक्यातुन भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
0 टिप्पण्या