Ticker

6/recent/ticker-posts

मनोज जरांगे यांचे कट्टर समर्थक सागर आमले आष्टी मतदार संघातुन निवडणूक लढविणार.....

आष्टी (प्रतिनिधी) शेतकरी कुटुंबातुन आलेला एक तरुण सागर आमले अहमदनगर शहरात जाऊन आपल्या जिद्द, मेहनत व चिकटीच्या जोरावर आपला उद्योग उभा करतो आणि नावारुपास येतो तेव्हा कोरोना कळात ग्रामीण नागरिकांचे होणारे हाल पाहून कोरोना काळामध्ये कडा येथील सुयोग मंगल कार्यालयात ५० बेडचे मोफत कोविड सेंटर उभा केले.यामध्ये अनेकांना जीवदान देण्याचे काम केले. आपल्या माणुसकीच दर्शन घडवले.कोरोना काळामध्ये सागर आमले यांनी पायाला भिंगरी बांधल्यासारखे संपूर्ण मतदार संघांमध्ये रुग्णांची काळजी घेतली त्याचप्रमाणे आवश्यक असणाऱ्या अनेक रुग्णांना अर्थसहाय्य करून रुग्णांना जीवदान देण्याचे काम केलेले आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर अनेक विरोधकही विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.त्यातच मराठा आरक्षणाचा लढा उभा करणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक युवा नेते सागर आमले यांनी आष्टी,पाटोदा,शिरूर मतदार संघात दौरे सुरू केले आहेत.आमले हे विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.सागर आमले हा युवा व कोरा चेहरा मतदार संघात निवडणुकीत उतरणार असल्याने युवकांमध्ये व विशेषता मराठा समाजामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक सागर आमले आष्टी मतदार संघातुन निवडणूक लढविण्यास उत्सुक असल्याची चर्चा आहे. युवा नेते सागर आमले हे आष्टी तालुक्यातील अंभोरा या गावचे लोकनियुक्त सरपंच आहेत.मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत.जरांगे पाटलांच्या प्रत्येक लढ्यामध्ये ते हिरारीने सहभाग झालेले आहेत.त्यांनी जरांगे पाटलांच्या प्रत्येक उपोषणात मोठा सहभाग नोंदला असून दि.११ जुलै रोजी येथे बीड येथील होणाऱ्या शांतता रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी संपूर्ण आष्टी विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे.मराठा समाजाची भूमिका समजावून सांगून जनजागृती रॅलीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करत आहेत.लोकसभा निवडणुकीदरम्यान जरांगे पाटील यांचा आदेश पाळत मतदारसंघ पिंजून काढला होता.याच काळात जरांगे पाटलांची अंभोरा या ठिकाणी एक लाखापेक्षा जास्त जनसमुदायाची यशस्वी सभा ही त्यांनीच आयोजित केली होती. हीच सभा लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव करण्यासाठी निर्णय ठरली होती. अंभोरा या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी संपूर्ण बीड जिल्ह्यातील एक आदर्श ग्रामपंचायत बनवण्याचे काम केले आहे.याच अंभोरा गावामध्ये पिठाची गिरणी,कुट्टी मशीन ,शुद्ध पाणी हे नागरिकांना ते मोफत देत आहेत. शंभर टक्के कर भरणारी ग्रामपंचायत असून या ठिकाणी अनेक विकासकामे त्यांनी स्वखर्चातूनही मार्गी लावली आहेत. नागरिकांचे गाव खेड्यामध्ये व ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त वाद हे बांध रस्त्याचे होतात त्यामुळे सागर आमले यांनी सरपंच होताच गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाण्यासाठीचा रस्ता स्वखर्चातून तयार करून दिला आहे.मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सहभागी होऊन जरांगे पाटील यांची भूमिका त्यांनी संपूर्ण मतदारसंघांमध्ये पोहच केली आहे. मराठा समाजातील एक नवीन चेहरा आष्टी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने मराठा समाजामध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या