
आष्टी (प्रतिनिधी)
खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आजपासून ई-पाहणी अॕपवर पीक पेरा नोंदणी करण्यास सुरुवात होणार आहे.ही नोंदणी केल्यावर शासनाच्या विविध योजना, पीकविमा,पीक कर्ज, शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यास मदत होईल असे सांगत शेतकऱ्यांनी वेळेवर ई- पीक पाहणी करुन घेण्याचे आवाहन आष्टीचे तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की,ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही.शेतकरी स्वत:च्या मोबाइल ॲपवरून सात-बारावरील विविध पिकांची नोंदणी करू शकतील.गतवर्षी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी ई -पीक पाहणी करून शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे. शेतकऱ्यांनी १०० टक्के पीक पाहणी करुन घ्यावी.खरीप हंगाम २०२४ साठी पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे.ही ई-पीक
पाहणी अॕपमध्ये पिके नोंदविण्याची
सुविधा देण्यात आलेली आहे.संपूर्ण गावाची पीक पाहणी पाहण्याची
सुविधा देण्यात आलेली आहे.आष्टी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी संभाव्य नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई -पीक पाणी करून घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी केले आहे.दि. १ ऑगस्ट रोजी पोर्टल सुरू होणार आहे.शेतकरी हंगामाची पीक
पाहणी अपलोड करू शकतात. जिओ फेन्सिंगच्या बफर अंतराच्या बाहेरून फोटो घेतला तरी पीक पाहणी नोंदविली जाते.१ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर अशा ४५ दिवस शेतकरी स्तरावरील पीक पाहणी
होणार आहे.कृषी सहायक स्तरावरील पीक पाहणी २६ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर असा ३० दिवस चालणार आहे. खातेदारनिहाय पीक पाहणीमुळे पीक कर्ज देणे, पीकविमा भरणे किंवा पीक नुकसानभरपाई शक्य होणार आहे. ई-पीक पाहणी ॲपमध्ये नोंदणीच्या आधारे शेतक-यांचे उत्पादन, शेत जमीनीची प्रतवारी,अतिवृष्टी,नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज मिळवणे शक्य होणार आहे.आष्टी तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतामध्ये ज्या सर्वेनंबरमध्ये जे पीक घेतले आहे त्याच पिकाची ई -पीक पाहणी मध्ये नोंद करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना ई - पीक पाहणी करताना काही अडचणी आल्यास कृषी सहाय्यक किंवा आष्टी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही गोरख तरटे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या