Ticker

6/recent/ticker-posts

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या कडा गट व शिराळ गणाची बैठक ................... दिपक खिळे

आष्टी (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाची बांधणी सुरु आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदंद्र पवार) या पक्षाचे आष्टी विधानसभा अध्यक्ष राम खाडे व विधि सेलचे मराठवाडा विभाग प्रमुख नरसिंग जाधव हे ईच्छुक उमेदवार आहेत.उद्या कडा गटाचे बैठकीचे जि.प.सदस्य गंगाआबा आजबे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गटातील गण प्रमुख व गट प्रमुख सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित राहावे.गेल्या लोकसभा निवडनुकित कडा जि.प.गटामध्ये मोठे मतदान देऊन राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार विजय होण्यास मदत झाली होती.त्या पार्श्वभूमीवर धिर्डी येथे होणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीस उपस्थित राहवे असे अवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी सरपंच दिपक खिळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या