Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीत होणार उपजिल्हा रुग्णालय ! .................... १०० खाटांचे रुग्णालय, मुख्यइमारत व अधिकारी,कर्मचारी निवासस्थानांना मान्यता

आष्टी(प्रतिनिधी) ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन होऊन १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर झाले आहे.राज्य शासनाने मुख्यइमारतीसह अधिकारी,कर्मचारी निवासस्थानांच्या बांधकामास बुधवारी दि.३ जुलै मंजुरी दिली.या कामांसाठी एकूण ८८.३४ कोटी रुपयांचा निधी शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आला आहे.आष्टी येथे ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय असून लोकसंख्येचे विचार करता रुग्णांना मिळणारी आरोग्य सुविधा लोकसंख्येच्या प्रमाणात कमी पडत होती. त्यामुळे आष्टी येथे १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालयत झाल्यास आरोग्याच्या दृष्टीने मोठी समस्या दूर होणार असल्यामुळे आष्टी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा अशी मागणी नागरिकांमधून होत होती.यासाठी आ.बाळासाहेब आजबे यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून मंजुरीसाठी प्रयत्न केले.आक्टोबर २०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील कॅबिनेट बैठकीमध्ये आष्टीचा उपजिल्हा रुग्णालयास मान्यता मिळाली.त्यानुसार कासारी हद्दीतील शासनाच्या गायरान जमिनीपैकी बेलगाव रस्त्यावरील स.नं.१४९ मध्ये दोन हेक्टर ४० आर (सहा एकर) जागा शासनाने उप जिल्हारुग्णालयासाठी उपलब्ध करून दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या