Ticker

6/recent/ticker-posts

संत मदन महाराज यांनी आष्टी तालुक्यातील ज्ञानेश्वरी पारायण सुरु केले .................. ह.भ.प.बबन महाराज यांचे गुरुपोर्णिमेनिमित्त किर्तनातुन प्रतिपादन

आष्टी (प्रतिनिधी) संत मदन महाराज हे उघडे परब्रम्ह होते. ते स्वताः उघडे राहिले परंतु ईतरांना कपडे,मायेचे पांघरूण दिले.जगात काहीही मिळेल परंतु महात्मा अथवा संत दुर्लभ आहेत. गुरुकृपेने मी आज तुमच्यापुढे उभा आहे.समाजाला दिशा देण्याचे काम नेहमी संतांनी केले आहे.देव प्रत्यक्ष कोणाला दिसला जरी नसला तरी संतांनी अनुभवाद्वारे देवत्वाची प्रचीती समाजाला दिली आहे. समाजाला अध्यात्मिक मार्गावर ठेवून माझ्यामध्ये शांतता सौख्य राखण्याचे मोठे काम संतांनी " गुरु " च्या भूमिकेतून केल्याचे दिसून येते असे सांगत.संत मदन महाराजांनी देहाची कधीच पर्वा केली नाही.त्यांनी देहाचा लाड कधीच केला नाही.याचा साक्षीदार मी असल्याचे सांगून अनेक उदाहरणे देऊन जीवनातील गुरुचे महत्त्व पटवून दिले.हरिनाम सप्ताह सोहळे,ज्ञानेश्वरी पारायणे संत मदन महाराज यांनी या भागात नव्हे मराठवाड्यात अध्यात्मिक कार्य केले.संत मदन महाराज यांनी आष्टी तालुक्यातील ज्ञानेश्वरी पारायण सुरु केले असे प्रतिपादन संत मदन महाराज देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज यांनी केले. आष्टी तालुक्यातील कडा येथील संतनगरात गुरुपोर्णिमेनिमित्त आयोजित कीर्तन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अनंत हंबर्डे सर, आण्णासाहेब चौधरी,सभापती रमजान तांबोळी, संजय गाढवे, हनुमानशेठ बिहाणी,सरपंच भीमराव पाटील , उपसरपंच दिपक कर्डीले, युवराज पाटील ,बाजीराव हजारे,ह.भ.प.निवृत्तीदादा बोडखे, ह.भ.प.मोहन महाराज आमटे, सेवानिवृत्त उपअभियंता पी.ई. तळेकर,प्राचार्य डाॕ,हरिदास विधाते, सुनिलदादा नाथ,बाबुशेठ भंडारी, उत्तम बोडखे,रघुनाथ कर्डीले,नागेश कर्डीले,सभापती संजयनाना ढोबळे,गोरख कर्डीले ,प्रा.डाॕ.शाम सांगळे,संतोष भंडारी,सुभाषमामा सोनवणे,पांडुतात्या चौधरी, रोहिदास कर्डीले, बाळासाहेब कर्डीले,बाळासाहेब निकम, कुंडलीक आमटे,डाॕ.मनोज पाचे,बाबासाहेब मुळीक,शिवाजी पाचे, भाऊसाहेब भोजने,सुनिल देशमुख,सुदामकाका झिंजुर्के, प्रा.सुभाष रासकर आदि मान्यवर उपस्थित होते. ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल पुढे बोलताना म्हणाले की,संत हेच समाजाचे सर्वश्रेष्ठ गुरु असतात.संत हे देव आणि समाजामध्ये दुवा निर्माण करतात.संत मदन महाराज बिहाणी यांनी निरलसपणे मार्गदर्शन करताना स्वतः उघडे राहुन समाजाला मायेची,भक्तीची ऊब दिली.त्यांनी स्वतः लग्न केले नाही पण हजारो लग्न लावून दिले,ते स्वतः उपाशी राहीले पण वसतिगृह सुरू करुन अनाथ मुलांना घास भरवला,त्यांनी देहाची पर्वा न करता परमार्थ केला. संत मदन महाराज बिहाणी यांंच्या अलौकिक सेवाकार्यामुळे चंद्र- सुर्य असेपर्यत समाज त्यांना विसरणार नाही असे सांगीतले.गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमासुद्धा म्हणतात. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे.साधारणपणे आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते कारण या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता असं म्हटलं जातं.त्यांनी महाभारत पुराण कथा लिहिल्या आहेत असेही बबन महाराज यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या