Ticker

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्काराने सरपंच सौ.वंदना परिवंत गायकवाड सन्मानीत

आष्टी (प्रतिनिधी) सामाजिक कार्याबद्दल आष्टी तालुक्यातील क-हेवडगाव येथील सरपंच तथा कडा कृ उ.बा. समितीच्या संचालिका सौ.वंदना परिवंत गायकवाड यांचा सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्काराने रविवारी बीड येथे गौरव करण्यात आला.पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,दैनिक प्रभास केसरीच्या संपादिका अनुप्रिता मोरे,पत्रकार वैभव स्वामी यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.यावेळी जयदीप गायकवाड,राजेंद्र बोराडे,सचिन कदम, अर्चना कदम,पत्रकार अण्णासाहेब साबळे आदि उपस्थित होते.या पुरस्काराबद्दल सौ.वंदना गायकवाड यांचे माजी आ.सुरेश धस,माजी सभापती अरुणभैय्या निकाळजे,माजी सरपंच रामशेठ मधुरकर,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे आदी राजकीय, सामाजिक,धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या