Ticker

6/recent/ticker-posts

प्रगल्भ समाजनिर्मितीसाठी साहित्य चळवळींची आवश्यकता ................. प्रा.शर्मिला गोसावी

आष्टी (प्रतिनिधी ) अन्न, वस्त्र, निवारा या मनुष्याच्या जशा मुलभूत गरजा आहेत तद्वतच साहित्य ही सुद्धा मानवाची एक महत्त्वपूर्ण गरज असून साहित्य विहीन समाज हा ब्रेक नसलेल्या गाडीसारखा आहे. समाजात खऱ्या अर्थाने प्रगल्भता आणायची असेल तर साहित्य विषयक छोट्या मोठ्या चळवळी जिवंत राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आहिल्यानगर येथील जेष्ठ कवयित्री शर्मिला गोसावी यांनी केले. गुरुपौर्णिमेनिमित्त एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित '२२ वे राज्यस्तरीय ऑनलाईन एकता काव्य संमेलना' च्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. संमेलनाचे उद्घाटन पैठण येथील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य,सामाजिक कार्यकर्ते मा.संतोष तांबे यांनी केले. एकता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड, प्रदेश संघटक देवीदास शिंदे, प्रदेश युवक निमंत्रक इम्रान शेख, मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा.डाॅ.प्रकाश वाकळे यांची या संमेलनाला प्रमुख उपस्थिती होती. कवयित्री संगिता औटे-होळकर (आष्टी), सुनंदा सरदार (उदगीर), प्रा.प्रभाकर शेळके (जालना), प्रिती विलास जगझाप (चंद्रपूर), डाॅ.प्रविण काळे (माजलगाव), गजानन बेळे (गंगाखेड), अविनाश माळवदे (गेवराई) यांनी एकसे बढकर एक रचना पेश करत उपस्थितांना तब्बल दोन तास खिळवून ठेवले. या काव्य संमेलनात आदर्श शिक्षक तथा उत्कृष्ट व्याख्याते धर्मराज करपे (बीड) यांनी बहारदार सूत्रसंचालन करत कार्यक्रम एका उंचीवर नेऊन ठेवला.युवती आघाडीच्या विभागीय संघटक प्रिती टेकाळे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक तर एकताचे परळी वैजनाथ जि.बीड येथील युवक प्रतिनिधी सुशीलकुमार दोडके यांनी आभार प्रदर्शन केले. एकता फाउंडेशन परभणी जिल्हा उपाध्यक्षा मेघा नांदखेडकर, एकता फाउंडेशन आहिल्यानगर चे प्रसिद्धी प्रमुख पत्रकार बाळासाहेब कोठुळे, एकता फाऊंडेशन पैठण तालुकाध्यक्ष शहादेव सुरासे, शिरूर कासार तालुका युवक प्रतिनिधी छगन पालवे यांसह यावेळेस महाराष्ट्रभरातील नामवंत कवी, कवयित्री आणि एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य केंद्रीय कार्यकारिणीतील पदाधिकारी,विविध जिल्ह्यांतील जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या