
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील
वाळुंज ग्रामपंचायतीवर अनेक वर्षापासून माजी मंत्री सुरेश धस यांची
एकहाती सत्ता राहिलेली आहे. दिड वर्षांपूर्वी निवडणूक होऊन माजी मंत्री सुरेश धस यांच्या समर्थकांचा दणदणीत विजय मिळवला होता.धस यांच्या
मार्गदर्शनाखाली ठरवून दिलेल्या नियोजित कार्यकाळामुळे मावळते उपसरपंच नवनाथ सोले यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागी काल दि.१८ जुलै रोजी सरपंच सौ.मनिषा सुरेश सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक झाली.यावेळी उपसरपंच पदासाठी भाजपचे नेते तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे यांच्या बंधुच्या पत्नी सौ.शितल बाळासाहेब शिंदे आणि सौ.योगिता युवराज खाडे यांनी नामनिर्देशक पत्र दाखल केले होते.सौ.शितल शिंदे यांना ५ मत मिळाल्याने उपसरपंचपदी निवड झाल्याचे अध्याशी अधिकारी यांनी जाहीर केले सुचक नवनाथ बबन सोले होते.ग्रामसेवक पी.आर.शिंदे,महेश धस,बंडू सातपुते यांनी काम पाहिले. प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस गुज्जर,पोलिस काळे यांनी सहकार्य केले.उपसरपंचपदी सौ.शितल शिंदे यांची निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष केला.या निवडीबद्दल माजी सरपंच विष्णू खाडे,माजी सरपंच सोमीनाथ शिंदे,माजी सरपंच घनशाम खाडे, अशोक राऊत,जनक खाडे,माजी उपसरपंच नवनाथ सोले,सुरेश सातपुते, दादा खाडे,भरत सोले,अंकुश बळे, परसराम शिंदे,सुर्यकांत कुलकर्णी, राजेंद्र पवार,दादासाहेब सोले, कांतीलाल सोले,लहु खाडे,जालिंदर राऊत,जगन्नाथ खाडे,लक्ष्मण सोले, बाबासाहेब बळे, बाळू शिंदे,भरत वाहटुळे, रामचंद्र खाडे,भाऊसाहेब खाडे,महेश बळे आदींनी अभिनंदन केले. ग्रामस्थांनी आपल्यावर टाकलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडणार आहोत. ग्रामविकासासाठी सदैव प्रयत्न करीन अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित उपसरपंच सौ.शितल बाळासाहेब शिंदे यांनी दैनिक झुंजारनेताशी बोलताना दिली.
चौकट
**********
माजी आ.भीमराव धोंडे समर्थकाला माजी मंत्री धस यांनी न्याय दिला...
----------------------------
सध्या महायुती सरकार असल्याने माजी आ. भीमराव धोंडे व माजी मंत्री सुरेश धस दोन्ही दिग्गज नेते भाजप पक्षात असल्याने भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे हे माजी आ.भीमराव धोंडे यांचे कट्टर समर्थक असून त्यांच्या वाळुंज ग्रामपंचायतच्या निवडणुकीत धस - धोंडे दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूकीत एकत्र आले होते.धस यांचे वर्चस्व असलेल्या या ग्रामपंचायतमध्ये भीमराव धोंडे समर्थक रघुनाथ शिंदे यांच्या भावजई सौ.शितल बाळासाहेब शिंदे यांना उपसरपंचपदाची जबाबदारी देऊन महायुती धर्म पाळला आहे.
0 टिप्पण्या