

आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथील आनंद चॕरीटेबल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली २००६ साली स्थापन झालेले आष्टी येथील कॉलेज ऑफ फार्मसी (डी.फार्मसी) कॉलेजचा औषध निर्माण शास्त्र डी.फार्मसी अभ्यासक्रमाचा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई बोर्डाने उन्हाळी २०२४ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले.प्रथम व द्वितीय वर्ष डी.फार्मसी चा ९७ टक्के निकाल लागला आहे.डी.
फार्मसी द्वितीय वर्षामध्ये प्रथम क्रमांक झगडे पल्लवी राजू ८८.२७ टक्के, द्वितीय क्रमांक ढमढेरे प्रीती संतोष ८७.८२ टक्के , तृतीय क्रमांक कातखडे ऋतुजा भारत ८५.२७ टक्के ,चतुर्थ क्रमांक नेटके साक्षी महादेव ८४.६४ टक्के , पाचवा क्रमांक कु.मासाळ अनुराधा दिगांबर ८३.९१ टक्के आणि डी. फार्मसी प्रथम वर्षात प्रथम क्रमांक कु. तेजल भाऊसाहेब शिंदे ८३.४० टक्के, द्वितीय क्रमांक कु. झगडे शुभांगी मारुती ८२.६० टक्के, तृतीय क्रमांक कु. गर्जे पुनम बाळासाहेब ८२.३० टक्के, चतुर्थ क्रमांक कु.कोल्हे दीक्षा नवनाथ ८२ टक्के , पाचवा क्रमांक कु.जंपलवार प्रियंका संतोष ८१.७० टक्के यांनी उत्कृष्ट असे गुण मिळवून यश संपादन केले आहे.यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थिनींचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव धोंडे, डॉ. अजयदादा धोंडे , संचालक अभयराजे धोंडे,प्रशासन अधिकारी डॉ.डी.बी.राऊत,प्रा.शिवदास विधाते, माऊली बोडखे,संजय शेंडे यांनी अभिनंदन केले.या कॉलेजमधील विद्यार्थी दरवर्षाप्रमाणे यश संपादित करतात.या कॉलेजमध्ये नियमित होणारे सर्व वर्ग तासिका प्रात्यक्षिक,उत्कृष्ट ग्रंथालय,कॉम्प्युटर रूम, निसर्गरम्य परिसर, वेगवेगळ्या विषयांमधील वेगवेगळ्या ठिकाणचे विभागातील तज्ञ प्राध्यापकांचे व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन, वेगवेगळ्या औषध निर्माण कंपनीला भेटी, विद्यार्थ्याना औषधांमध्ये संशोधन करण्यासाठी मार्गदर्शन करणे, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कॉलेजमध्ये होत असलेले विविध कार्यक्रम,शिक्षक ,पालक मेळावा,आयुर्वेदिक वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या औषधी बागेंना भेटीचे नियोजन, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक गोष्टीचा अभ्यास होण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सामाजिक कार्यशाळेंना भेटी देणे, शासकीय, खाजगी हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिससाठी पाठवणे पेशंटशी संवाद साधून त्यामार्फत वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करणे हे उपक्रम कॉलेजमध्ये राबविले जातात. त्यामुळे दरवर्षी उत्कृष्ट असा कॉलेजचा निकाल लागतो असे कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुनील कोल्हे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या