Ticker

6/recent/ticker-posts

ज्ञानोबा- तुकारामांच्या जयघोषात भक्तीमय वातावरणात ............ संत मदन महाराज यांंच्या पायी दिंडी पालखी सोहळ्याचे पंढरी कडे प्रस्थान

आष्टी (प्रतिनिधी) तमाम लाखो भाविक भक्तांचे श्रद्धांजली विठ्ठलाच्या दर्शनाची आत्मिक ओढ असलेल्या हजारो भाविक भक्तांसह अत्यंत पवित्र मनाने संत मदन महाराज देवस्थानच्या वतीने असलेल्या दिंडीच्या पालखी सोहळा ह.भ.प.महाराज बहिरवाळ महाराज दिंडी सोहळ्याच्या रूपाने मार्गस्थ झाले आहेत.श्री संत मदन महाराज श्री क्षेत्र कडा पायी दिंडी पालखी सोहळ्यात राजकीय सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.यावेळी संत मदन महाराज देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांच्यासह दोन हजार भाविक भक्त समवेत आहेत.हा पायी दिंडी सोहळा संतनगर कड्यातुन प्रस्थान झाला आहे.महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी आहे.संत परंपरांच्या अध्यात्मिक सलोखा आणि समतेच्या बंधुत्व पूर्व नात्यांनी गुंफण केलेल्या या पवित्र मातीत ईश्वर चरणी नतमस्तक होण्याची मोठी परंपरा आहे.आषाढीनिमित्त २० लाख वारकरी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरुन पंढरीला येतात.पंढरपूरात येऊन चंद्रभागेच्या वाळवंटात नतमस्तक होऊन विठ्ठलाचा आशीर्वाद घेणारे वारकरी आहेत. बीड जिल्ह्यातील गहिनीनाथगड,कडा येथुन संत मदन महाराज यांच्या निघालेल्या पायी दिंडी पालखी सोहळ्यात ५० हजार वारकरी सहभागी झालेले आहेत.आषाढी वारीनिमित्त "ग्यानबा तुकारामाच्या "जयघोषात कडा येथील श्री संत मदन महाराज संस्थानच्या दिंडीचे रविवारी पंढरपुरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले.सुरुवातीला संत मदन महाराज मठासमोर रथाची विधिवत पूजा संस्थांचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांच्या हस्ते करण्यात आली.त्यानंतर संपूर्ण गावभर पालखी रथाची मिरवणूक काढण्यात आली.यंदा पाऊस नसल्याने वारकरी मोठ्या प्रमाणावर वारीसाठी निघाले आहेत.दिंडीस निरोप देण्यासाठी माजी आ.साहेबराव दरेकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी, उपसभापती नामदेव धोंडे,राम खाडे,सरपंच युवराज पाटील,उपसरपंच दीपक कर्डीले,हनुमानशेठ बिहाणी,ह.भ.प.दादा महाराज चांगुणे,सर्व ग्रा.पं.सदस्य,सुभाष सोनवणे,माजी सरपंच रामशेठ मधुरकर,माजी सरपंच अनिलतात्या ढोबळे,माजी सभापती संजयनाना ढोबळे,गोरख कर्डीले,पत्रकार उत्तम बोडखे, रघुनाथ कर्डीले,विनोद ढोबळे,राजेश राऊत, ह.भ.प.दादा महाराज चांगुणे,पांडुरंग कर्डीले,योगेश भंडारी मोहनदास बिहाणी,रवींद्र ढोबळे,गोरख कर्डीले,सुरेश कर्डीले,शिवाजी कर्डीले,बजरंग कर्डीले,विकास धर्माधिकारी, दत्ताभाऊ सायकड, सुभाष रासकर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेरी बु.येथे पांडुरंग नाथ यांच्यावतीने दिंडीतील वारकऱ्यांना भोजन देण्यात आले तर कडा येथे बबलू तांबोळी यांच्यावतीने नाश्त्याची सोय करण्यात आली होती. चौकट -------- ७ जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान;
दिंडीचे २१ वे वर्ष! ---------------------------- - आष्टी तालुक्यातील कडा येथील संत मदन महाराज संस्थानची आषाढीनिमित्त पंढरपूरसाठी दिंडी रविवार दि.७ जुलै रोजी कडा येथुन निघाली आहे.कडा येथील संत मदन महाराज संस्थानची दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्ताने संत मदन महाराज बिहाणी देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरला दिंडी जात असते. दिंडीचे हे २१ वे.वर्ष आहे शेरी,धिर्डी,शिराळ, मिरजगाव,करमाळा, टेंभुर्णी,विठ्ठल साखर कारखाना मार्गे पंढरपूरला ही दिंडी पोहोचते.दिंडीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झालेले आहेत.वाटेत ठिकठिकाणी दिंडीच्या वारकऱ्यांची जेवण वगैरेची सोय कडा व परिसरातील नागरिकांनी केली आहे.संस्थानचा पंढरपूर येथे मठ असून त्याठिकाणी ही दिंडी चार दिवस मुक्कामी राहते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या