

आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील सराटेवडगाव येथील चेअरमन शेख युनूस ( वय ५२) आणि त्यांची आई यासीनबी शेख वय (१०२) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.या आई आणि मुलाचे निधन एकाच दिवशी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चेअरमन शेख युनूस सराटेवडगाव येथील रहिवासी होते आ.सुरेश धस यांचा महाविद्यालयीन काळापासून ते शेवटपर्यंत अत्यंत एकनिष्ठ कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती.सुरुवातीला त्यांनी परिसरातील दूध संकलन करून चेअरमन युनूस असे ओळख निर्माण केली होती.त्यानंतर काही काळ त्यांनी आष्टी तालुका दूध उत्पादक व पुरवठा सहकारी संघ याठिकाणी पर्यवेक्षक म्हणून काम केले.अलीकडच्या काळामध्ये आ.सुरेश धस यांचे टाकळी आमिया पंचायत समिती भारतीय जनता पार्टीचे गणप्रमुख म्हणून देखील त्यांनी अत्यंत चांगले काम केले आहे.मात्र दुर्दैवाने गेल्या काही दिवसात त्यांना कर्करोग जडला आणि अल्पावधीमध्ये व्याधी वाढत जाऊन ते अत्यावस्थ अवस्थेत गेल्यामुळे त्यांच्या आई यासीनबी यांचे वय देखील १०२ इतके होते तरी त्या धडधाकट होत्या परंतु मुलाच्या अत्यावस्थ अवस्थेकडे पाहून त्यांचे अत्यंत दुःखी अवस्थेत आज दि. १ जुलै रोजी सकाळी १० वाजता निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दुपारी २ वाजता सराटेवडगाव येथील कब्रस्तानमध्ये शोकाकुल वातावरणात करण्यात आला. आणि अत्यवस्था अवस्थेतील शेख युनूस यांचे निधन सायंकाळी ५.३० वाजता झाल्याने ज्यांचा अंत्यविधी रात्री उशिरा पार पाडला.यावेळी उध्दवबापु दरेकर,युवानेते जयदत्त धस, राजेंद्र धोंडे ,संदीप सुंबरे,चेअरमन आदिनाथ सानप,पत्रकार उत्तम बोडखे,इंजि.पी.बी. बोडखे,चेअरमन बबन नन्नवरे,चेअरमन राजाराम नन्नवरे,सरपंच भीमराव बोडखे,माजी सरपंच निळकंठ सुंबरे, माजी सरपंच संदीप चौधरी,प्रा.डाॕ.जी. पी.बोडखे, शेख अन्सारभाई,सिध्देश्वर शेंडगे सर आदि सामाजिक,राजकीय, धार्मिक ,दुग्ध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. चेअरमन युनूस आणि शेख यासीनबी यांच्यापाठीमागे सून,नातवंडे असा परिवार आहे.शेख यासीनबी या सांगवीपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांच्या आजी आणि एक चेअरमन युनूस हे मामा होते.वयोवृद्ध आई आणि मुलगा यांच्या एका दिवशी निधन झाल्यामुळे सराटेवडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 टिप्पण्या